ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
बेसन कढीमुळे मिळतात अफलातून फायदे, जाणून घ्या

बेसन कढीमुळे मिळतात अफलातून फायदे, जाणून घ्या

बेसन ही आपल्या रोजच्या आयुष्यातील खाण्यात वापरायची गोष्ट आहे. आपण बेसनाची कढी नेहमीच स्वयंपाकात करत असतो.  चवीला आंबट गोड लागणारी कढी सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का? बेसनाच्या या कढीमुळे आपल्या आरोग्याला अफलातून फायदे मिळतात. खरं तर बेसन कढीमध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजं असतात.  ज्यामुळे तुमच्या शरीराची योग्य वाढ होण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम आणि फॉस्फरसचंदेखील जास्त प्रमाण असतं. बेसन कढी ही आपल्या नेहमीच्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. पण त्याचे फायदे नक्की काय आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला बेसन कढीचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. याचा स्वाद आणि खमंग सुवासिक वास हे याचं वैशिष्ट्य आहे. नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमच्या तोंडालाही सुटलं ना पाणी? चला तर मग जाणून घेऊया बेसन कढीने काय फायदे होतात – 

1. वजन कमी करण्यासाठी ठरतं फायदेशीर

Shutterstock

बेसनची कढी म्हणजे त्यामध्ये ताक आणि बेसनाचा वापर केला जातो. बेसनामध्ये गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये अधिक प्रथिनं असतात. तसंच यामधील फोलेटच्या कमी प्रमाणामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत मिळते. याशिवाय बेसनाच्या कढीमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे बेसन कढी केल्यानंतर तुम्ही ती खाण्यासाठी संकोच करू नका. याने तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

2. पिंपल्स करते दूर

तुम्हाला जर चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर तुम्हाला कढी पिणं हा उत्तम घरगुती उपचार आहे. बेसन तुम्ही चेहऱ्याला लावता ते चांगलंच. पण तुम्ही कढी करून प्यायल्यासदेखील त्याचा फायदा होतो. बेसनामध्ये उष्णता कमी करण्याचे गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुम्ही जेव्हा बेसनाची कढी पिता तेव्हा तुमची त्वचा अधिक तजेलदार दिसते. 

पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

3. शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास होते मदत

Shutterstock

ADVERTISEMENT

तुमच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर तुमच्यासाठी कढी फायदेशीर ठरते. कारण बेसनाच्या कढीमध्ये जास्त प्रमाणात लोह, खनिजं आणि प्रथिनं असतात. ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. 

4. गर्भवती महिलांना मिळतो फायदा

बेसनाच्या कढीमध्ये फॉलेट, व्हिटामिन बी 6 आणि लोह याचं प्रमाण असतं. जे गर्भवती महिलांच्या शरीरासाठी गरजेचं असतं. तसंच शरीराला आवश्यक असणारे घटक यामध्ये असतात जे गर्भपात होण्याची शक्यता कमी करतात. म्हणूनच अगदी पूर्वीचे लोकंसुद्धा गर्भवती महिलांना बेसनाची कढी पिण्याचा सल्ला देतात. डॉक्टरही तुम्हाला बेसनाची कढी प्यायला सांगतात. यातून बाळाला आवश्यक पोषक तत्व जास्त प्रमाणात मिळतात. 

मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त

5. हृदय निरोगी ठेवण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

कढीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण तुम्हाला आढळतं. त्यामुळे तुमच्या शरीरातील मांसपेशींना योग्य आराम मिळतो आणि तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते. तुमचं हृदय निरोगी राहण्यासाठी तुम्ही नेहमी बेसनाच्या कढीचा आस्वाद घ्यायला हवा. किमान आठवड्यातून एक वेळा तरी तुम्ही बेसन कढी खावी. 

6. रक्तातील साखरेवर आणते नियंत्रण

आजकालच्या धावत्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना मधुमेह अथवा रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण जास्त झालं आहे. पण तुम्हाला ही समस्या असेल तर त्यावर बेसन कढी हा रामबाण उपाय आहे. मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी कढी एका औषधाप्रमाणेच करते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असल्याने तुमच्या शरीराला याचा फायदा होतो आणि साखरेचं रक्तातील प्रमाण नियंत्रित राहातं. 

सकाळच्या घाईत झटपट बनवा टेस्टी नाश्ता, जाणून घ्या रेसिपीज

ADVERTISEMENT

7. सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यास होते मदत

Shutterstock

ताक असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की, बेसन कढी प्यायल्याने सर्दी खोकला होण्याची शक्यता आहे. पण हे चूक आहे. खरं तर थंडीच्या दिवसात तुम्हाला सर्दी आणि खोकला या आजारांपासून सुटका मिळवायची असेल तर गरमागरम बेसन कढी हा उत्तम उपाय आहे. आपण विविध उपाय करण्यापेक्षा गरमागरम कढी पिणं हा उपाय केल्यास,  सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहण्यास मदत होते.  

8. आतड्यांसाठी लाभदायक

बेसन कढीमध्ये जीवाणूंना मारक पोषक तत्व असतात. त्यामुळे बेसनाची कढी खाणं तुमच्या आतड्यांसाठी लाभदायक ठरतं. तुमच्या शरीरातील पोषक तत्व सुधारण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या शरीराची पचनक्रिया कढी पिण्याने चांगली राहते. 

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

15 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT