New Year Quotes In Marathi - नवीन वर्षाची नवी सुरूवात करा या खास शुभेच्छांनी | POPxo

नवीन वर्षाची नवी सुरूवात खास शुभेच्छांनी (Happy New Year Quotes In Marathi)

नवीन वर्षाची नवी सुरूवात खास शुभेच्छांनी (Happy New Year Quotes In Marathi)

काही दिवसांतच नवी वर्ष सुरू होईल. जे प्रत्येकासाठी नवी उमेद घेऊन येईल. कारण प्रत्येकजण नववर्षाच्या निमित्ताने काहीतरी नवीन करण्याचा संकल्प करत असतो. त्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण असतं. मग हा आनंद दुसऱ्यांनाही देण्यासाठी आपण शुभेच्छा देतो. नववर्षाच्या सेलिब्रेशन सोबतच सर्वजण आवर्जून नववर्षाच्या शुभेच्छाही देतातच. मग तुम्हीही आपल्या जवळच्यांचा, मित्रमैत्रिणींचा आणि इतरांचा आनंद द्विगुणित करा या खास मराठमोळ्या नववर्ष शुभेच्छांनी.

Table of Contents

  मित्रमैत्रिणींना द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes For Friends)

  प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं...पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो जे तुम्हाला मनापासून हवं आहे. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 

  • नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो. 
  • कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप. 
  • माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. 
  • जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. 
  • आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन. 
  • सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 
  • या नव्या वर्षात एकच इच्छा आहे माझी, तू आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेव. नववर्षाभिनंदन.
  • येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो. ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो. याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.
  • माझ्यासाठी तर 2019 वर्ष खूपच छान होतं. मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल. असाच सुरू करूया 2020 चा नवा प्रवास.
  • आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे, काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.

  वाचा - मकर संक्रांती व्यंजन

  Shutterstock
  Shutterstock

  नववर्षाच्या खास शुभेच्छा कुटुंबासाठी (New Year Wishes For Family)

  काहीजण कुटुंबाच्या जवळ असतील तर काही जण कुटुंबापासून लांब असतील तरी नववर्षाचा आनंद तर सेलिब्रेट केलाच पाहिजे. मग तुमच्या कुटुंबालाही द्या खास शुभेच्छा. 

  • नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन.
  • तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.
  • जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंस करा. देवाकडे करतो हीच प्रार्थना या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या.
  • कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे जे सगळ्यांना मिळालं आहे. हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत अजून चांगल्या आठवणी देणारं जावं.
  • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या नववर्षाच्या खास पर्वावर खूप खूप शुभेच्छा.
  • मी खूप लकी आहे की, मला चांगली आणि प्रेमळ फॅमिली मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असंच हसू कायम राहो.
  • या नववर्षाच्या मोक्यावर मला माझ्या कुटुंबाला एकच गोष्ट सांगायची आहे की, माझ्यासाठी तुमचं सुख आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि कायम राहील. हॅपी न्यू ईयर.
  • चला हे नववर्ष सार जुनं आणि वाईट विसरून नव्या उत्साहाने सुरू करूया.
  • तुझ्यासारखी आई असणं ही देवाचीच कृपा आहे. मला देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत. तुझा आशिर्वाद या नव्या वर्षातही माझ्यासोबत कायम राहो आई.
  • हॅपी न्यू ईयर टू आईबाबा, माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी ऋणी आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप प्रेम.

  ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा

  हॅपी न्यू ईयरसाठी खास कोट्स (Happy New Year Quotes In Marathi)

  नव्या वर्षासाठी खास कोट्स जे तुम्हाला देतील नव्या वर्षातील यशाच्या प्रवासासाठी प्रेरणा. 

  • चिअर्स टू न्यू ईयर आणि नव्या संधीसाठी जी तुम्हाला नेईल यशाच्या शिखरावर.
  • भविष्य जाणून घ्यायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा शोध घेणे. हॅपी न्यू ईयर.
  • एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण फक्त करणंच नाहीतर त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे. नव्या वर्षात नव्या संधी मिळवा. हॅपी न्यू ईयर.
  • नव्या वर्षाचं ध्येय नव्या वर्षात फक्त नव्या गोष्टी मिळवणं नसून नव्याने जगणंही आहे.
  • नव्या वर्षाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नवी आशा.
  • जे स्वतःला धोक्यात घालून काहीतरी मिळवतात त्यांनाच यश मिळतं. मग नव्या वर्षातही यश मिळवण्याची धडपड सुरू ठेवा.
  • वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून त्यात आहे नव्या वर्षाची सुरूवात.
  • एक जानेवारी म्हणजे 365 पानांच्या पुस्तकाचं पहिलं कोरं पान आहे. मग छान नवीन कथा लिहा.
  • एखादी गोष्टी किती हळू होत आहे याला महत्त्व नाही. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही.
  • नवं ध्येय किंवा नवं स्वप्नं पाहण्याचं कोणतंही वय नसतं. मग नवीन वर्षातही तुमचा प्रवास कायम ठेवा.

  मजेशीर न्यू ईयर मेसेजेस (Funny Messages On New Year)

  Shutterstock
  Shutterstock

  नववर्षाची सुरूवात करूया मजेशीर न्यू ईयर मेसेजेस. तेच तेच कॉमन मेसेज फॉवर्ड करण्यापेक्षा द्या या मजेशीर शुभेच्छा. 

  • पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम, मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,विश यू ए हॅपी न्यू ईयर.  
  • वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन 
  • सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील, एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला, नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा. 
  • कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर, आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी? त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
  •  नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत, नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी, कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल, आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg. मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.
  •  आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2021
  • इतिहास साक्षी आहे…जेव्हा नववर्ष आलं आहे…तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.
  • ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो. या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे देव करो तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.
  • नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स, जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो. मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. 
  • मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे. पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.

  नववर्षासाठी प्रोत्साहनपर मेसेजेस (New Year Motivational Messages )

  नववर्षाची सुरूवात चांगली आणि सुंदर होईल, जेव्हा तुम्ही वाचाल हे प्रोत्साहन देणारे हॅपी न्यू ईयर मेसेजेस.  

  • नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
  • जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की, तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील. नववर्षाभिनंदन.
  • जानेवारी गेला फेब्रुवारी गेला, संपले सगळे सण, नव्यावर्षाच्या आगमनात सगळे जण आहेत गुंग. मंगलमय जावो तुमचे 2020 हे वर्ष.
  • आनंदाच्या रंगानी भरलेलं असो नवंवर्ष, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • अशीच आशा करतो की, तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ, राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात, येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो.
  • आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो, प्रत्येक दिवस आनंदी असो. हॅपी न्यू ईयर.
  • नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात, प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण, हॅपी न्यू ईयर.
  • सूर्यासारखी प्रकाशमय होवो तुमची जिंदगी, चांदण्यांसारखी चमकत राहो तुमची जिंदगी हीच आहे शुभेच्छा माझी.
  • जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो. मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात. हॅपी न्यू ईयर.
  • नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे, पेन म्हणजे तुमचा हात आहे. आता तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे. नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

  ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज

  व्हॉट्सअपसाठी हॅपी न्यू ईयर स्टेटस (Happy New Year Status For Whatsapp)

  Shutterstock
  Shutterstock

  सोशल मीडियावर तर नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा देणे जणू कंपल्सरी आणि सोपेही झाले आहे. मग तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवरून द्या खास नववर्षाच्या शुभेच्छा.  

  • तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं आणि मनात असतील ज्या काही इच्छा-आकांक्षा. या नववर्षात त्या होवोत खऱ्या ही आहे मनापासून इच्छा.
  • सर्वांच्या मनात सर्वांसाठी असावे प्रेम, येणारा प्रत्येक दिवस आणो आनंदाचा क्षण, नव्या उमेदीसोबत सगळं दुःख विसरून करा नव्या वर्षाला वेलकम.
  • या वर्षाच्या सूर्याचा अस्त होण्यापूर्वी आणि जुनं कॅलेंडर भिंतीवरून काढण्यापूर्वी, दुसऱ्या कोणी तुम्हाला विश करण्यापूर्वी मी तुम्हाला देत शुभेच्छा. तुमच्यासाठी येणारं वर्ष जावो जबरदस्त. नववर्षाभिनंदन.
  • नव्या इच्छा नवी उमेद...मनात एक स्वप्न नवंसं नवं वर्ष, नव्या वर्षाचं स्वागत नव्या अंदाजाने करा.
  • जुनं वर्ष जात आहे सगळ्यांपासून दूर, काय करणार निसर्गाचा हा आहे नियम, जुन्या गोष्टींचा विचार करून तुम्ही होऊ नका उदास, करा नव्या उमेदींसोबत नव्या वर्षाचा स्वीकार.
  • आपण एकमेकांपासून लांब असलो तरी मनातून जवळ आहोत, म्हणूनच न सांगताही एकमेकांचं दुःख समजून घेतो. नव्या वर्षातही असंच राहूया. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • चंद्राला मिळावी चांदणी, कवीला मिळावी कविता, माझ्याकडून तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा.
  • फुल आहे गुलाबाचा, त्याचा सुवास घ्या. पहिला दिवस आहे नववर्षाचा, त्याचा आनंद घ्या. वर्ष येतं वर्ष जातं. मित्रांनो या नव्या वर्षात तुम्हाला ज्याची इच्छा असेल ते मिळो. हॅपी न्यू ईयर. 
  • हॅपी न्यू ईयर ही माझी तुला आहे विश. जी पाठवत आहे विथ एक किस.

  हॅपी न्यू ईयर कोट्स तुमच्या प्रेमासाठी (New Year Quotes For love)

  Shutterstock
  Shutterstock

  तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास हॅपी न्यू ईयर कोट्स. कारण त्या व्यक्तीबरोबर नववर्षाची सुरूवात करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. 

  •  डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
  • ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी, अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी. विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.
  • या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं, प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय. यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
  • गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.
  • या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव. प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र. माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.
  • कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही. पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.
  • चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.
  • हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2019 चा प्रवास, अशीच राहो 2020 मध्येही आपली साथ.
  • नव्या वर्षाच्या सकाळ समवेत, तुमचं आयुष्य व्हावं प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा अपरंपार. 

  मुलांसाठी ख्रिसमसची खास 80 गिफ्ट्स