खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफांईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात. यासाठीच जाणून घ्या खडीसाखर खाण्याचे फायदे (khadi sakhar benefits in marathi)
खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.आर्युवेदानुसार खडीसाखर ही थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. रिफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असते. कारण खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड असतात. भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी12 खडीसाखरेतून मिळू शकते. एका पंधरा ग्रॅंमच्या खडीसाखरेतून तुमच्या शरीराला जवळजवळ 60 कॅलरिज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर उपयोगाची नक्कीच आहे. यासाठी जाणून घ्या खडी साखर खाण्याचे फायदे
खडीसाखर तुम्ही अनेक आरोग्य समस्या कमी करण्यासाठी वापरू शकता. निरोगी राहण्यासाठी खडीसाखरेचा वापर कसा करावा हे जरूर वाचा.
जर तुम्हाला सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता. जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेल तर खडीसाखर अथवा पत्री खडीसाखर तुमच्या जवळ ठेवा. खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खोकला थोडावेळ थांबेल. खडीसाखर चावून खाऊ नका. खडीसाखर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचं घशाचं इनफेक्शन कमी होईल. शिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यामुळे तुमच्या खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल
खडीसाखरेमुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.
खडीसाखरेचा उपयोग तुम्ही फक्त मुखवासासाठीच नाही तर अन्नाचे योग्य पचन व्हावे यासाठीही करू शकता. यासाठी जेवणानंतर बडीसोप आणि खडीसाखर खाण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते. जेवणानंतर खडीसाखर खाण्यामुळे अन्न लवकर पचते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरीत थांबू शकतो. बऱ्याचदा अनेकांना उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तोंडात एखादा खडीसाखरेचा खडा टाकणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात पाण्यात खडीसाखर टाकून ते पाणी पिण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार खडीसाखर ही शुक्राणूवर्धक आहे. ज्या जोडप्यांना बाळासाठी प्रयत्न करूनही गर्भ राहण्यास अपयश येत असेल तर त्यांनी खडीसाखरेचे पाणी नियमित पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास अक्रोड, केसर आणि खडीसाखर एकत्र करून खावी.
खडीसाखर खाण्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायले तर तुम्हाला दृष्टीदोष कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून तुमचा बचाव होतो. जर तुम्हाला खडीसाखरेचे चांगले फायदे हवे असतील तर खडीसाखरेची पावडर करून वापरा.
खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल शिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि दाहही कमी होण्यास मदत होईल.
जर तुम्ही दिवसभर दगदग केली असेल अथवा तुम्हााला फार थकल्यासारखं वाटत असेल. तर नक्कीच तुम्ही फ्रेश वाटण्यासाठी खडीसाखरेचा वापर करू शकता. यासाठी प्रवासाला जाताना अथवा खूप दगदग करून घरी आल्यावर खडीसाखरेचा तुकडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
खडी साखर तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडाची पावडर दूधातून घ्या. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटेल.
घसा खवखवणे अखवा घशाच्या कोणत्याही तक्रारीवर तुम्ही खडीसाखरेचा उपयोग करू शकता. कारण खडीसाखरेमुळे घसा पटकन स्वच्छ आणि मोकळा होतो. जर तुम्हाला घशात कोरडेपणा अथवा आवाज बसणे अशा समस्या जाणवत असतील तर सुंठ आणि खडीसाखरेचे चुर्ण घ्या.
आजकाल अनेकांना किडनीस्टोन अथना मूतखड्याचा त्रास जाणवत असतो. मूतखड्यावर घरगुती उपचार करण्यासाठी तुम्ही खडीसाखर वापरू शकता. आयुर्वेदानुसार खडीसाखरेमुळे मूतखडा विरघळून पडून जातो. यासाठीच जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसाखर घ्या.
श्वसन सुधारण्यासाठी खडीसाखर खूपच गुणकारी आहे. काळी मिरी आणि मलईसोबत खडी खा. ज्यामुळे तुमचा दम्याचा अथवा श्वसनाचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल. खोकला येत असल्यास तोंडात खडीसाखर ठेवल्याने दम्याची अथवा खोकल्याची उबळ कमी होते.
खडीसाखरेचा वापर स्तनपान देणाऱ्या महिलांना जरूर करावा. काळ्या तीळासोबत खडीसाखर खाण्याने महिलांच्या अंगावरील दूध वाढते. यासाठी काळे तीळ वाटून घ्या आणि त्यामध्ये खडीसाखरेची पूड टाका. दररोज नवमातांनी दिवसांतून दोनदा हे मिश्रण कोमट दूधासोबत घ्यावे.
बऱ्याचदा काही जणांच्या तोंडाला घाणेरडा वास येतो. तोंडाला दुर्गंध येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र खडीसाखरेचा वापर मुखवासाप्रमाणे केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. बडीसोप आणि खडीसाखर एकत्र करून तुम्ही मुखवास तयार करू शकता.
खडीसाखर ही थंड गुणधर्माची आणि वात, पित्त, कफ यांना संतुलित ठेवणारी आहे. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता यामुळे मुळव्याधीचा त्रास जाणवतो. यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. मुळव्याधीमुळे पोट आणि गुदद्वाराजवळ दाह होतो. हा दाह कमी करण्यासाठी आणि पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी मुळव्याधीवर खडीसाखरेचा उपयोग करावा. मुळव्याध असल्यास नागकेशरासोबत खडीसाखर घ्यावी.
अपचन, दुषित पाणी, चुकीचा आहार अथवा इनफेक्शन यामुळे जुलाबाचा त्रास होऊ शकतो.मात्र जुलाब थांबण्यासाठी खडीसाखर उपयुक्त आहे. यासाठी धनेपावडर आणि खडीसाखर एकत्र करून घ्या. ज्यामुळे तुमच्या पोटाला लवकर आराम मिळू शकेल.
1. खडीसाखर आरोग्यासाठी चांगली आहे का ?
आयुर्वेदानुसार खडीसाखरेचा वापर आरोग्याच्या अनेक समस्यांवर करता येतो. रिफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर नक्कीच गुणकारी आहे. मात्र खडीसाखर प्रमाणातच खावी.
2. खडीसाखर रिफाईंड साखरेपेक्षा आरोग्याला चांगली असते का ?
नक्कीच रिफाईंड साखर आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. मात्र प्रमाणात घेतल्यास खडीसाखर शरीर आणि आरोग्यासाठी उत्तम असू शकते.
3. खडीसाखर खराब होऊ शकते का ?
नक्कीच जरी खडीसाखर कठीण असली तरी पाणी, प्रदूषण, वातावरणातील बदल यामुळे ती खराब होऊ शकते. ती साठवण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करणं फायद्याचं ठरेल.