ADVERTISEMENT
home / Diet
बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स

बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स

गुलाबी थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या ऋतूची सर्वच जण आतुरतेनं वाट पाहत असतात. उन्हाळ्यात सहन न होणारे उन्हाचे चटके-असह्य उकाडा आणि पावसाळ्यात सर्वत्र होणारा चिखलाचा त्रास पाहता बऱ्याच जणांना 12 महिने 24 तास केवळ हिवाळाच हवा-हवासा असतो. कारण या दिवसांत सूर्य आग ओकत नाही किंवा चहुकडे पाणीचपाणी देखील नसतं. ऋतू जरी आल्हाददायक असला तरीही आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असते. याचं मुख्य कारण आहे आजारांची मोठ्या प्रमाणात होणारी लागण. परिणामी आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयींवर किंचितसं नियंत्रण ठेवावं लागतं. ऋतुनुसार आपल्या आहार-विहारात बदल घडत असतात. पण हिवाळ्यात केवळ खवय्येच नाही, तर ज्यांचे खाण्यापिण्याचे नखरे आहेत ती मंडळीदेखील आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यात कोणतीही काटकसर करत नाहीत. थंडगार वातावरणात तळलेले, मसालेदार, चमचमीत, खुशखुशीत आणि गरमागरम पदार्थ खाण्याची सर्वांचीच इच्छा होते.

(वाचा : तळण्यासाठी एकदा वापरलेलं तेल वापरणं आरोग्यासाठी घातक)

 

तेलकट पदार्थांवर मारा ताव

तेलकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात, असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेलच. दुसरीकडे बटाटा वडा, सामोसे, साबुदाणा वड्याची प्लेट समोर ठेवल्यास ‘नाही’ कसं म्हणायचं. पण तळलेल्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारण्याची परवानगी तुम्ही स्वतःच स्वतःला देऊ शकता, असं म्हटलं तर?… हो हे शक्य आहे. तुम्ही म्हणाल मग तब्येतीचं काय?. पण Not to Worry, आरोग्य सांभाळून चमचमीत पदार्थांची चव बिनधास्तपणे कशी चाखता येईल, यासंदर्भातील काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेलकट पदार्थ खाऊन कोलेस्टेरॉल, वाढणारी चरबी, हृदयरोग आणि अन्य आजारांचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबत खाण्यापिण्याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

Instagram

1.आरोग्यदायी तेलाची निवड करा

शरीराचं नुकसान कमी आणि फायदा अधिक प्रमाणात होईल, अशा तेलाची स्वयंपाकासाठी निवड करावी.  कॅनोला तेल, सूर्यफुलाचे तेल, राइस ब्रेन तेल (Rice Bran Oil) निवडल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

(वाचा :सावधान! तुम्हाला कमी झोपण्याची सवय आहे, होतील ‘हे’ गंभीर आजार)

ADVERTISEMENT

 

2. वजनदार भांड्यांमध्ये जेवण शिजवावे

मोठ्या तसंच वजनाने जड असलेल्या भांड्यात पाककला करण्याचे शरीराला सर्वाधिक फायदे होतात. कारण अशी भांडी गरम होण्यास वेळ लागतो. जेवणाचं भांडं गरम होण्यास जितका वेळ घेईल तितकाच वेळ तेल गरम होण्यास लागतो. यामुळे कॅन्सर रोगासाठी कारक ठरणारा वायू तयार होण्यापासून रोखले जाऊ शकतं. सोबतच तेल हळूहळू आणि योग्य प्रकारे गरम होईल. 

(वाचा : निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ)

ADVERTISEMENT

3. पेपर रुमालाचा वापर करा

मिठाईच्या दुकानातला स्वयंपाकी मोठ्या कढईतील गरम तेलातून कचोरी किंवा सामोसे बाहेर काढल्यानंतर काही वेळ जाळीदार चमच्यासहीतच कढईवर ठेवतो, हे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिलं असेलच. या पद्धतीचा ते आपल्या सोयीनुसार उपयोग करतात. याचा आरोग्याला फायदा देखील होतो. तेलामध्ये तळलेले अन्नपदार्थ कढईतून बाहेर काढल्यानंतर त्यातून काही प्रमाणात तेल गळत असते. हे तेल शरीरात जाऊन दुष्परिणाम होऊ नये यासाठी पदार्थ काही वेळासाठी पेपरच्या रुमालावर ठेवावे. जेणेकरून अधिकचे तेल रुमाल सोकून घेईल आणि अतिरिक्त तेल (चरबीयुक्त पदार्थ)तुमच्या पोटात जाणार नाही.

4. वर्तमानपत्रांमध्ये बांधलेले तेलकट अन्न धोकादायक

वर्तमानपत्रात, मासिक, पुस्तकांच्या पानांमध्ये बांधलेले किंवा दिलेले तेलकट पदार्थ खाणं म्हणजे आजाराला किंवा मृत्युला आमंत्रण देणं. यावरील शाई आरोग्यासाठी घातक आहे. तेलकट पदार्थ ही शाई शोषून घेतात. छपाईसाठी वापरलेल्या शाईमध्ये ग्राफाइट नावाचा विषारी घटक असतो. हा पोटात गेल्यास आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे.  

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

23 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT