ख्रिसमस म्हणजे भरपूर लाईटींग, डेकोरेशन्स, छान सजलेली ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी गिफ्ट्स आणि केक्स. सगळ्यांसाठी ख्रिसमस हा छान सेलिब्रेशन आणि पार्टीटाईम आहे. काहींसाठी प्रार्थना आणि कुटुंबासोबत घालवण्याचा वेळ आहे. ख्रिसमस कॅरोल्सचा छान आवाज आणि ख्रिसमसची रोषणाई यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न होतं. अशा या सणावेळी सगळ्यांनाच सुट्ट्या असतात. त्यामुळे सगळेच आनंदी असतात. आपला हा आनंद सगळ्यांसोबत शेअर करा ख्रिसमसच्या खास शुभेच्छा आणि सोबतच गिफ्ट्स देऊन.
जर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नसतील तर आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत खास ख्रिसमस स्पेशल शुभेच्छा. या शुभेच्छांमध्ये कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यासाठीही शुभेच्छा आहेत. मग तुम्हीही द्या सगळ्यांना प्रेम आणि आनंदपूर्ण नाताळाच्या शुभेच्छा.
ख्रिसमस म्हटलं की, हॉलिडे आलाच. त्यामुळे ख्रिसमस सीझन म्हणजे हॉलिडे सीझन. या हॉलिडे सीझन आणि नाताळाचा सण अजून सकारात्मक करा या ख्रिसमस कोट्सने.
1. ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.
2. ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.
3. ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.
4. आपल्या ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.
5. या जगात शांतता कायम राहील जर आपण रोजच ख्रिसमससारखा आनंद वाटला.
6. ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी आहे. जेव्हा सगळं जग अगदी सुंदर दिसू लागतं.
7. ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस ट्री खालीही सापडणार नाही.
8. खरा ख्रिसमस तेव्हाच जेव्हा तुम्ही ज्यांना खरंच प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे, त्यांच्यासोबत तो साजरा कराल.
9. हा सण खरंच खास आहे, जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं.
10. ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
आपण नेहमीच काम आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातो. ज्यामुळे आपल्याला आपल्या मित्रांसोबत वेळच घालवता येत नाही. त्यामुळे या ख्रिसमसला वेळ काढून मित्रांना भेटा. शक्य नसल्यास त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा नक्की पाठवा.
1. ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
2. प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.
3. आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
4. देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.
5. तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.
6. तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.
7. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया. जे मी आता मिस करतो. या ख्रिसमलाही एकच मागणं आहे. तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.
8. तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
9. माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस. विशिंग You've been my Santa for so many years. Wishing you a merry little Christmas, fella!
10. माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.
ख्रिसमस हा वर्षातला असा काळ आहे जेव्हा सुट्टीच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येते. कुटुंबासोबत छान वेळ घालवा. जर ते शक्य नसल्यास त्यांच्यासाठी ख्रिसमसच्या शुभेच्छा तरी नक्की द्या.
1. ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया.
2. आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.
3. मला खूप आनंद झाला आहे की यंदाचा ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करत आहे. माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. या जगातच मला माझा आनंद नेहमी गवसला आहे आणि भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस माय स्वीट फॅमिली.
4. आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
5. ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.
6. जरी मी ख्रिसमस कुठेही सेलिब्रेट केला तरी माझं मन नेहमीच माझ्या कुटुंबासोबत असेल. माझ्या प्रिय आईबाबा आणि भाऊ-बहिणींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला खूपच मिस करतोय. मेरी ख्रिसमस.
7. ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत स्पेंड करणं हे माझं सर्वात मोठं ख्रिसमस गिफ्ट आहे. ख्रिसमस म्हणजे कुटुंब आणि कुटंबासोबत केलेली धमाल. मेरी ख्रिसमस.
8. व्हिटेंज ब्रंच, चर्चेस, कुटुंब, गिफ्ट्स, लाईट्स, ख्रिसमस ट्रीज आणि प्रेयर्स याचा आनंद पूरेपूर घेणं म्हणजे ख्रिसमस. तुम्हा सगळ्यांनाही हा आनंद मिळो. मेरी ख्रिसमस.
9. ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट करण्याचा काळ नसून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचाही सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
10. माझ्या कुटुंबाशिवाय हा दिवस मी साजरा करूच शकत नाही. थँक्यू माय वंडरफुल फॅमिली. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.
ख्रिसमसची खरी मजा ऑफिसमध्येच असते. कारण ख्रिसमसच्या वेकेशनआधी मस्त ऑफिसमध्ये डेकोरेशन करण्यात येतं. कोणाचाच काम करण्याचा मूड नसतो. मग भरपूर फोटोज आणि धमाल. मग आपल्या को-वर्कर्सना विश करना तो बनता है.
1. आपण एकत्र काम करणं हे नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारखं आणि मजा असते. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. सुट्टीतही कर धमाल मेरी ख्रिसमस.
2. वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
3. ऑफिसमध्ये काम करणं हे फक्त तुझ्यामुळे मजेशीर आणि आनंददायक आहे. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
4. ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
5. माझा पार्टनर आणि सहकारी असल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे काम करणं अगदी सोपं झालं आहे. हॅव अ ग्रेट ख्रिसमस माझ्या मित्रा आणि सहकारी.
6. ख्रिसमस आणि नववर्षात करूया धमाल. तुझी आणि माझी ऑफिसमधील जोडी आहे कमाल. मेरी ख्रिसमस तुला आणि तुझ्या कुटुंबाला.
7. तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.
8. मला तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं आहे आणि या सुट्टीच्या आधी मी तुला धन्यवाद देऊ इच्छितो. मेरी ख्रिसमस.
9. तुमच्यासारखा प्रोत्साहन देणारा बॉस मिळणं शक्य नाही. तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.
10. तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
ख्रिसमसच्या डेकोरेटेड ट्रीसोबत तुम्ही फोटो तर काढला असेलच. इकडे काही परदेशासारखं फायरप्लेस नसेल पण ख्रिसमस ट्री तर असतेच. मग आता हा फोटो सोशल मीडियावर टाकताना कॅप्शन तर लागेलच. मग खास तुमच्यासाठी ख्रिसमसमध्ये वापरा या सोशल मीडिया कॅप्शन्स.
1. आपण सगळेच स्नो फ्लेक्ससारखे आहोत. एकमेकांपेक्षा वेगळे आहोत पण प्रत्येकामध्ये काहीतरी खास आहे.
2. स्ले माय नेम, स्ले माय नेम
3. मेरी ख्रिसमस पण सर्वात आधी काढूया एल्फी.
4. चला सांतासोबत धमाल करूया आणि गिफ्ट्स लुटूया.
5. आता कुठे ख्रिसमस असल्यासारखं वाटतंय.
6. ख्रिसमसमध्ये दरवर्षी जादू घडल्याप्रमाणे काहीतरी खास घडतंच.
7. हा डिसेंबर बनवूया मेमोरेबल.
8. ख्रिसमसचा आनंद लुटण्याचा सर्वात जास्त चांगला ख्रिसमस सेलिब्रेट करणं.
9. ऑफिशियल हॉट चॉकलेट पिण्याचं ऋृतू आला आहे.
10. ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा.
यंदा ख्रिसमसला द्या खालील प्रेरणादायी शुभेच्छा.
1. चांगलं मन म्हणजे वर्षभराचा ख्रिसमस.
2. ख्रिसमस हा कोणतीही ठराविक वेळ किंवा ऋतू नाही. तर ही मनाची एक स्थिती आहे. जिथे तुम्हाला मिळेल शांतता आणि नव्या वर्षाची नवी उत्सुकता.
3. ख्रिसमसची फक्त पार्टी एन्जॉय करण्याऐवजी त्यामागील संदेश समजून घ्या.
4. ख्रिसमस हा असा काळ आहे जेव्हा लहान मुलं सांताला सांगतात की, त्यांना काय हवंय आणि मोठ्या व्यक्ती त्यांची इच्छा पूर्ण करतात. यातच खरी मजा आहे.
5. ख्रिसमसच्या सुट्ट्या एकट्या, अस्तव्यस्त आणि नाकारलेल्या व्यक्तींसाठी सतावणारा वेळ आहे.
6. आपल्या मनातील जळमटं जोपर्यंत आपणच झटकत नाही तोपर्यंत ख्रिसमसचं हे आनंदी पर्व आपल्यापर्यंत पोचणारच नाही.
7. जेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम देतो तो क्षण म्हणजे ख्रिसमस आहे.
8. ख्रिसमस हा पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याचा आणि मनात दयेची ज्योत जागवण्याचा सण आहे.
9. ख्रिसमस ही एक खरी भावना आहे. लोकांना मदत करण्याची आणि लोकांना आनंद देण्याची.
10. जर मनातच ख्रिसमसचा आनंद नसेल तर तो बाहेरच्या जगातही शोधून सापडणार नाही.
तुम्हाला जर मोठमोठे मेसेजेस किंवा शुभेच्छा तुमच्या जवळच्यांना द्यायला आवडत नसेल तर द्या खालील झटपट शुभेच्छा.
1. तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर
2. या सुट्ट्यांमध्ये अविस्मरणीय आठवणी बनवा. मेरी ख्रिसमस
3. तुमच्या जवळच्यांसोबत आणि मित्रांसोबत हा सण आनंदाने साजरा करा. मेरी ख्रिसमस.
4. तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि समाधानाचा जाओ. मेरी ख्रिसमस.
5. तुमचे हॉलिडेजचं सेलिब्रेशन मजा, सरप्राईजेस आणि आनंदी होवो. मेरी ख्रिसमस.
6. सीझन्स ग्रीटींग्ज्स आणि नववर्षाच्या शुभेच्छा.
7. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
8. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.
9. मेरी ख्रिसमस आणि 2020 या नववर्षासाठी खूप खूप शुभेच्छा.
10. तुम्हा सगळ्यांना ख्रिसमस आणि हे नववर्ष सुखाचं आणि आनंदाचं जावो.
आपल्या जवळच्या व्यक्तींना खास ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील कोट्सही तुम्हाला शेअर करता येतील.
1. देवदूत बनून येईल सांता, सर्व आशा होती पूर्ण तुझ्या, आनंदाच्या भेट देऊन जाईल सांता. ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा.
2. ख्रिसमसचा सण तुझ्या आयुष्यात आणेल आनंद, सांता येईल तुझ्या घरी, शुभेच्छा स्वीकारयला विसरू नकोस.
3. मेरी ख्रिसमस...असा ख्रिसमस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो.
4. चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी, ताऱ्यांनी सजली ही धरती, बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे. मेरी ख्रिसमस.
5. सगळं दुःख विसरून या ख्रिसमला करा सांताचं स्वागत. तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल आनंदाचं नव जग.
6. ख्रिसमससोबत खुलं करूया आनंदाचं आणि समृध्दीचं नवं दालन. मेरी ख्रिसमस.
7. मित्रांमुळे प्रत्येक क्षणच जणू आहे ख्रिसमस, मित्रांमुळे जग आहे, मित्रांशिवाय आयुष्य बेकार आहे. मेरी ख्रिसमस.
8. ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे. फक्त सच्च्या दिलाने तुला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
9. आला तो सण ज्याची बघत होतो वाट, डिसेंबर घेऊन आला आहे आनंदाची बहार. तुला ख्रिसमसच्या गोड शुभेच्छा.
10. तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, मनात असतील अनेक इच्छा हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो. ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.