आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठीही योगदान देणं आपलं कर्तव्य आहे. जर तुमच्याकडेही मोकळा वेळ असेल तर त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी नक्की करा. मग ती मदत छोटी असो वा मोठी. भारतामध्ये अनेक एनजीओज आणि संस्थांमार्फत सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. पण यापैकी काहीच सामाजिक संस्था अशा आहेत. ज्या गेली काही दशकं अविरतपणे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. सरकारच्या अनेक निर्बंधातून मार्ग काढत या सेवाभावी संस्था आपलं काम करतात. भारतासारख्या देशात जिथे देणग्या आणि स्पॉन्सरशिप मिळवणं आणि त्यात पारदर्शकता ठेवणं सोपं नाही. पण या सर्वातून मार्ग काढत भारतातील आणि मुंबईतील बेस्ट एनजीओज त्यांच्या माध्यमातून समाजावर त्यांचा ठसा पाडत आहेत.
Table of Contents
भारतातील टॉप एनजीओज (Top NGOs In India)
अनेक वर्षांपासून भारतात उत्तम सामाजिक कार्य अविरतपणे करणारे हे काही एनजीओज आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत ते Top 5 एनजीओज.
1. चाईल्ड राईट्स अँड यू (CRY - Child Rights and You)
एनजीओकडून केलं जाणारं काम: क्राय (CRY) या एनजीओची सुरूवात 1979 साली रिप्पन कपूर यांनी केली. हा एनजीओ भारतातील प्रमुख शहरांमध्ये आहे. ज्यामध्ये मुंबई, बंगळूरू, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीच्या समावेश आहे. या संस्थेतर्फे अनेक महत्त्वाच्या सामाजिक मुद्यांवर काम केलं जातं. जसं बालकामगार, कुपोषण, गरिबी, शिक्षण आणि साक्षरता, लहान मुलांची तस्करी आणि लिंगभेद यांचा समावेश आहे.
तुम्ही कसं कराल योगदान: तुम्ही या संस्थेला मदत करून किंवा त्यांच्या कामात सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: गिव्ह फाऊंडेशनची स्थापना ही 1999 साली करण्यात आली. हा एनजीओ महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. हा एक ऑनलाईन डोनेशन प्लॅटफॉर्म असून त्याद्वारे भारतातील इतर सेवाभावी संस्थांना मदत पोचवली जाते. तसंच त्यांच्यातर्फे निधी उभारला जातो. तसंच अनेकांकडून केलेल्या कामातून इतर एनजीओजना मदत केली जाते.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्ही या संस्थेला मदत करून किंवा त्यांच्या कामात सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: गूंज हा भारतातल्या टॉप 10 एनजीओजपैकी एक आहे. याचं प्रमुख केंद दिल्लीला आहे. गूंजची सुरूवातही 1999 साली अंशू गुप्ता यांनी केली. या एनजीओतर्फे पूरग्रस्तांना मदत, मानवीय मदत आणि समाज विकासाचं कार्य केलं जातं.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्ही या संस्थेला मदत करून किंवा त्यांच्या कामात सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: हेल्पएज इंडियाची स्थापना 1960 साली श्री सर्वपल्ली राधाकृष्णनन, मि, जॅक्सन कोल आणि सॅमसन डॅनियल यांनी केली. ही एक सेक्युलर, ना नफा आणि सेवाभावी संस्था आहे. मुख्यतः ही संस्था निराधार वृद्ध माणसांची काळजी घेते. त्यांच्या जीवन सुखकर करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर या संस्थेमार्फत केलं जातं. जसं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, पेन्शन योजना, वृद्धांना दिला जाणारा त्रास आणि सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोचवणं.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्ही या संस्थेला मदत करून किंवा त्यांच्या कामात सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: अक्षय पात्र फाऊंडेशनची स्थापना 2000 साली भक्ती वेदांत स्वामी प्रभूपदा यांनी केली. ही संस्था कर्नाटकातील बंगळुरूमध्ये आहेत. या सेवाभावी संस्थेतर्फे भारतातील अनेक राज्यातील गरजू मुलांच्या शाळेत मिड-डे मील दिलं जातं. ज्यामुळे त्यांना पोषक आहार मिळतो. अक्षय पात्रतर्फे कुपोषण आणि सर्व स्तरातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी कार्य केलं जातं. या संस्थेतर्फे मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक एनजीओजनाही मदत केली जाते.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्ही या संस्थेला मदत करून किंवा त्यांच्या कामात सहभागी होऊन तुमचं योगदान देऊ शकता.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुंबईतील बेस्ट एनजीओज (Best NGOs In Mumbai In Marathi)
भारतासोबतच मुंबईतही अनेक सेवाभावी संस्था आहेत, ज्या अनेक सामाजिक समस्यांबाबत कार्य करत आहेत. त्यांचं कार्य पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित तुम्हाला या संस्थांबद्दल जाणून घ्यायचं असल्यास वाचा.
एनजीओकडून केलं जाणारं काम या संस्थेमार्फत बेघर मुलांना छत्र दिलं जातं. डॉन बॉस्को त्यांची काळजी घेतं आणि त्यांचं संगोपन करतं. तसंच त्यांच्या भावी आयुष्यासाठीही जडणघडण करतं. या संस्थेत मुलांना समाजात कसं वावरावं, शिक्षण आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना व्हॉकेशनल ट्रेनिंग दिलं जातं.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्हीही या मुलांना शिकवण्यासाठी तुमचा वेळ देऊन काही तास त्यांच्यासोबत घालवू शकता. त्यांच्यासाठी खास व्हॉकेशनल स्कील किंवा वर्कशॉप्स घेऊ किंवा आयोजित करू शकता. आरोग्यासंबंधित मदत किंवा जागृती करण्यासाठी मदतीचा हात देऊ शकता. तसंच एखाद्या मुलाची जबाबदारी घेऊन त्याची स्पॉन्सरशिपही घेऊ शकता.
संपर्क: +912224150562
पत्ता: Opp. St. Joseph High School, Road 16, Wadala, Mumbai
एनजीओकडून केलं जाणारं काम: या संस्थेमार्फत वृद्धांसाठी काम केलं जातं. त्यांच्यासाठी विविध उपक्रम, मेडिकल कँप्स आणि त्यांच्या विरंगुळ्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
तुम्ही कसं द्याल योगदान: या संस्थेचं मुख्य केंद्र भायखळ्याला आहे. तिथे जाऊन तुम्हीही त्यांच्या कार्याला हातभार लावू शकता. तेथील वृद्धांसोबत चांगला वेळही घालवू शकता. तुमच्या एका भेटीने त्यांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण नक्कीच येतील.
एनजीओकडून केलं जाणारं काम: मुंबईतील अनेक शैक्षणिक एनजीओजपैकी आकांक्षा फाऊंडेशन आहे जे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याचं काम करतं. आकांक्षा संस्थेने मदत केलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी आहेत. त्यापैकी एका रस्त्यावर पुस्तक विकणाऱ्या मुलाचं यश खूपच बोलकं आहे. जो आता अमेरिकेत शिक्षण घेत आहे.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्हीही आकांक्षा फाऊंडेशनच्या मुंबई आणि पुण्यातील सेंटर्सना भेट देऊन मुलांच्या शिक्षणात हातभार लावू शकता. नोंद घ्या की, मुलांशी संवाद साधण्याआधी तुम्हाला इथे ट्रेनिंगही दिलं जातं.
एनजीओकडून केलं जाणारं काम:या एनजीओतर्फे भटक्या प्राण्यांचं रक्षण आणि देखरेख केली जाते. या एनजीओला महापालिकेसोबत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचं काम केल्याने लवकर ओळख मिळाली.
तुम्ही कसं द्याल योगदान: जर तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी काम करू शकता. इथे तुमची भेट अशा व्यक्तींशी होईल जे स्वतःपेक्षाही रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर प्रेम करतात.
संपर्क: +912264222838
पत्ता: Yashwant Chambers, 2nd Floor, B Bharucha Road, Fort, Mumbai
एनजीओकडून केलं जाणारं काम: या संस्थेचं मुख्य केंद्र नवी दिल्लीला असलं तरी त्यांचं मुंबईतील लोअर परेल येथेही ऑफिस आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही या संस्थेच्या कार्यात सहभाग घेऊ शकता.
तुम्ही कसं द्याल योगदान : तुम्हालाही निसर्गाची काळजी असेल आणि निसर्गसंवर्धनासाठी कार्य करायचं असल्यास तुम्ही या संस्थेच्या कार्यात सहभाग घेऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम : सांताक्रूझमधील हा एनजीओमार्फत सामाजिक आरोग्यासाठी काम केलं जातं. ज्यामध्ये खासकरून आई आणि लहान बाळांच्या आरोग्याबाबत काम केलं जातं. या संस्थेतर्फे ही काळजी केली जाते की, 0 आणि 5 वयातील लहान बाळ आणि आईच्या मृत्यूदर कमी होण्याबाबत कार्य केले जाते. हे करण्यासाठी नवजात अर्भकांच्या आईच्या पोषणाची काळजी घेतली जाते. ज्यामुळे अर्भकांची नीट वाढ होईल.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्हीही त्यांच्यासाठी काम करू शकता. फक्त तुमचं वय किमान 18 असलं पाहिजे.
संपर्क: +912226614488
पत्ता: Behind Building 11, BMC Colony, Santacruz West, Mumbai
एनजीओकडून केलं जाणारं काम: एफपीएआय हा भारतातील सर्वात जुना एनजीओ आहे. याचं मुख्य केंद मुंबईतील बजाज हाऊसमध्ये आहे. येथे फॅमिली प्लॅनिंग, स्त्री भ्रूण हत्त्या रोखणे आणि निओनेटल केअर यासंदर्भात कार्य केलं जातं.
तुम्ही कसं द्याल योगदान: या संस्थेतर्फे काही कार्यक्रम राबवले जातात. ज्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता किंवा त्यांची वेबसाईट पाहून तुम्ही त्यांना इतर मदतही करू शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: हा एनजीओ फक्त भारतातच नाहीतर पाकिस्तानमधील अनेक शहरातही कार्यरत आहे. या द रॉबिन हूड आर्मीतर्फे वाया जाईल असे अन्न जमा केले जाते आणि ते गरीब लोकांना वाटले जाते.
तुम्ही कसं द्याल योगदान: या संस्थेसाठी काम करणारे बहुतांश प्रतिनिधी हे विद्यार्थी किंवा तरूण प्रोफेशनल्स आहेत. जे बेघर कुटुंब, नाईट शेल्टर्स, अनाथालय आणि सरकारी रूग्णालयातील गरजू रूग्णांसाठी काम करतात. तुम्ही त्यांच्या या चांगल्या कार्यात सहभाग घेऊ शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: जुनून हे भारतीय कला आणि कलेशी निगडीत सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी कार्य करते. यासाठी संस्थेतर्फे खास वर्कशॉप्स आणि कार्यक्रमही आयोजित केले जातात. ज्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील कलाकारांना त्याची कला मांडण्याची संधी मिळते.
तुम्ही कसं द्याल योगदान: जुनूनसाठी तुम्ही सदस्य म्हणून काम करू शकता. तुम्ही कला आणि कलाकारांमधील दुवा बनू शकता.
एनजीओकडून केलं जाणारं काम: आसरा ही संस्था मानसिक रूग्ण आणि आत्महत्त्येपासून परावृत्त करण्यासाठी काम करते. या संस्थेचे कार्यकर्ते पीडितांची समस्या ऐकून त्यांना आवश्यक मदत करतात. त्या पीडितांबद्दल कोणताही ग्रह न बाळगता किंवा त्यांच्यावर टीका न करता फोन, पत्रांद्वारे किंवा समक्ष भेटून त्यांना आत्मविश्वास दिला जातो.
तुम्ही कसं द्याल योगदान: तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्यात सहभाग घेऊ शकता. त्यांच्या हेल्पलाईन सर्व्हिससाठी सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेऊन मग काम करू शकता. तसंच तुम्ही ब्लॉग्स किंवा सोशल मीडियामार्फत त्यांना पब्लिसिटी आणि निधी उभारण्यासाठी मदत करू शकता.