खरंच स्वप्नांना काही अर्थ असतो का, जाणून घ्या

खरंच स्वप्नांना काही अर्थ असतो का, जाणून घ्या

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीलाच स्वप्नं दिसत असतात. कधी उघड्या डोळ्यांनी तर कधी बंद डोळ्यांनी स्वप्नं बघितली जातात. तुम्हाला जेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्नं बघायची असतात तेव्हा निदान ती कुठपर्यंत पूर्ण होतील यांची आपल्याला कल्पना असते. पण झोपल्यानंतर आपल्याला जी स्वप्नं दिसतात त्याचा बऱ्याचदा आपल्याला काहीच अर्थ लागत नाही. पण असं म्हटलं जातं की, अशा स्वप्नांनाही अर्थ असतो. काही जणांना स्वप्नांत प्राणी दिसतात, तर काहींना लग्नाची स्वप्नं दिसतात. काही जणांना स्वप्नात देव दिसतात तर काही जणांना आपला मृत्यू दिसतो. पण या सगळ्याचा नक्की अर्थ काय असतो? जुन्या व्यक्तींंच्या सांगण्याप्रमाणे याचे अनेक अर्थ असतात. बऱ्याचदा आपण जे बघतो त्याच्या उलट आपल्या आयुष्यात घडणार असतं असं म्हटलं जातं. पण बऱ्याच जणांना  याचे अर्थ माहीत नसतात. जाणून घेऊया नक्की काय सांगतात ही वाईट स्वप्ने किंवा स्वप्ने.

1. स्वप्नात जेवताना दिसणं

tumblr.com

तुम्हाला जर तुमच्या स्वप्नात एखाद्याबरोबर खाताना अथवा कोणत्याही प्रकारे  तुम्ही काही खात असताना दिसलं तर त्याचा अर्थ तुमच्या प्रोफेशन अथवा करिअरमध्ये काहीतरी चांगली बातमी येणार आहे. तर काही जणांच्या मते तुम्ही जर खाताना दिसलं तर तुम्ही लवकरच आजारी पडणार आहात असंही समजलं जातं. खरंतर याचे अर्थ पूर्वी अनेक प्रकाराने घेतले जायचे. पण अजूनही पूर्वीच्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला आताही याचा अनुभव येताना दिसतो. 

2. कोणाचाही मृत्यू झोपेत पाहणं

tumblr.com

कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू जर तुम्ही झोपेत पाहिला तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीबाबत असं स्वप्नात दिसलं असेल तर घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला  आनंदी व्हायला हवं की, तुमच्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य हे नक्कीच वाढणार आहे. 

3. देवी-देवता दिसणं

tumblr.com

असं म्हटलं जातं की, स्वप्नात कोणत्याही देवाची मूर्ती अथवा देवी दिसणं म्हणजे तुम्ही जे काम करणार आहात त्यामधील प्रयत्न यशस्वी होतील. जर तुम्हाला देवी काही तुमच्या हातात देताना दिसत असेल तर तुम्हाला कोणती तरी मोठी पोस्ट मिळणार असून तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे असंही म्हटलं जातं. 

4. स्वप्नात ढोल वाजवताना दिसणं

tumblr.com

कोणत्याही मुलीला अशा स्वरूपाचं स्वप्नं अर्थात स्वप्नात ढोल वाजवताना दिसलं तर लवकरच तिचं लग्न होण्याचे संकेत असतात. कोणताही अशा प्रकारचा ढोल जर लग्न झालेल्या पुरूषाला स्वप्नात दिसला तर त्याच्या घरी लवकरच लहान बाळ येण्याचे  हे संकेत असल्याचं म्हटलं जातं. 

5. उंदीर दिसणं

Tumblr.com

तुम्हाला तुमच्या स्वप्नात जर मेलेला उंदीर दिसला तर वाईट वाटून घेण्याची गरज नाही. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या आयुष्यातील दुःख आता लवकरच संपून तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं स्वप्नं पडलं तर त्याचा आनंदच साजरा करा. 

बरी-वाईट स्वप्नं पडण्यामागची कारणे

6. फुलपाखरू

tumblr.com

तुम्ही स्वप्नात फुलपाखराच्या मागे धावत त्याला पकडलेलं पाहिलं तर तुमच्यासाठी हे एक चांगलं स्वप्न नक्कीच आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच व्यक्तीशी तुमचं लग्न होणार असल्याचे हे संकेत आहेत. तुम्ही फक्त थोडा प्रयत्न करण्याची गरज आहे. तुमचे दोघांचेही पालक नक्की तुमच्या लग्नासाठी होकार देतील. 

7. कोणताही प्राणी दिसणं

tumblr.com

स्वप्नामध्ये तुम्हाला कोणताही हिंस्र प्राणी दिसला असेल तर त्याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढणार आहेत. एखादा प्राणी तुमच्यावर धावून येताना दिसला तर लवकरच तुमच्यावर मोठं संकट येणार आहे. दुसऱ्या कोणावर तरी हा प्राणी अंगावर धावून जाताना दिसला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतर वाईट घडणार असल्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. 

तुम्हालाही स्वप्नात दिसतात या गोष्टी... जाणून घ्या त्याचा अर्थ

8. मशीन दिसणं

tumblr.com

तुम्ही तुमच्या स्वप्नात ऑफिसमध्ये कामासाठी वापरण्यात येणारी मशीन्स जर तुमच्या स्वप्नात आली तर तुमच्या उद्योगात तुम्हाला यश मिळणार असून अधिक लाभ होणार असल्याचा याचा अर्थ असल्याचं सांगितलं जातं. 

9. डोळे

tumblr.com

तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला तुमचे डोळे लाल दिसले तर तुम्ही लवकरच आजारी पडणार असल्याचं लक्षण मानलं जातं तर सुजलेले डोळे दिसत असतील पण कोणत्याही प्रकारे दुखत नसेल तर त्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी होणार आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.