रस्त्यावरून चालताना आपण कित्येक जोडप्यांना एकमेकांचा हात पकडून फिरताना पाहिलं असेलच. एखाद्या क्युट कपलला पाहून तुम्ही ‘ओह…किती गोंडस…’असे शब्ददेखील आपसुकच तुमच्या तोंडून बाहेर निघाले असतील. पण असं भररस्त्यात एकमेकांचा हात पकडून चालण्यामागील नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तुम्हीही विचारात पडलात ना… हात पकडून चालण्यामागे विशेष असं सायन्स आहे. हातात हात घेऊन चालणाऱ्या कपल्समधील कित्येक गोष्टी या सवयीमुळे समोर येऊ शकतात. एवढंच नाही तर हात पकडून चालण्याचे कित्येक फायदे देखील आहेत. जाणून घेऊया जोडीदाराचा हात पकडून चालण्याचे कसे फायदे होतात आणि कपलमधील कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा येऊ शकतो अंदाज…
(वाचा : त्वचेच्या समस्यांपासून हवीय सुटका, मग तांदळाच्या पिठानं खुलवा सौंदर्य)
जोडीदाराचा हात पकडून चालण्याचे फायदे
1.नातं अधिक घट्ट होतं
हात पकडून चालणं एकमेकांवर असलेल्या प्रचंड विश्वासाचं दर्शन घडवते. आपण एकत्र फार सुरक्षित आहोत, हीच भावना वर्दळीच्या ठिकाणी एकमेकांचा हात धरून चालणाऱ्या कपलमध्ये पाहायला मिळते. यामुळे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतात आणि नात्यातील प्रेम देखील वाढतं.
2.सुरक्षिततेची भावना
एखादी तरुणी किंवा महिला सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराचा हात धरून चालते, त्यावेळेस तिच्या मनात अतिशय सुरक्षिततेची भावना असते. याशिवाय महिलांमध्ये कोणत्याही भीतीविरोधात लढण्याची हिंमत येते. जोडीदारासोबत त्या स्वतःला ताकदवान असल्याचं समजू लागतात.
(वाचा : त्वचेच्या गंभीर समस्या होतील दूर, प्या हे ‘व्हिटॅमिन सी’युक्त 5 ज्यूस)
3.शारीरिक दुखण्यापासून दिलासा
संशोधनानुसार, जेव्हा पती आपल्या गरोदर पत्नीचा हात धरून चालतो तेव्हा त्या महिलेला अतिशय मानसिक दिलासा मिळतो. एकमेकांचा हात पकडल्यानं त्यांचा श्वास, हृदयाचे ठोके आणि मेंदूच्या लहरी देखील एकमेकांसोबत जुळतात. महत्त्वाचे म्हणजे कित्येक प्रकारच्या शारीरिक समस्यादेखील कमी होण्यास मदत होते.
4.जोडीदाराचा हात धरून निवांत बसणं
जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांचा हात पकडून निवांत बसता, त्यावेळेस तुमचे विविध त्रास कमी होतात, ही बाब संशोधनाद्वारे समोर आली आहे. हाताला स्पर्श करणं, हात हातात घेणं या भावना व्यक्त करण्याची एक उत्तम पद्धती आहेत. तुमचा जोडीदार एखाद्या ताणतणावात असेल तर त्याचा हातात हात घेऊन त्याला/तिला धीर द्या. यामुळे थोडंसं का होईना पण त्याला/तिला दिलासा मिळेल.
(वाचा : ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे)
5. स्पर्शातून जाणवतं प्रेम
स्पर्शद्वारे सर्व प्रकारच्या भोवना थेट मनापर्यंत पोहोचतात असे म्हणतात. कित्येकदा आपण आपल्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करण्यात अपयशी ठरतो. स्वतःचं प्रेम आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शब्दांऐवजी स्पर्शाचा आधार घ्या. तिचा/त्याचा हात घट्ट पकडा, तुमच्या नजरेतून भावना नक्कीच पोहोचलीत.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.