ADVERTISEMENT
home / आरोग्य
बहुगुणी हिरड्याचे आहेत ‘हे’ अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Harad In Marathi)

बहुगुणी हिरड्याचे आहेत ‘हे’ अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Harad In Marathi)

 

 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारासोबतच काही आयुर्वेदिक आणि घरगूती उपचार तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला एका नैसर्गिक आणि घरगुती औषधाबाबत माहिती देत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. हिरडा या औषधी वनस्पतीबाबत तुम्ही  सर्वांनी नक्कीच ऐकलं असेल. या नैसर्गिक औषधामध्ये अनेक आजारापणांना दूर ठेवण्याची ताकद असते. आर्युर्वेदात याबाबत अनेक संदर्भ आढळतात. प्राचीन काळापासून हे औषध विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी वापरलं जातं. इंग्रजीत या औषधाला Terminalia chebula असं म्हणतात. तर हिंदीत हरड आणि संस्कृतमध्ये हरितकी म्हटलं जातं. हिरडा हे एक प्रकारचे औषधी  फळ आहे. उत्तर भारतात हे औषध मोठ्या प्रमाणात मिळते. विषेशतः भारतातील हिमालय प्रदेशातील रावीच्या किनारापासून ते अगदी पूर्व बंगाल, आसामपर्यंत ही वनस्पती उगवते. हिरड्यामध्ये बाळ हिरडा, चांभारी हिरडा, सुरवारी हिरडा आणि रंगारी हिरडा असे अनेक प्रकार आढळतात. हिरड्याच्या फळांना गोड, आंबट, कडू, तुरट, तिखट अशी चव असते. ज्यामुळे तुमचा वात, पित्त आणि कफ दोष नियंत्रणात राहण्यास मदत होते. या औषधी वनस्पतीची साल, फळं आणि मुळांचा  औषधाप्रमाणे वापर केला जातो. हिरडाचे फळ पिकल्यावर त्याचा हिरवेपणा संपून ते काळसर दिसू लागते. मात्र हिरडा औषधासाठी वापर करण्यापूर्वी या वनस्पतीविषयी सारं काही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हिरडा जसा आरोग्यदायी आहे तसंच काही वेळा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच हिरड्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या. 

shutterstock

ADVERTISEMENT

 

 

जाणून घ्या हरडामधील औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Harad)

हिरडा या वनस्पतीमध्ये अनेक औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात. हिरडा आरोग्यासाठी अतिशय पोषक असतं. यामध्ये  व्हिटॅमिन्स सी आणि पोषक घटक असतात. म्हणूनच जर तुमच्या शरीरात व्हिटॅमीन सीची कमतरता असेल तर हिरडा खाण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. 

हिरड्याचे 15 आरोग्यदायी फायदे (15 Health Benefits Of Harad In Marathi)

हिरड्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यासोबत तुम्ही अनेक आजारपणांना दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. तज्ञ्जांच्या सल्लानूसार तुम्ही काही आजारपणांवर हिरडाचा वापर करता येतो. हिरड्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येतात.यासाठीच खाली दिलेल्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी करा हिरड्याचा असा वापर.

ADVERTISEMENT

1. सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी (To Cure Cold And Cough)

आजकालच्या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे तुम्हाला सतत सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही हरड वापरू शकता. कारण तुमच्या शरीरातील कफदोष संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी मधात हिरड्याची पावडर मिसळून त्याचे एक चाटण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घ्या ज्यामुळे रात्री तुम्हाला निवांत झोप लागेल. नियमित हा उपचार केल्यामुळे हळूहळू तुमचा खोकला अथवा सर्दी कमी होईल. 

shutterstock

2. वजन कमी करण्यासाठी (To Loose Weight)

हिरड्यामध्ये तुमचे शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आतड्यांना आराम मिळतो. पोट साफ असेल  अनेक आजारपणं आपोआप कमी होतात. याशिवाय तुमचे वजन देखील संतुलित राहते. त्यामुळे जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर हिरडा तुमच्या फायद्याची वनस्पती आहे. नियमित हिरडा कोमट पाण्यातून घ्या आणि वजन कमी करा. 

ADVERTISEMENT

3. घसा खवखवणे कमी करण्यासाठी (Reduces Sore Throat)

कधी कधी तेलकट पदार्थ, हवामानातील प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे तुम्हाला  घशाचे इनफेक्शन होते. ज्यामुळे घसा बसणे अथवा घसा खवखवण्याचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्हाला वारंवार असा त्रास होत असेल तर तुम्ही हिरड्याच्या पाण्याने गुळण्या करू शकता. कोमट पाण्याने केलेल्या या गुळण्यांमुळे तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळेल. गायक अथवा निवेदकांनी हा उपाय केल्यामुळे त्यांच्या आवाज अधिक सुरेल आणि स्पष्ट होऊ शकतो. 

4. मायग्रेनचा त्रास कमी होतो (Reduces Migrane)

मायग्रेनचा त्रास असेल तर जीवन जगणं अतिशय कठीण जातं. कारण या आजारपणात तीव्र डोकेदुखीला सामोरं जावलं जागतं. जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यातून हिरड्याची पावडर घ्या आणि डोकेदुखी कमी करा. 

5. मुळव्याधीवर उपयुक्त (Useful In Rooting)

मुळव्याध ही अशी एक समस्या आहे. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. मुळव्याधीमुळे पोट स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे सौचाला जाणं आणखी त्रासदायक होतं. मात्र जर तुमच्या घरी हिरड्याची पावडर असेल तर काळजी  करण्याची मुळीच गरज नाही. कारण तुम्ही पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.  

6. डोळ्यांच्या समस्या दूर होतात (Prevents Eye Problems)

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्ही  हिरड्याचा वापर तुमच्या डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील करू शकता. कारण हिरडा डोळ्यांसाठी एक उत्तम औषध आहे. यासाठी हिरड्याच्या पाण्याने तुमचे डोळे स्वच्छ करा. नेत्र विकारा दूर करण्यासाठी आणि दृष्टीदोष कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

7. मूत्र विकारांवर उपयोगी (Useful In Urinary Disorders)

जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे. युरीनला गेल्यावर जळजळ होणे, युरीनचे प्रमाण कमी असणे अथवा सतत युरीन इनफेक्शन  होणे असे त्रास होत असतील तर हिरड्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी मधातून हिरड्याची पावडर घातलेले चाटण दिवसभरात दोन वेळा घ्या. 

8. तोंडाचा अल्सर अथवा तोंड येण्यावर उपाय (Remedies For Mouth Ulcer)

जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या होत असेल तर त्यासाठी हिरड्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी हिरडाचे फळ उगाळून ती तोंडातील फोडांवर लावा. ज्यामुळे तुमच्या तोंडातील जखमा बऱ्या होतील. 

9. जखमा आणि सूज कमी करण्यासाठी (Reduces Wounds And Swelling)

जखमा बऱ्या करण्यासाठी अथवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. कारण हिरडा तुमच्या शरीरातील सूजेला कमी करून शरीराचा दाह कमी करण्यास मदत करतो. यासाठी जखम अथवा सूज कमी करण्ययासाठी हिरडा कोमट पाण्यातून पिण्याचा सल्ला दिला जातो. हिरडा आणि सेंद्रिय गूळापासून तयार केलेले लाडू खाण्यामुळे देखील शरीराचा दाह कमी होतो आणि जखमा बऱ्या होतात. 

ADVERTISEMENT

shutterstock

10. अॅसिडिटी होते (Acidity)

हिरड्याचा वापर अॅसिडिटीवर केला जातो. कारण हिरड्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. हिरडा तुमच्या पोटातील गॅस, अपचन कमी करण्यास मदत करतो. यासाठी अॅसिडिटी कमी करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा हिरडाचुर्ण रोज रात्री झोपताना घ्या. ज्यामुळे तुमचा अॅसिडिटीचा त्रास नक्कीच कमी होईल. 

11. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी (Reduces The Pain Of Constipation)

ज्यांना बद्धकोष्ठताचा त्रास होतो त्यांना हिरडा वरदान ठरू शकतं.  संशोधनानुसार हिरड्यामधील औषधी गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकतो. यासाठी तज्ञ्जा हिरड्याचा कच्च्या फळांचा गर मीठासोबत खावा. दालचिनीसोबत हिरड्याचे चुर्ण घेण्यामुळेदेखील तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. ज्यामुळे शरीरातील आतड्यांची शुद्धी होते आणि सौचाला साफ होण्यास मदत होते. 

12. सांधेदुखीवर उपचार (Treatment For Joint Pain)

हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते. बऱ्याचदा सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही एखादी पेनकिलर घेता मात्र त्यामुळे ते दुखणे तात्पुरते थांबते  आणि पुन्हा थोड्यावेळाने सुरू होते. मात्र सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर नक्कीच करू शकता. 

ADVERTISEMENT

13. लहान बाळाची पोटदुखी कमी करण्यासाठी (Cures Baby’s Gastric Problems)

आईचे दुध पिणाऱ्या तान्हा बाळांना बऱ्याचदा  पोट दुखीचा त्रास होतो. पोटात गॅस झाल्यामुळे ही लहान  मुलं रडतात. लहान असल्यामुळे ती बोलून त्यांचं दुखणं सांगूही शकत नाही. त्यांच्या रडण्यातून त्याच्या आईला आणि डॉक्टरांना त्याची ही समस्या समजते. मात्र बाळघुटीतील हिरड्यांचे दिल्यामुळे बाळाच्या पोटातील गॅस कमी होऊ शकतो. मात्र हे चाटण देण्यापूर्वी बालरोग तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या. 

14. जुलाबाचा त्रास कमी होतो (Deficiency Of Laxatives)

दूषित अन्न अथवा पाण्यामुळे जुलाबाचा त्रास होतो. जुलाब वारंवार झाल्यामुळे पोटातील पाणी कमी होते आणि पोटात दुखू  लागते. मात्र असं असल्यास तुम्ही हिरडा तोंडात ठेवून तो चघळल्यास चांगला फायदा होईल. एक तासाच्या आत तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. 

shutterstock

ADVERTISEMENT

15. दातांना चमक देण्यासाठी (For Glowing Teeth)

पांढरेशुभ्र आणि निरोगी दात प्रत्येकालाच हवे असतात. मात्र त्यासाठी नियमित दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. दातांची निगा राखण्यासाठी तुम्ही हिरडा चुर्णाने दात घासू शकता. हिरडा चुर्ण दंतमंजनप्रमाणे वापरल्यास दात निरोगी राहतात शिवाय दात चमकदारही होतात. 

हिरड्याच्या सेवनाने होऊ शकतात हे साईड इफेक्ट (Side Effects Of Harad)

हिरडा आरोग्यासाठी उत्तम आहे हे तर आपण जाणतोच मात्र हिरड्याचा वापर काही वेळा धोकादायकही  ठरू शकतो. कारण हिरडा ही एक उष्ण प्रवृत्तीची वनस्पती आहे. म्हणूनच गरोदरपणात हिरड्याचा वापर मुळीच करू नका. त्याचप्रमाणे तान्हे बाळ आणि पाच वर्षांच्या खालील मुलांना हिरडा अतीप्रमाणात देणे धोकादायक ठरू शकते. यासाठीच स्तनपान देणाऱ्या मातेनेही हिरड्याचा वापर आहारात करू नये. 

shutterstock

ADVERTISEMENT

हिरड्याबाबत असलेले काही निवडक प्रश्न FAQs

1. हिरड्याचा वापर त्वचेसाठी करू शकतो का?

नक्कीच जर तुम्हाला अॅक्ने अथवा पिंपल्स असतील तर तुम्ही  त्यावर हिरड्याचे चुर्ण अथवा हिरड्याचे पाणी लावू शकता. ज्यामुळे तुमचे एक्ने कमी होतील.

2. हिरडा केसांसाठी उपयुक्त आहे का ?

होय, हिरडा पावडर नारळाच्या तेलात मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. हिरड्यामधील औषधी गुणधर्मांमुळे तुमचे केस गळणे, कोंडा कमी होण्यास मदत होते. 

3. उलटीचा त्रास कमी करण्यासाठी हिरड्याचा वापर कसा करावा ?

जर तुम्हाला उलटीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधासोबत हिरडा चुर्णाचे चाटण घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला उलटी आणि मळमळीपासून होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी

ADVERTISEMENT

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत

How to use Harad in Hindi

04 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT