छोटेखानी असो किंवा ग्रँड पार्टी ही पार्टी असते. या पार्टीतला मेन्यू जितका महत्वाचा असतो त्यापेक्षा जास्त महत्वाची असते पार्टीमधील मजा. कारण पार्टीमध्ये मजा आली तर ती पार्टी आपल्या चांगलीच लक्षात राहते. आता पार्टीमध्ये मजा आणायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही पार्टीमध्ये जर मस्त गेम्स ठेवले तर तुमच्या पाहुण्यांनाही ही पार्टी कायम लक्षात राहील. वेगवेगळ्या थीमच्या पार्टीनुसार कोणते गेम्स ठेवाल ते आता पाहुया.
वेगवेगळ्या कारणांसाठी आपण पार्टी करत असतो. आता प्रत्येक पार्टीसाठी तुम्हाला एकच गेम्स ठेवून चालणार नाही. वेगवेगळ्या पार्टीसाठी तुम्हाला नेमके कोणते गेम्स ठेवता येतील ते पाहुयात
वाढदिवस कोणाचाही असो म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांचा सगळ्यांसाठी आपण केक कापण्याचा कार्यक्रम ठेवतो. पण या गेम्सना रंगत आणण्यासाठी गेम्स ठेवायला मात्र पाहत नाही. वाढदिवसासाठी काय गेम्स ठेवता येतील त्यासाठी काही गेम्स आयडियाज
लागणाऱ्या वस्तू: भरपूर कप्स
कसा खेळायचा: या खेळासाठी तुम्हाला भरपूर कप्स लागणार आहेत. तुम्ही साधारण कोल्ड्रींकसाठी लागणारे ग्लासेस घेऊ शकतात. एका व्यक्तीला डझनभर ग्लासेस किंवा कप्स देऊन तुम्हाला एका मिनिटात सगळ्यात वरचा कप खाली न्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यात वरचा कप वेगळ्या रंगाचा द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोण जिंकलं ते लक्षात येईल. तुम्ही लहान कप्स घेतले तर ते करणे समोरच्याला जास्त कठीण जाईल. वेळ किती द्यायचा ते तुम्हाला ठरवायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: मस्त एक कप कोल्ड्रींक
लागणाऱ्या वस्तू: पाण्याने भरलेली बॉटल, टेबल
कसा खेळायचा: हा खेळ एकदमच सोपा आहे. तुम्हाला प्रत्येकासमोर पाण्याने भरलेली बॉटल ठेवायची आहे. त्याला ती बॉटल फ्लिप करुन पुन्हा आहे तशी उभी करता आली तो स्पर्धक जिंकला या खेळामध्ये फार काही वेळ आणि जागा जात नाही
गिफ्ट आयडियाज: मस्त कोल्ड्रींक किंवा चॉकलेट
लागणाऱ्या वस्तू: एखादा पायपुसण्याच्या आकाराचा कपडा
कसा खेळायचा: हा खेळ म्हणजे एकदम मजाच आहे. ज्याप्रमाणे रनिंग रेस असते. अगदी त्याचप्रमाणे हा खेळ आहे. पण यामध्ये ट्विस्ट असा की, तुम्हाला त्या कारपेटवर स्पर्धकाला बसवून त्याला त्याला ते ओढत ओढत फिनिशिंग लाईनकडे पोहोचायचे आहे. जो कारपेट सकट पोहोचेल तो जिंकला.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट, मिनीएचर परफ्युम
लागणाऱ्या वस्तू: दोन बॉटल, थरमाकोलचे रंगीबेरंगी बॉल्स
कसा खेळायचा: एका बॉटलमध्ये थरमाकोलचे बॉल्स भरा. त्याच्या तोंडाशी दुसरी बॉटल चिकटवा. यासाठी तुम्ही चिकटपट्टीचा वापर करु शकता. आता खेळ असा आहे की, एका स्पर्धकाच्या दोन्ही हातात त्या बॉटल हव्या आहेत. त्याने दोन्ही बॉटल एकाचवेळी उचलून एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत थरमाकोलचे बॉल्स टाकायचे आहेत. ( यासाठी बाटलीचे तोंड लहान हवे)
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट, पेनसेट वगैरे
लागणाऱ्या वस्तू: यासाठी तुम्हाला रेडी गेम्स मिळू शकेल किंवा तुम्ही एखाद्या जाड पुठ्ठ्यावर चित्र घेऊन ते वेडेवाकडे कापू शकता.
कसा खेळायचा: लहान मुलांकडे हा खेळ हमखास असतो. जोडो-तोडो नावाने देखील तो ओळखला जातो. आता जर तुम्ही खूप मोठे चित्र घेतले तर तुम्हाला ते चित्र जोडायलाही तितकाच वेळ जातो. हा खेळ ग्रुपमध्येही खेळता येऊ शकतो.
गिफ्ट आयडियाज: मुलांसाठी लहान गाड्या किंवा टिफिन बॉक्स
लग्नाचा वाढदिवस खासच असतो. जर हा लग्नाचा वाढदिवस पहिला, दहावा किंवा पंचविसावा असेल तर मग तुम्ही चांगली पार्टी ठेवता. अशा या पार्टीसाठी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना बोलावणार असाल तर तुम्ही काही सोपे गेम्स ठेवू शकता.
लागणाऱ्या वस्तू : पेपर, पेन
कसा खेळायचा: उखाण घेणं म्हणजे एक कला आहे. आता या खेळातला ट्विस्ट असा की, पार्टीसाठी उपस्थित कोणाच्याही टेबलवर जाऊन तुम्हाला त्यांना उखाणा घ्यायला लावायचा आहे. उखाण्यासाठी तुम्हाला त्यांना शब्द द्यायचे आहेत. म्हणजे संसार, तुळस, दिवा, चंद्र, प्रेम असे शब्द देऊन तुम्हाला त्यांना त्या शब्दांचा उपयोग करुन उखाणा घ्यायला सांगायचे आहे. एका बाऊलमध्ये शब्दांच्या या चिठ्ठ्या घ्या आणि समोरच्याला निवडायला सांगा.त्याला आलेल्या शब्दावरुनच त्यांना उखाणा घ्यायचा आहे.
गिफ्ट आयडियाज: छान चॉकलेट किंवा एखादे फुल
लागणाऱ्या वस्तू : फुगे, चेअर, गाणी
कसा खेळायचा: तुम्हाला सगळ्यांना गोलाकार आकारात खुर्च्यांवर बसवायचे आहे. किमान 10 लोकांना तरी तुम्ही या खेळात सहभागी करु शकता. एकाच्या हातात फुगा देऊन तुम्ही तो फुगा पास करायला सांगा. छान मोठ्याने म्युझिक लावा. अचानक म्युझिक बंद करा आणि मग ज्याच्याकडे हा फुगा असेल तर त्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिक्षा देऊ शकता. म्हणजे गाणं गायला किंवा डान्स करायला सांगू शकता.
गिफ्ट आयडियाज : चॉकलेट, पेन सेट, तिआरा किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: टेनिस किंवा रबरी बॉल्स, टेबल, टब
कसा खेळायचा: या खेळासाठी तुम्हाला जोडी लागेल. आता हा खेळ असा आहे की, कपल्सना किंवा दोन जणांनी समोरासमोर उभे राहून त्यांना तोंडाने समोर ठेवलेला बॉल उचलायचा आहे. तोंडाजवळच ठेवून त्यांना साधारण दोन ते तीन फुटांवर असलेल्या एका बकेटमध्ये किंवा टबमध्ये हा बॉल टाकायचा आहे. हा खेळ सोपा वाटला तरी यामध्ये कॉर्डिनेशन फार महत्वाचे असते.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट, कपल मिनीएचर परफ्युम
लागणाऱ्या वस्तू: भरपूर प्रश्न
कसा खेळायचा: कपल्स एकमेकांना किती ओळखतात हा खेळ तर खूपच महत्वाचा आहे. तुम्हाला असे काही प्रश्न काढायचे आहे जे तुम्ही अगदी कोणत्याही पाहुण्याला विचारु शकता. उदा. तुमच्या पार्टनरचा आवडीचा रंग, पार्टनरच्या आवडीचे ठिकाण वगैरे वगैरे
गिफ्ट आयडियाज: मस्त कपल परफ्युम
लागणाऱ्या वस्तू: चमचा, लिंबू
कसा खेळायचा: चमचा लिंबू आपण सगळ्यांनीच शाळेत खेळलेला खेळ आहे. आता तुम्हाला यामध्ये थोडा ट्विस्ट द्यायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये कपल्सना सहभागी करुन घ्या. म्हणजे काही अंतर पार झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या पार्टनरला तोंडात चमचा घेऊन उभे करा. त्यांनी आणलेला लिंबू पार्टनरच्या चमच्यामध्ये अलगद टाकल्यानंतर पार्टनरला हा चमचा लिंबू घेऊन फिनिशिंग लाईनकडे जायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: होमडेकोर संदर्भातील काहीही
खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family)
अनेकदा गृहप्रवेशाची पूजा झाल्यानंतर काही खास पाहुण्यांसाठी आपण पार्टीचे आयोजन करतो. म्हणजे गृहप्रवेशाच्या गडबडीत अनेकदा आपल्याला आप्तेष्टांसोबत मजा करता येत नाही. अशावेळी जर तुम्ही छोटेखानी सोहळा घरीच आयोजित करणार असाल तर तुम्हाला छान खेळ खेळता येतील बसल्या जागी तुम्ही हे खेळ खेळू शकता.
लागणाऱ्या वस्तू: हाऊजीची पानं आणि त्याचे नंबर्स
कसा खेळायचा: हा खेळ घरी तयार करावा लागत नाही. अत्यंत माफक दरात हा मिळतो. हा खेळ सगळ्यांनाच माहीत असेल. पण तरीही हा खेळ म्हणजे एक प्रकारचे नशीब आहे. तुमच्या हातात दिलेल्या हाऊजीच्या तिकिटावरील नंबर जर तुम्हाला लागले तर तुम्ही जिंकला असे होते. त्या आधी तीन घऱ, उभी रांग वगैरेसाठीही तुम्ही बक्षीस देऊ शकता.
गिफ्ट आयडियाज: अगदी चॉकलेटपासून छान पर्सपर्यंत काहीही तुम्ही देऊ शकता.
लागणाऱ्या वस्तू: उनोचे पत्ते
कसा खेळायचा: आता तर अगदी शेंबड पोर सुद्धा उनो खेळते. तुम्हाला सारख्या नंबराचे पत्ते टाकायचे असतात. शिवाय काही वेगळी पानं आल्यानंतर त्यानुसार खेळ खेळायचा असतो. या मध्ये महत्वाचे असते ते म्हणजे सुटणे जर तुम्ही लवकर सुटलात याचा अर्थ तुम्ही जिंकलात. पण असे करताना जर तुम्ही पत्ते संपण्याच्या आधी उनो हा शब्द उच्चारला नाही तर तुम्हाला समोरची व्यक्ती त्यासाठी शिक्षा म्हणून एक एक पत्ता देऊ शकते.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट, पेन्स किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: गोटीव पेपर
कसा खेळायचा: पेपरच्या बोट बनवणे आपण लहानपणापासून शिकलो आहोत. पण आता तुम्हाला या पेपर बोट बनवता येतात का? हा आता आपल्याला सगळ्यांना याच कामाला लावायचे आहे. साधारण एका मिनिटात किती पेपर बोट बनवता येतात ते पाहायचे आहे. जास्त बोट बनवणारा विजेता.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट, किचेन, मिनी पर्स
लागणाऱ्या वस्तू: कागद, पेन , चित्रपटांच्या नावाची लिस्ट
कसा खेळायचा: हा खेळ मजेशीर असतो कारण यामध्ये केवळ अभिनयातून तुम्हाला चित्रपटाचे नाव ओळखायचे असते. त्यामुळे तुम्ही एक भली मोठी कठीण चित्रपटाची यादी तयार करुन घ्या. एका चिठ्ठीवर तुम्हाला चित्रपटांची नावे लिहून बाऊलमध्ये टाकायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: मस्त चॉकलेट किंवा तुम्हाला आवडेल असं काहीही
लागणाऱ्या वस्तू: पाणीपुरीचे साहित्य
कसा खेळायचा: पाणीपुरी खाण्यापेक्षा ते बनवून खाणे फारच कठीण असते. त्यामुळे तुम्ही पाणीपुरीचे सगळे सामान समोर आणून ठेवा. एका प्लेटमध्ये पाणीपुरीसाठीच्या पुऱ्या मोजून ठेवा आणि मग काय ऑन युवर मार्क गेट सेट गो म्हणत सुरु व्हा. हा खेळ एकदम मजेशीर आहे.
गिफ्ट आयडियाज: पाणीपुरीशिवाय आणखी काय बेस्ट असून शकतं. अनलिमिटेड पाणीपुरी ...
आता मुलींचे लग्न होण्याआधी जी पार्टी केली जाते त्याला स्पिनस्टर पार्टी असे म्हणतात. या पार्टीमध्ये नुसता हैदौस घालायचा असतो त्यामुळे तुम्ही थोडे बोल्ड गेम्स या पार्टीमध्ये अगदी आरामात खेळू शकता.
लागणाऱ्या वस्तू: स्ट्रॉ आणि प्लास्टिक रिंग्ज
कसा खेळायचा: आता हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला स्पर्धकाच्या तोडांत एक स्ट्रॉ ठेवायला द्यायची आहे. बाऊलमध्ये प्लास्टिक रिंग्ज ठेवून त्या रिंग्ज तोंडातील स्ट्रॉने उचलून स्ट्रॉमध्ये जमा करायच्या आहेत. असे करताना त्यांना आधीची रिंग पाडू द्यायची नाही
गिफ्ट आयडियाज: मेकअपसंदर्भातील काहीही
लागणाऱ्या वस्तू: तांदुळ
कसा खेळायचा: साधारण चार एक जणांचा ग्रुप करायचा आहे. असे तुम्ही जास्त ग्रुप केले तरी चालतील. जितके जास्त ग्रुप तितकी जास्त मजा आता पहिल्या व्यक्तीने मुठीत तांदुळ घ्यायचे आहे. ते तांदुळ पुढच्या व्यक्तीला द्यायचे आहे. असे करताना कमीत कमी तांदुळ पाडून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त तांदुळ शिल्लक राहतील ते विनर
गिफ्ट आयडियाज: हेअर अॅसेसरीज किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू:टिश्यू पेपरचा रोल
कसा खेळायचा: आता ड्रेस मी अप म्हणजे छान तयार होणे. पण टिश्यू पेपरचा वापर करुन तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला सजवायचे आहे. म्हणजे तिला ड्रेसअप करायचे आहे.टिश्यू पेपरने ड्रेसअप करताना फार धम्माल येते.
गिफ्ट आयडियाज: एखादा छान टॉप
लागणाऱ्या वस्तू: केळं
कसा खेळायचा: आता हा खेळ तुम्हाला थोडा नॉटी वाटू शकतो. पण हा खेळ मजेशीर आहे. तुम्हाला यासाठी जोड्या लागतील. कारण एकाने केळं सोलून दुसऱ्या मुलीला ते भरवायचे आहे. दुसऱ्या मुलीचा हात केळ खाताना बांधून ठेवायचा आहे.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट हँपर
लागणाऱ्या वस्तू: कापडापासून तयार केलेली मिशी
कसा खेळायचा: गाढवाला शेपूट लावण्याचा खेळ तुम्ही खेळला असेलच अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला हा खेळ खेळायचा आहे. पण यात फक्त नवऱ्याला मिशी लावायची आहे. तुम्हाला त्यासाठी एका बोर्डवर मुलाचा चेहरा बनवावा लागेल. स्पर्धकाच्या डोळ्याला पट्टी लावून त्याला एकदा गोल फिरवून मिशी लावण्यासाठी सोडून द्यायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: मेकअप किटमधील काहीही
फेअरवेल पार्टी म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याचा क्षण. पण तरीही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देताना तुम्ही थोडी मजा मस्ती तरी चालतेच.
लागणाऱ्या वस्तू: बॉल आणि कप
कसा खेळायचा: दोन जणांना समोरासमोर उभे करुन एकाने बॉल टाकण्याचे काम करायचे आहे तर दुसऱ्याने तो बॉल कपमध्ये झेलायचा आहे. असे करताना तुम्हाला स्पर्धकाला जागा सोडू द्यायची नाही. दोघांमधील अंतर साधारण दोन ते तीन फुटांचे हवे
गिफ्ट आयडियाज: टी- शर्ट किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: पत्ते आणि टेबल
कसा खेळायचा: हा खेळही तुम्ही खूपवेळा खेळला असेल. सोपा वाटणारा पण तितकाच कठीण असा हा खेळ असून तुम्हाला यासाठी केवळ एक टेबल लागणार आहे. त्यावर पत्त्यांचा बंगला तुम्हाला रचायला सांगायचे आहे. या खेळाची रंगत वाढवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ द्या.
गिफ्ट आयडियाज: पेन सेट, मग्ज किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: काहीच नाही
कसा खेळायचा: आता तुम्हाला हा खेळ खेळण्यासाठी सामान लागणार नाही तर एक होस्ट लागेल. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्टाफची तुम्हाला नक्कल करायची असते. पण ही नक्कल कामाची नाही तर त्यांच्या चालण्याची किंवा अशी काही. उपस्थित असलेल्यांची नक्कल करायला परवानगी द्यावी. हुबेहूब अभिनय करणारा ठरेल विजेता
गिफ्ट आयडियाज: टेबल वॉच, पेन केस
लागणाऱ्या वस्तू: बिस्कीट किंवा खाण्याचा असा पदार्थ जो फ्लॅट असेल.
कसा खेळायचा: हा खेळ खूपच मजेशीर आहे. एका खूर्चीवर तुम्हाला स्पर्धकाला बसून त्याच्या कपाळावर त्याला तो पदार्थ ठेवायला द्या. त्याला हात न लावता केवळ हालचाल करुन ते बिस्कीट खाण्याचा प्रयत्न करा.
गिफ्ट आयडियाज: मस्त चॉकलेट हँपर
लागणाऱ्या वस्तू: काहीही नाही
कसा खेळायचा: तुम्हाला एका रांगेत काही जणांना उभे करायचे आहे. एकाच्या कानात एक वाक्य बोलून तेच वाक्य त्याला पुढील व्यक्तीच्या कानात सांगायचे आहे. असे करताना शेवटची व्यक्ती तेच वाक्य नीट सांगते का हे सांगणारा हा गेम आहे.
गिफ्ट आयडियाज: यात तुम्हाला सगळ्या टीमला काहीतरी द्यायचे आहे.
हल्ली लग्न म्हणजे एक दिमाखदार सोहळा असतो. हा सोहळा अजून मजेशीर करण्यासाठी तुम्ही या सोहळ्यात खेळही ठेवू शकता. या खेळामुळे तुमच्या लग्नातला माहोल एकदम हलकाफुलका होईल.
वाचा - घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे
लागणाऱ्या वस्तू: वर्तमानपत्र आणि म्युझिक
कसा खेळायचा: हा खेळही तुम्ही खूप वेळा पाहिला असेल या खेळात तुम्हाला एका पेपर शीटवर कपल्सना उभे करायचे आहे. त्यांना त्यावर डान्स करायचे आहे. त्यानंतर पेपर फोल्ड करुन त्यांना कमीत कमी आकारावर डान्स करायला लावायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: छान कपल्स रिलेटेड गिफ्ट
लागणाऱ्या वस्तू: फुगे आणि चेअर
कसा खेळायचा: या खेळासाठी तुम्हाला भरपूर फुगे लागतील.खुर्च्यांवर कपलपैकी एकाला बसवून तुम्हाला दुसऱ्या पार्टनरने फुगे आणवून द्यायचे आहे आणि खूर्चीवर बसलेल्या जोडीदाराला फुगे हाताने नाही तर त्यावर बसून फोडायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट हँपर
लागणाऱ्या वस्तू: वेगवेगळ्या गृहपयोगी वस्तू ( जसे साबण, ग्रोसरीज वगैरे)
कसा खेळायचा: शॉपिंग करायला सगळ्यांनाच आवडते. पण तुम्ही घेत असलेल्या वस्तूंचे दर आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू दाखवून त्या वस्तूचे दर विचारायचे आहे. हा अंदाज साधारण जवळपास जाणारा असेल तर ती व्यक्ती विजेती
गिफ्ट आयडियाज: त्यातील वस्तू भेट म्हणून द्या.
लागणाऱ्या वस्तू: फुगे
कसा खेळायचा: आता पास द बलून हा असा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला कपल्सच्या पोटाशी किंवा पाठीशी हा बलून द्यायचा आहे. दोघांना हा फुगा हात न पकडता धरायचा आहे आणि फुगा तसाच घेऊन तुम्हाला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे.
गिफ्ट आयडियाज: कपल गिफ्ट हँपर
लागणाऱ्या वस्तू: विशेष काही नाही
कसा खेळायचा: आता हा खेळ तुम्हाला कपलसोबत खेळता येईल. पार्टनरपैकी एकाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना त्यांचा पार्टनर ओळखायला लावायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला साधारण 5 ते 6 लोकांना एकत्र ठेवायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट हँपर, टेबल वॉच किंवा काहीही
सरप्राईज द्यायला आणि सरप्राईज घ्यायला खूप लोकांना आवडते. अशा सरप्राईज पार्टीसाठी ही तुम्ही काही खास गेम्स ठेवू शकता.
लागणाऱ्या वस्तू: मोठी सापशिडी किंवा खडू
कसा खेळायचा: सापशिडी हा खेळ तुम्ही लहानपणापासून खेळला असाल. तुम्ही मोठ्या जागी टाईल्सवर सापशिडी आखू शकता आणि त्यावर लोकांना उभे करु शकता. फासे फिरवून तसेच खेळू शकता.
गिफ्ट आयडियाज: परफ्युम, शो पीस किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: खडू
कसा खेळायचा: खडूने तुम्हाला तळं आणि मळा आखून घ्यायचा आहे. एकाच वेळी त्या वर्तुळात तुम्ही अनेकांना बोलू शकता. एका व्यक्तीला न बघता तळ्यात मळ्यात असे कसेही बोलायला सांगायचे आहे. त्यानुसार स्पर्धकाला तळ्यात मळ्यात उडी मारायची आहे. जो नीट ऐकून शेवटपर्यंत राहील तो विजेता
गिफ्ट आयडियाज: टेबल वॉच, शो पीस किंवा चॉकलेट
लागणाऱ्या वस्तू: काही नाही
कसा खेळायचा: तुम्हाला समोरच्याला 1मिनिटासाठी कच्ची पपई पक्की पपई असे सतत म्हणायला लावायचे आहे.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट किंवा काहीही
लागणाऱ्या वस्तू: फुगे आणि फुगे फुगवण्याचे यंत्र
कसा खेळायचा: फुगे फुगवणे एक कला आहे. फुगे फुगवून गाल दुखू लागतात. त्यामुळे तुम्ही हे काम सोपे करण्यासाठी बलून ब्लोअर देऊ शकता.
गिफ्ट आयडियाज: मिनीएचर परफ्युम
लागणाऱ्या वस्तू: उशी
कसा खेळायचा: तुम्ही बसल्या जागी हा खेळ खेळू शकता. गोलाकार बसवून म्युझिक लावायचे आहे. पिलो पास करत तुम्हाला मध्येच म्युझिक लावायचे आहे. म्युझिक मध्येच थांबवून ज्याकडे पिलो असेल तर त्याला तुम्ही गायला, अॅक्टिंग करायला किंवा ट्रुथ अॅण्ड डेअर द्यायला लावू शकता.
गिफ्ट आयडियाज: चॉकलेट हँपर, वॉच, पेन सेट
अजिबात नाही. प्रत्येक गेम्ससाठी तुम्हाला पैसाच खर्च करावा लागतो असे नाही. कारण पार्टीत मजा आणण्यासाठी आपण जेव्हा गेम्स ठेवतो त्यावेळी त्यात लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे पार्टीमध्ये गेम्स ठेवणे तसे महागात पडत नाही. तुम्ही अगदी बिनधास्त पार्टीमध्ये गेम्स अरेंज करा. खर्चिक गेम्स ठेवू नका. त्यापेक्षा सोपे आणि छान गेम्स ठेवा.
तुमच्या पार्टीनुसार तुम्ही गेम्स अरेंज करत असता त्यामुळे तुम्ही गिफ्ट त्या पार्टीनुसार द्यायला हवे. पार्टी कितीही ग्रँड असली तरी त्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या गेम्सच्या विजेत्यासाठी चॉकलेट, एखादे पेन किंवा एखादा परफ्युम असे गिफ्ट चालू शकते. आता पार्टीला किती जवळची माणसं येणार आहेत. त्यानुसार तुम्ही मोठ्या गिफ्टसची निवड करु शकता. पण शक्यतो पार्टीमध्ये जे गेम्स ठेवले जातात त्यामध्ये छोटे छोटे गिफ्टसच छान वाटतात.
हल्ली डोक्याला जास्त ताप नको म्हणून अनेक जण रेडिमेड गेम्स खरेदी करतात. त्यामुळे तुम्हाला काही विसरल्याची काळजी करावी लागत नाही. जर तुम्ही सतत अशा काही पार्टी अरेंज करत असाल तर तुम्हाला हे गेम्स वेगवेगळ्या पार्टीसाठी वापरता येतील. त्यामुळे तुम्ही रेडीमेड पार्टी गेम्स घ्यायला काहीच हरकत नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.