तुमच्या स्वप्नातही येतो का तुमचा एक्स पार्टनर?

तुमच्या स्वप्नातही येतो का तुमचा एक्स पार्टनर?

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आपल्या आयुष्यातील चांगला वेळ घालवता तेव्हा त्याच्या विषयी मनात विचार येणं साहजिक आहे. ती व्यक्ती भलेही आज तुमच्यासोबत नसो पण त्यांच्या आठवणी तुमच्या मनात कायम राहतात. आपल्या मेंदूतील एक भाग चांगल्या वाईट आठवणी सांभाळून ठेवतो. तुम्हाला असं वाटतं की, जेव्हा तुम्ही तुमच्या एक्स-पार्टनरला पूर्णपणे विसरला आहात आणि मूव्ह ऑन केलं आहे. तेव्हाच अचानक तुमच्या स्वप्नात तुमच्या एक्स बॉयफ्रेंड दिसतो. अनेक मुलींसोबत असंही होतं की, सध्याच्या बॉयफ्रेंडच्या तुलनेत एक्स पार्टनरची स्वप्नं जास्त पडतात. जाणून घ्या नक्की काय कारण आहे ज्यामुळे तुमच्या स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड दिसतो.

  • तुमच्या प्रामाणिकतेशी याचा संबंध नाही 

एक लक्षात घ्या स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड दिसण्याचा संबंध तुमच्या नात्यातील प्रामाणिकतेशी अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही याबाबत निश्चित राहा की, आत्ताच्या जोडीदाराशी तुम्ही प्रामाणिकच आहात. तुमच्या अंतर्मनामुळे या गोष्टी घडतात आणि त्यामुळे स्वतःला याबाबत दोषी ठरवू नका. यावर तुमचा कोणताही कंट्रोल नाही. 

  • असंही नाही की, तुम्ही करता त्याच्यावर प्रेम 

स्वप्नात तुमच्या जुन्या प्रियकराला बघणं याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. त्यामुळे अशी स्वप्नं पाहून चुकीचा अर्थ काढू नका आणि तुम्ही स्वतःला दोषीही ठरवू नका. एक्स स्वप्नात आला म्हणजे आजही तुमचं त्याच्यावर प्रेम आहे असं होत नाही. 

  • मनावर झाला असेल आघात 

अशीही शक्यता असू शकते की, तुमच्या एक्स बॉयफ्रेंडने तुम्हाला खोलवर जखम दिली आहे आणि त्या आघातातून तुम्ही अजूनही बाहेर पडला नाहीत. तुम्ही अजूनही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात की, त्याने नेमकं असं का केलं. 

  • त्याच्यासोबत घालवलेला चांगला वेळ 

दरवेळीच असं आवश्यक नाही की, त्याच्यासोबत तुम्ही वाईट किंवा दुखःद वेळ घालवला आहे. असंही असू शकतं की, तुम्ही त्याच्यासोबत खूप चांगला वेळ स्पेंड केला असेल. त्या चांगल्या क्षणांमुळे तुमचा एक्स बॉयफ्रेंड तुमच्या स्वप्नात दिसत असेल. 

  • एखादं न सुटलेलं कोडं 

अशी एखादी गोष्ट जिचा गुंता आजही  तुमच्या मनात कायम आहे. ज्याबाबतीत तुमच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत तुमचं बोलणं अपूर्ण राहिलं असेल किंवा ज्याचा खुलासा झाला नाही. या सर्व कारणांमुळेही तुम्हाला त्याची आठवण येऊ शकते. त्या अनुत्तरित प्रश्नांमुळेही किंवा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी तो वारंवार तुम्हाला स्वप्नात दिसू शकतो.

मग तुम्हाला पटत आहेत का वरील कारणं. तुमच्या मनात आजही त्याच्याबद्दल काही गोष्टी किंवा अनुत्तरित प्रश्न आहेत का? हा फक्त तुमच्या मनाचा खेळ आहे. त्यामुळे भूतकाळ विसरा आणि वर्तमानात जगा. कारण तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.