ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर

Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर

बिग बॉस 13 पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. मग ते रश्मी – सिद्धार्थ शुक्लामधील भांडण असो अथवा आरती सिंहला सिद्धार्थ डे ने बोललेले अपशब्द असोत. पण आता सर्वात जास्त धक्कादायक घडलं आहे ते म्हणजे बिग बॉस 13 चा स्ट्राँग स्पर्धक म्हणून पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारा सिद्धार्थ शुक्ला घराबाहेर झाला आहे. ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि अगदी सिद्धार्थ शुक्लासाठीदेखील धक्कादायक अशी बातमी आहे. सिद्धार्थ शुक्ला पहिल्या दिवसापासून एक अप्रतिम स्पर्धक म्हणून ओळखला जात आहे. त्याची खेळण्याची पद्धत आणि स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी त्याचा वेगळापणा जाणवून देत आहेत. पण त्याचं त्याच्यावर रागावर अजिबात नियंत्रण नाही हे सतत पहिल्या दिवसापासून जाणवत आहे. राग आल्यानंतर सिद्धार्थ कोणाशीही उद्धट पद्धतीने वागतो असं घरातील बऱ्याच मुलींनीदेखील सांगितलं. पण शहनाझ आणि आरतीबरोबर मात्र त्यांचं नातं अतिशय उत्तम आहे. तर माहिरा शर्माशी पहिल्या दिवसापासून त्याचे खटके उडत आहेत. त्याच्यावर ही वेळ माहिरामुळेच आल्याचं व्हिडिओमधून समोर आलं आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ बेघर झाल्याचं दिसून येत आहे. 

Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात

टास्क परफॉर्म करताना सिद्धार्थने केली हिंसा

बिग बॉस हा असा गेम आहे जिथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळतो. इतकंच नाही तर या रियालिटी शो मध्ये कोणीही कोणाचा जास्त विचार करताना दिसत नाही. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सिद्धार्थच्या एका चुकीमुळे तो बेघर झालेला दिसून येत आहे. सगळे स्पर्धक एक टास्क परफॉर्म करत असताना सिद्धार्थने केलेल्या हिंसेमुळे माहिरा शर्माला जास्त लागलं आणि त्याच्या याच चुकीमुळे त्याला घराबाहेर जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. पण यामध्ये किती तथ्य आहे हे प्रेक्षकांना कळून येत नव्हतं. त्यावर सिद्धार्थची मैत्रीण कामया पंजाबीनेदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे नक्की सिद्धार्थ बाहेर होणार की नाही असा प्रश्न उद्भवला आहे. 

Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

ADVERTISEMENT

काय होता टास्क?

स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांना एका ट्रकमधून बॅग फेकायची होती. टास्क सुरू झाल्यावर स्पर्धक धावायला लागले आणि एकमेकांवर बॅग फेकण्याच्या नादात काही घरातल्या स्पर्धकांना त्याचा त्रास झाला. याचदरम्यान सिद्धार्थमुळे माहिरा पडली. यानंतर बिग बॉसने सिद्धार्थच्या या चुकीची शिक्षा त्याला देत त्याला बेघर होण्यास सांगितलं. या व्हिडिओनंतंर सोशल मीडियावर मात्र सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याची बाजू उचलून धरत #WeSupportSidShukla आणि #SidharthShukla असे हॅशट्रग ट्रेंड केले आहेत. सिद्धार्थ हा या वर्षीच्या सीझनमधील सर्वात आवडता आणि प्रसिद्ध स्पर्धक आहे. तर प्रेक्षकांना असंही वाटत आहे की, सिद्धार्थला बेघर करून त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येईल आणि तिथून तो इतर स्पर्धकांवर लक्ष ठेवू शकेल. 

Bigg Boss 13: सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल गजाआड

काय म्हणाली सिद्धार्थची जवळची मैत्रीण कामया?

कामया या शो मध्ये आधी होती त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे इथे असे टास्क असतात की एकमेकांना या दरम्यान धक्काबुक्की होते आणि लागतं. मग सिद्धार्थला त्याची इतकी मोठी शिक्षा होईल असं वाटत नाही. सिद्धार्थ प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक आहे. त्यामुळे या चुकीसाठी त्याला घराबाहेर काढणं योग्य वाटत नाही असंही कामया म्हणाली आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ नक्की घराबाहेर होणार की अजून काही वेगळा डाव असणार हे लवकरच कळेल. पण सिद्धार्थ घराबाहेर गेला तर मात्र बिग बॉसमध्ये इतर स्पर्धकांना टक्कर देण्यसाठी कोणी राहणार नाही असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

05 Nov 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT