लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे म्हटलं जातं. लहान मुलांना हरप्रकारे आनंद देण्याचा हक्काच दिवस म्हणजे बाल दिन. जो प्रत्येक शाळेत हमखास साजरा केला जातो. देशात हा खास दिवस मुलांसाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून साजरा केला जातो.
Table of Contents
बालदिन का साजरा केला जातो? (Why Do We Celebrate Children's Day)
बालदिन म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस होय. प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. चाचा नेहरू म्हणत असत की,“मुलंही बागेतील कळ्यांसारखी आहेत आणि त्यांचं पालनपोषण हे प्रेमाने केलं पाहिजे. कारण ते देशाचं भविष्य आणि उद्याचे नागरिक आहेत. चला बालदिवसानिमित्त काही खास – children’s day quotes पाहूया
बालदिनासाठी खास कोट्स (Children's Day Quotes In Marathi)
आपलं मुलं हे प्रत्येक आईवडिलांसाठी खासच असतं. याच दिनाच्या निमित्ताने काही खास सुविचार.
“लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.”
“आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता.”
“प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ.”
“मुलांविना घर जसं रिकामं घर.”
“मुलांना शिकवायला हवं की, काय विचार करण्यापेक्षा की, कसा विचार करावा.”
मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत. जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही.
“आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल, पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे.”
“तुम्ही मुलांकडूनही काही गोष्टी शिकता ज्यापैकी एक म्हणजे तुमच्यात किती धीर आहे.”
“मुलांना गरज असते प्रेमाची, खासकरून जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक होते.”
“मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तशी ती घडतात.”
“मुलं भविष्यासाठीची सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे आणि सर्वात चांगली आशा आहेत.”
“आपल्या मुलांच्या इच्छा ऐका आणि त्यांना प्रोत्साहीत करा व त्यांनाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या.”
“प्रत्येक मुलं एक कलाकार आहे, समस्या ही आहे की, एकदा मोठं झाल्यावर आपण आपल्यातला तो कलाकार विसरतो.”
“आपल्या मुलांशी पाच वर्षांपर्यंत प्रेमाने वागा आणि पुढची पाच वर्ष त्यांना हक्काने ओरडा आणि सोळाव्या वर्षी त्यांच्याशी मित्रासारखं वागा. असं केलंत तर तुमचं मुलं तुमचा चांगला मित्र नक्कीच बनेल.
आपल्यात सर्वात मोठा दोष हा आहे की, आपण गोष्टींबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो.
लहानपणीचा तो दिवस मी खूप आठवतो, बालपण असंच भु्र्रकन निघून जातं. जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंत ते भूतकाळ बनतं.
मुलंही खूप चांगली नकलाकार असतात त्यामुळे त्यांना नकला करण्यासाठी चांगल्या गोष्टी द्या.
कधीही आपल्या मुलांना सांगायची संधी दवडू नका की, त्यांच्यावर तुम्ही किती प्रेम करता.
मुलं त्यांच्या आईवडिलांकडूनच आनंदी आणि हसायला शिकतात.
मुलं तिथे जाणं पसंत करतात जिथे उत्साह असतो आणि तिथेच राहतात जिथे प्रेम असतं.
बालदिनाच्या निमित्ताने चाचा नेहरूंचे विचारधन (Jawaharlal Nehru Quotes On Children)
ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वाढदिवशी बालदिन साजरा केला जातो. त्यांनी मुलांविषयी व्यक्त केलेले काही विचार.
मुलं ही महत्त्वाच्या कामातील अडथळा नसून ती स्वतःच एक महत्वपूर्ण कार्य असतात.
मी जो हसतो आणि प्रत्येक दिवशी सकाळी उठण्यासाठी उत्सुक असतो. त्यामागील कारण आहेत मुलं. तेच माझी खुशाली आहेत आणि तेच माझी निराशा आहेत. मुलंच माझं सर्वस्व आहेत.
मुलांच्या सान्निध्यात असल्यावर आत्मा प्रफ्फुलित होते, मनातली सारी वेदना दूर होते.
इतिहास आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाच्या आधारावर तुलना करतो.
सर्व मुलंही देवाव्दारे पाठवण्यात आलेली विशेष भेट आहेत. प्रत्येक मुलं हे वेगवेगळ्या वेळी आपल्या वेगळी भेट देतं.
जी सर्वत्र पसरलेली लोभस सुंदरता आहे. ते सर्व माझ्या मुलांचे चेहरे आहेत.
मुलंही आपल्या आईवडिलांच्या बोलण्यापेक्षा जास्त त्यांच्या वागणुकीकडे सर्वात जास्त लक्ष देतात.
जगात फक्त एकच सुंदर मुलं आहे आणि जे प्रत्येक आईकडे आहे.
माझ्या मुलांना जगातील सर्व चांगल्या गोष्टी मिळू शकत नाहीत ज्या त्यांना हव्या आहेत. पण त्यांच्याकडे एक आई आहे जी त्यांना कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त प्रेम देते.
आपण आपल्या इच्छेनुसार मुलांना घडवू शकत नाही. त्यांच्यावर त्याच रूपात प्रेम करा, जसं देवाने त्यांना पाठवलं आहे. - जवाहर लाल नेहरू.
बालदिनाला तुमच्या बाल्याला आणि इतर चिमुकल्यांना द्या गोड गोड शुभेच्छा.
“चाचांचा जन्मदिवस आहे आज सर्व मुलं येतील, चाचाजींना गुलाब वाहून सारा परिसर सुगंधित करतील Happy Children’s Day”
“चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा.”
तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ...प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी...आनंदी राहा आणि आठवणी जपा...बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.
फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा
काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर....बालदिनाच्या शुभेच्छा.
जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children's Day.