ADVERTISEMENT
home / Care
तुमचे केस फारच गळतात का, मग जाणून घ्या ही हेअरफॉलची कारणं

तुमचे केस फारच गळतात का, मग जाणून घ्या ही हेअरफॉलची कारणं

काळेभोर आणि लांबसडक केस सर्वांनाच हवं असतात. केस लांब व्हावेत यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही करता. मात्र वारंवार केस गळण्यामुळे तुमचं लांब केसांचं स्वप्न पूर्ण होत नाही. दर तीन महिन्यांनी थोडेसे केस गळणं हे नैसर्गिक आहे. मात्र जर तुमचे केस सतत गळत असतील तर तुम्हाला त्यामागचं कारण शोधणं गरजेचं आहे. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. यासाठी जाणून घ्या केस का गळतात. 

Shutterstock

केस गळण्याची कारणे –

केस गळत असतील तर त्यावर उपाय करण्यासाठी तुम्हाला केस गळण्यामागची कारणं माहीत असायला हवी. 

ADVERTISEMENT

वाचा – नैसर्गिकरित्या केसांना कर्ल कसे कराल

हॉर्मोनल कारणे –

केस गळण्यामागे तुमच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदल महत्त्वाचे कारण असते. महिलांमध्ये गरोदरपण, मॅनोपॉज, थायरॉईड ग्रंथीची कार्यक्षमता, बाळंतपण अथवा इतर शारीरिक समस्या कारणीभूत असतात. मात्र या अवस्था पार केल्यावर अथवा आरोग्य समस्यांवर योग्य उपचार केल्यावर तुमचे केस पुन्हा पूर्ववत होतात. 

फॅमिली हिस्ट्री –

केस गळण्यामागे अनुवंशिकता हे एक मोठे कारण असू शकते. काही पुरूषांना एका ठराविक कालावधीनंतर टक्कल पडतं.  तुमच्या आई-वडील अथवा बहीण-भावांचे केस ज्या वयात गळू लागतात त्या वयामध्ये तुमचे केस गळण्याची दाट शक्यता असते. 

ताणतणाव –

कामाचा अती ताण अथवा कौटुंबिक चिंतेमुळे तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात. ज्या लोकांना सतत कामाच्या ठिकाणी मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस कामाचाच विषय असतो. कधी कधी काही कौटुंबिक अथवा वैयक्तिक समस्यांमुळे तुम्ही सतत ताणात असता. या कारणांमुळे तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात. 

ADVERTISEMENT

कंगवा चुकीच्या पद्धतीने वापरणे –

केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे. मात्र तुम्ही जर वारंवार कंगवा केसातून फिरवत असाल तर तुमच्या केसांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. केस धुतल्यावर लगेच कंगवा अथवा ब्रशने जोरजोरात विंचरल्यामुळेदेखील तुमचे केस लवकर तुटू शकतात. यासाठी केस कोरडे झाल्यावर केसांमधील गुंता सावकाश सोडवा.

अती गरम पाण्याने केस धुणे –

जर तुम्हाला अती गरम पाण्याने केस धुण्याची सवय असेल तर तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. कारण पाण्याचे तापमान जास्त असेल तर त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज होतात. शिवाय केसांची मुळं यामुळे दुखावली जातात आणि केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. यासाठी केस धुण्यासाठी कोमट अथवा थंड पाण्याचा वापर करा.

हेअर ड्रायर, कर्लर, स्टेटनरचा अती वापर –

काही लोकांना केस धुतल्यावर ते सुकवण्यासाठी दररोज हेअर ड्रायर वापरण्याची सवय असते. ड्रायरमुळे केस केस लवकर कोरडे होतात. नैसर्गिक पद्धतीने केस न सुकल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. कारण हेअर ड्रायरमुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. एखादी स्पेशल हेअरस्टाईल करण्यासाठी कधी कधी हेअर ड्रायर,स्टेटनर, कर्लर वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र नियमित ही साधने वापरण्यामुळे तुमचे केस गळू शकतात. 

केमिकलयुक्त शॅंपूचा अती वापर

केस धुताना दोन पेक्षा अधिक वेळा शॅंपू करू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. केसांना नैसर्गिक तेलाची गरज असते. ज्यामुळे केसांचे पोषण होते आणि केस चमकदार दिसतात. जर केस फार तेलकट अथवा खराब झालेले असतील तरच दोन वेळा शॅंपू करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणार असाल तर एखाद्या सौम्य शॅंपूचा अथवा पॅराबेन फ्री शॅंपूचा वापर करा.ज्यामुळे तुमचे केस फार गळणार नाहीत. 

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य वाचा

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित प्या ‘गाजराचा रस’

ADVERTISEMENT
06 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT