घरामध्ये नेहमीच आपण काही ना काही तर बदल करत असतो. आपल्याला आपल्या घराला काही वर्षांच्या फरकाने नवा लुक द्यायचा असतो. पण घराला नवा लुक देणे हा आपल्याला नेहमीच महागडे आणि डोक्याला त्रासदायक असणारे काम वाटते. पण तसं नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या घराची सजावट करून घराला नवा लुक देऊ शकता. तसंच स्वस्तात मस्त सजावटही करू शकता. घरातल्या काही गोष्टी इथल्या तिथे अथवा काही वेगळ्या गोष्टींचा वापर केल्यासदेखील घराला एक वेगळा लुक येऊ शकतो. फक्त तुम्हाला त्याची रचना करता यायला हवी. खरं तर आपल्याला घरामध्ये सजावट का करावी असाही प्रश्न पडतो. पण तुम्ही केलेल्या सजावटीमुळे तुमचं लहान घर तुम्हाला मोठंही करता येतं आणि शिवाय तुमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना तुमच्या घरात आनंदी आणि अप्रतिम वाटण्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण घरात सकारात्मकता नसेल तर मग आनंदी वाटत नाही. त्यासाठी घरातील सजावट ही आनंददायी आणि हसतीखेळती असणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला याचसंदर्भात घराला नवा लुक कसा आणावा याच्या कल्पना देणार आहोत. तुम्हालाही या नक्की आवडतील.
खरं तर अनेक जणांना खर्चाकडून हे शक्य नसतं. शिवाय दर काही वर्षांनी घराची सजावट बदलणं का आवश्यक आहे असा प्रश्नही सतावतो. आपणही त्याच त्याच गोष्टी पाहून कंटाळलेलो असतो. मग अशावेळी तुम्ही घरातल्या घरात अनेक बदल करून त्याचा लुक बदलला की तुमच्या मनालाही पुन्हा एकदा उत्साह जाणवतो. शिवाय घर वेगवेगळ्या पद्धतीने सजवलं की दिसायला आणि घरात वावरायलादेखील बरं वाटतं. सतत तोचतोचपणा प्रत्येकालाच नको असतं. शिवाय दुसऱ्यांच्या घरात एकदा जाऊन आल्यानंतर आपल्यालादेखील काहीतरी घरात बदल करायला हवेत हा विचार कधी ना कधीतरी मनात येतोच. पण प्रश्न येतो तो इतका खर्च करायचा का? तर तुम्ही कमी खर्चातदेखील तुमच्या घरात नवी सजावट करू शकता. अगदी तुम्हाला नको असलेल्या वस्तूंनाही नवा लुक देत तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी हे वापरू शकता.
घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले आपल्या नजरेला पडतो तो आपला हॉल अर्थात लिव्हिंग रूम. मग ही लिव्हिंग रूम नक्की कशी सजवायची हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना असतो. त्यामुळे यामध्ये कसे सर्व व्यवस्थित अॅडजस्ट करायचे आणि याला कसा नवा लुक द्यायचा हे आपण जाणून घेऊया
लिव्हिंग रूममध्ये फर्निचर नक्की कसे ठेवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. बऱ्याचदा बऱ्याच घरात आपण पाहतो की एखाद्या भिंतीजवळ सोफा ठेवलेला असतो आणि त्याला जोडून एक - दोन खुर्च्याही असतात. पण फर्निचर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडं डोकं चालवायला लागेल. तुम्ही कमीत कमी जागा व्यापून फर्निचर बनवण्याची गरज आहे. सोफा कम बेड एका ठिकाणी ठेवून एखाद्या भिंतीत छानसा शेल्फदेखील तुम्ही बनवून घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती पुस्तकं आणि शो पिस ठेवून लिव्हिंग रूमला वेगळा लुक देऊ शकता.
बऱ्याचदा लिव्हिंग रूममधील लादी ही आपल्या लिव्हिंग रूमची शोभा घालवत असते. मग अशावेळी तुम्ही एरिया रग्ज अर्थात कारपेट अथवा कापडाच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या रग्सचा वापर करू शकता. तुमच्या लिव्हिंग रूमच्या रंगाप्रमाणे तुम्ही याची निवड करा. तसंच तुमच्या लिव्हिंग रूमचं क्षेत्र किती आहे त्याप्रमाणेच तुम्ही याचा वापर करा. अति पसरवल्यास, लिव्हिंग रूमची शोभा जाते. त्याचप्रमाणे एरिया रग्जवर सोफ्याजवळ एक लहानसं टेबल आणि त्यावर शो पिस ठेवायलाही विसरू नका. इतक्या लहानशा गोष्टीनेही तुमच्या लिव्हिंग रूमचा लुक बदलू शकतो हे लक्षात ठेवा.
घरात तुम्हाला कलाकुसर करायला बऱ्याच ठिकाणी वाव असतो. तुमच्या घरातील भिंतीवर तुम्ही अर्थातच फ्रेममधील फोटो लावू शकता. पण त्याचप्रमाणे तुम्ही नैसर्गिक शो - पिस ठेवल्यासदेखील लिव्हिंग रूमची शोभा वाढते. तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी अथवा बागेमध्ये जाता तेव्हा तेथील पेबल्स, शिंपले अथवा सुकलेल्या गवताच्या काड्या या नक्की निवडून आणा. घरातील सुबक मातीच्या प्लेटमध्ये या गवताच्या काड्या सजवा आणि त्यात पेबल्स ठेवा. या दिसायला अतिशय कोरीव दिसतात. तसंच त्यांची रंगसंगती ही तुमच्या लिव्हिंग रूमची शोभा वाढवण्यास फायदेशीर ठरते. तसंच तुम्ही तुमच्या अथवा तुमच्या कुटुंबाच्या अनेक फोटोंनी रंगसंगती करून तुमच्या घरातील एका भिंतीवर फ्रेम्स करून त्यावर एक लहान लाईट्स सोडू शकता. हे दिसायला अप्रतिम दिसतं. टेबलवरील कोस्टर्स, फ्लॉवरपॉट्स, पायपुसणी यासारख्या लहानसहान गोष्टींनी कलात्मकतेचा संपूर्ण अनुभव निर्माण करता येतो.
लिव्हिंग रूममध्ये नेहमीच सूर्यप्रकाश जास्त येणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या लिव्हिंग रूमच्या खिडक्या तुम्ही मोठ्या ठेवणं आवश्यक आहे. तसंच लिव्हिंग रूममध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं लायटिंग करू शकता. रात्रीच्या वेळी तुम्हाला संधीप्रकाश हवा असल्यास, पिवळ्या रंगाचे लहान एईडी लावून घ्या. तसंच काही पांढरे एलईडीदेखील तुम्ही लावून घ्या. एखाद्या ठिकाणी लिव्हिंग रूममध्ये शँडिलिअर लावल्यास, त्याची सुंदरता अधिक उठून दिसते. त्यामुळे त्यासाठीदेखील खास जागा नक्की ठेवून द्या.
तुमच्या घराला ऑफव्हाईट रंगही चांगला दिसतो. पण लिव्हिंग रूमला तुम्हाला वेगळा रंग द्यायचा असेल तर ती तुमची निवड असेल. पण त्यातही तुम्ही तीन भिंती फिक्या ठेवून एका भिंतीवर तोच गडद रंग दिलात तर तुमची लिव्हिंग रूम अधिक छान दिसते. तसंच या भिंतीवर तुम्ही तुमच्या आवडत्या फ्रेम लावल्यात तर तुम्हाला लिव्हिंग रूमच्या भिंतीचा रंग अधिक आकर्षक दिसेल.
तुम्ही लिव्हिंग रूममध्ये कितीही गोष्टी मांडा पण या वस्तूचं व्यवस्थित माप असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा या वस्तू तुम्ही मांडता तेव्हा त्या अडगळ दिसू नयेत अथवा एकमेकांत अडखळलेल्या दिसू नयेत याची काळजी घेणंही तुमच्याच हातात आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सजावट करता तेव्हा तुम्ही घेतलेल्या वस्तू योग्य मापात योग्य ठिकाणी लिव्हिंग रूममध्ये बसतात की नाही हे नीट पडताळून पाहा.
भिंत असो अथवा लिव्हिंग रूमच्या शेल्फ्स. यावर तुमच्या आठवणी जेव्हा सजतात तेव्हा अधिक सुंदर दिसतात. तुमच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतात तुमच्या आठवणी अर्थात त्याचे फोटो. लिव्हिंग रूम तुम्ही तुमच्या या आठवणींने सजवू शकता. तुम्ही एखादी भिंत याने सजवू शकता अथवा तुमच्या फर्निचरचा आधार घेत तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक शेल्फमध्ये एक अशी फ्रेमही ठेवू शकता. हे दिसायला अतिशय आकर्षक दिसतं आणि तुमच्या लिव्हिंग रूमची शोभाही वाढते.
वाचा - घरात राखायची असेल सुखशांती तर जाणून घ्या काय करायचे उपाय
तुम्ही तुम्हाला मिळालेले गिफ्ट बॉक्स आणि शू बॉक्सना रंग देऊन जर तुमच्या भिंतीवर चिकटवले आणि त्याचा वापर आपल्या लहान सहान गो्ष्टी अर्थात स्टेशनरी, चाव्या अथवा इतर काही गोष्टी ठेवण्यासाठी केल्यास, खूपच सुंदर सजावट दिसते. शिवाय असं केल्याने तुमचं सामानही हरवणार नाही आणि तुमच्या बेडरूमला नवा लुक मिळेल.
आपल्या लिव्हिंग रूमच्या मागच्या बाजूला भिंतीवर अथवा टेबलच्या वर तुम्ही एका बुलेटिन बोर्डवर आपल्या जवळच्या आणि तुमच्या आवडत्या आठवणींचे फोटो लावू शकता. तसंच या फोटोंच्या वर तुम्ही एक लहान लाईटिंग माळ त्यावर लावून ते अधिक आकर्षक बनवू शकता. हा पबोर्ड बनवणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्ही कार्डबोर्ड अथवा थर्माकोलचा वापर करू शकता. तसंच वेगवेगळ्या आकाराचे फोटो बनवून तुम्ही तुम्हाला हवी तशी त्याची अरेंजमेंट करून ते लावू शकता.
लिव्हिंग रूमचे टेक्स्चर्स तुम्ही वेगळे ठेवलेत तर नक्कीच ते आकर्षक दिसतात. आजकाल अनेक वेगवेगळे युनिक टेक्स्चर्स बाजारामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे याची निवड करून तुमची लिव्हिंग रूम स्वस्तात मस्त सजवता येते.
घराचे बेडरूम हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याची सजावट ही आपल्या मनाप्रमाणेच असायला हवी. त्यामुळे ती सजावट नेहमीच खास ठरते. पाहूया काय करायची घराच्या बेडरूमची सजावट -
घर अथवा बेडरूम मोठं दाखवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना कधीही गडद रंग देऊ नका. तर नेहमी तुमच्या बेडरूमसाठी फिका रंगच निवडा. ऑफ व्हाईट, लाईम लाईट, सॉफ्ट शेल (फिका गुलाबी) अथवा आपल्या आवडीच्या कोणत्याही रंगाची शेड तुम्ही बेडरूमला देऊ शकता. कारण ब्राईट रंग आणि लाईट्स तुमचं बेडरूम अधिक मोठं आणि सुंदर दाखवण्यास मदत करतं. तर त्याच्या उलट गडद रंग शेड्स आणि लाईट्स शोषून तुमची बेडरूम लहान दाखवतात.
आजकाल सिरॅमिक पॉट्स ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये तुम्ही लहान रोपटी लावलीत आणि बेडरूमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही लावलीत तर बेडरूमची शोभा अधिक वाढते. तसंच निसर्ग सतत आपल्या आजूबाजूला राहिल्याने घरात सकारात्मकता राहाते. तुम्ही हे पॉट्स तुमच्या बेडरूमच्या खिडकीजवळदेखील ठेवू शकता. तुमच्या घरात जर कमी जागा असेल तर तुम्ही असे रोपटे हँगिंग प्लांट्स म्हणूनदेखील वापरू शकता. त्यामुळे तुमच्या बेडरूमची शोभा नक्कीच वाढते.
बऱ्याचदा आपल्याकडे इतके कपडे असतात की, सगळे कपडे अथवा वस्तू कपाटात मावत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बेडरूमसाठी दिवाण बेड निवडा. बेडरूमची शोभाही याने वाढते आणि त्याशिवाय तुमचं सामानही यामध्ये व्यवस्थित राहातं. तसंच तुमच्या कपड्यांपासून ते तुमच्या बेडशीट्स, चादर, गोधडी असे सामान त्यामध्ये व्यवस्थित राहतात. तसेच तुमचे फाल्तू कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकता.
बेडरूम ही तुमची स्वतःची जागा असते. तुमची बेडरूम लहान जरी असेल तरी तुम्ही सजावट केल्यानंतर ती सुंदर आणि मोठी दिसू शकते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हात असतो तो म्हणजे पडद्यांचा. त्यामुळे तुम्ही पडद्यांचा रंग निवडताना तुमच्या भिंतीचा जो रंग असेल तोच सहसा पडद्याचा ठेवा. तसंच पडद्याचा एकच रंग ठेवा. त्यामध्ये रंगबेरंगी पडदे वापरू नका. त्यावर मोठा पॅटर्न असेल असे पडदे निवडा. तसेच नेटने बनलेले पडदे हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
बऱ्याच ठिकाणी बेडरूममधील खिडकीचा वापर स्टोरेज म्हणून केला जातो. त्यामुळे घरात पसारा राहात नाही. तसंच ते योग्य रचून ठेवल्यास, सजावट म्हणूनदेखील दिसायला सुंदर दिसते. तुम्ही लहान मोठे वेगवेगळे बॉक्स घेऊन त्यात व्यवस्थित सामान लावून खिडकीत रचल्यास, ही बेडरूमची एक वेगळी सजावट तुम्हाला करता येते.
पडदे आणि भिंतीप्रमाणेच तुमच्या बेडशीटचा रंग फिका निवडा. फिका रंग यासाठी वापरावा कारण तुमच्या घरात येणाऱ्या प्रकाशामुळे तुमची बेडरूम मोठी दिसते. तसंच गडद रंगाच्या बेडशीट्स तुमची बेडरूम लहान दाखवतात. तुमच्या बेडशीटच्या रंगाप्रमाणेच तुमच्या उशीलाही कव्हर्स घाला. तुम्हाला हवं असल्यास, लाईट कुशन्ससह तुम्ही एक वा दोन नियॉन कलर्सच्या उशादेखील ठेवू शकता.
बऱ्याचदा प्रत्येक बेडरूममध्ये लॅपटॉपवर अथवा कॉम्प्युटर असतोच आणि त्यासाठी स्टडी टेबल अथवा शेल्व्हिंग तर तुम्हाला ठेवावंच लागतं. त्यासाठी तुम्ही पुस्तकं ठेवण्यासाठी शेल्फ बनवून घ्या. त्यामुळे तुमचं टेबल रिकामं दिसतं आणि पुस्तकं नीट तुम्ही मांडून ठेवलीत तर त्याची एक वेगळीच शोभा तुमच्या बेडरूमला येते. याच्या मधोमध डेकोरेशनसाठी तुम्ही इनडोअर प्लांट्सदेखील ठेवू शकता.
तुमची जर कोणत्याही इन्स्ट्रूमेंट वाजण्याची पॅशन असेल तर तुम्ही ती पॅशन तुमच्या भिंतीवर टांगून ठेवू शकता. हे दिसायला अतिशय आकर्षक दिसतं. तसंच तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही ही वेगळ्या तऱ्हेची सजावट करू शकता. ही सध्या ट्रेेंडमध्ये असलेली स्टाईल आहे.
घराची सजावट करण्यासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. जाणून घ्या काय आहेत या टिप्स -
तुम्ही बेडच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर बिल्ट इन वॉल शेल्फ लावू शकता. यामध्ये तुम्ही तुमचं लहान मोठं सामानही ठेवू शकता. फक्त हे ठेवताना नीट व्यवस्थित ठेवा. ही दिसायला अतिशय आकर्षक दिसतं. पुस्तकं एका लाईनमध्ये, फोटो फ्रेम्स एका लाईनमध्ये, शो पिस एका लाईनमध्ये आणि बाकी सामान वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही मांडू शकता.
प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ तर असतंच. पण त्यासाठी तुम्ही वेगवेगळे फंकी घड्याळसुद्धा ट्राय करू शकता. POPxo Shop मधील वॉल क्लॉक तुमच्या घराची भिंत सजवण्यासाठी नक्कीच उपयोगी आहेत. तुम्ही एका ठराविक अंतरावर हे घड्याळ लावून घ्या. तसंच शो पिसप्रमाणे घडयाळ असल्यास, तुमच्या घरातील भिंतीची शोभाही वाढते.
तुम्ही तुमच्या बेडरूमच्या खिडकीजवळ आरसा लावा अथवा तुम्ही एखाद्या भिंतीला आरशाने सजवू शकता. खिडकीजवळ आरसा लावला तर बाहरेच्या प्रकाशामुळे तुम्हाला नैसर्गिक प्रकाशामुळे व्यवस्थित तुमचा चेहरा दिसतो. तसंच नैसर्गिक प्रकाशामुळे तुमची जागा अधिक मोठी दिसण्यासही मदत होते. याशिवाय तुम्ही ड्रेसिंग टेबलऐवजी तुमच्या भिंतीवरच डायरेक्ट काच लावून घेण्याचा प्रयत्न करा.
आजकाल वेगवेगळे लाईट्स तसेच एलईडी लाईट्सदेखील मिळतात. तुम्ही याचा उपयोग करून तुमच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात स्टडी टेबल, आरशाजवळ, बेडच्या वरच्या भिंतीवर, कपाटाच्या समोर असे लाईट्स लावून घेऊ शकता. पण इतर ठिकाणी लाईट्स फुकट घालवू नका. जिथे हवेत तिथेच याचा वापर करा. अति लाईट्स घराची शोभा घालवू शकतात. त्यामुळे डेकोरेशनसाठी तुम्ही जिथे हवे तिथेच लाईट्सचा वापर करा.
आपल्या घरात नेहमीच बेडरूमच्या अथवा इतर डेकोरेशन्ससाठी लॅंप्स महत्त्वाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळ अथवा रात्रीच्या वेळी कसा प्रकाश घरात हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये लँप्सचा वापर करून घ्या. सहसा याचा वापर बेडरूम्समध्ये जास्त करण्यात येतो.
रोपट्यांप्रमाणेच तुमच्या घरामध्ये फुलंही सकारात्मक वाईब्स घेऊन येतात. तुम्ही नेहमी खरी फुलं नेहमी तर सजवू शकत नाही. पण तुम्ही आर्टिफिशियल अथवा शोभच्या फुलांनी नक्कीच घराची सजावट करू शकता. त्यासाठी तुम्ही लाईट शेड्सच्या फुलांचा वापर करा. याव्यतिरिक्त तुम्ही खिडकीवर टांगलेले फ्लॉवर पॉट्सदेखील तुमच्या घराची शोभा वाढवतात.
तुम्हाला सगळ्या ठिकाणी फिका रंग आवडत नसेल तर तुम्ही किमान तुमच्या छताचा रंग तुम्ही गडद रंगवू शकता. उदाहरणार्थ तुमच्या भिंतीचा रंग गुलाबी असेल तर तुम्ही छताचा रंग लाल करून घ्या. यामुळे तुमच्या घराला अधिक आकर्षकपणा येतो.
यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या अथवा भिंतीचा वापर करून घेऊ शकता. अथवा तुम्ही स्टडी टेबलचा वापर करून हँगिंग अॅक्सेसरीज लावू शकता. याने तुमच्या घराच्या सजावटीला एक वेगळा लुक मिळतो.
घराची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही या वेगळ्या वस्तूंचादेखील उपयोग करू शकता. नक्की तुम्ही काय वेगळी सजावट करू शकता पाहूया
घरात फिश टँक असणं नेहमी चांगलं मानलं जातं. तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये एक छानसा लहानसा फिश टँक तयार करून आपल्या घराची शोभा वाढवू शकता.
लाईट्समुळे घर अधिक सुंदर दिसतं. तुमच्या घराच्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला लाईट्स लावायचे आहेत हे बघून तुम्ही अशा प्रकारच्या डेकॉर लाईट्सचा वापर करून घेऊ शकता.
तुम्ही जेव्हा तुमच्या आठवणींचं कोलाज तुमच्या भिंतीवर लावण्यासाठी तयार असाल तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फोटो क्लिप्सचादेखील वापर करू शकता. यामुळे तुमच्या आठवणी कायम तुमच्या डोळ्यासमोरही राहतील आणि घरही सुंदर दिसेल.
घरातील टेबलनवर नुसते न्यूजपेपर चांगले दिसत नाहीत. त्यावर डेकोरेशनसाठी अशा तऱ्हेच्या वस्तू नक्कीच शोभून दिसतात. साधा आणि तितकाच आकर्षक लुक तुमच्या घराची शोभा वाढवतो.
आपण घराची शोभा वाढवण्यासाठी हँगिंग पॉट्स अथवा रोपटी लावतो त्याचप्रमाणे तुम्ही भिंतीवर हँगिंग रॅकचादेखील उपयोग करू शकता. तुम्ही अशा तऱ्हेचं डिझाईन्स वापरून तुमच्या लिव्हिंग रूमची शोभा वाढवू शकता.
वेगवेगळ्या प्रकारची वॉलक्लॉक उपलब्ध असतात. त्यासाठी तुम्ही POPxo Shop मधील विविध वॉलक्लॉक्स वापरू शकता. तुमच्या भिंतीची शोभा वाढवण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल.
घरामध्ये मोठ्या माणसांना बसण्यासाठी ही खास खुर्ची तुम्ही ठेवू शकता. ही तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढवते. रंगबेरंगी अशी ही रिल्पिका चेअर तुम्हाला बसायलादेखील कम्फर्टेबल आहे आणि त्याशिवाय तुमच्या लिव्हिंग रूमची शोभा वाढवायलादेखील अप्रतिम आहे.
घराची सजावट करण्यासाठी तुम्ही आऊल फिगरीनचा वापर करू शकता. पॉलिरेझिनपासून बनलेलं आऊल फिगरीन तुमच्या शेल्फची शोभा वाढवते आणि त्याशिवाय हे दिसायला पण सुंदर दिसते.
घरात आधुनिक शेल्व्हज कोणाला नाही आवडत? तुम्ही अशा तऱ्हेचे वेगवेगळे मॉडर्न शेल्व्ह्ज तुम्ही तुमच्या बेडरूम आणि अगदी लिव्हिंग रूममध्येही ठेवू शकता.
मेटल प्लांटर हा एक रोपटं ठेवण्यासाठी नवा ट्रेंड सुरु झालाय. तुम्ही अशा प्रकारचे मेटल प्लांटर तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवा अथवा अगदी तुमच्या हॉलमध्ये. यामुळे तुमच्या हॉलची शोभा नक्कीच वाढते.
जुन्या वस्तूंपासून तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह केलंत तर नक्कीच तुमच्या डेकोरेशनसाठी याचा उपयोग होऊ शकेल. तुम्ही तुमच्या घरात आलेल्या बॉक्सपासून स्टोरेज बॉक्स तयार करू शकता. इतर गोष्टींचाही वापर करून तुम्हाला याचा उपयोग करून घेता येईल.
नक्कीच तुमच्या घराच्या सजावटीमध्ये तुम्ही प्लांट्स लावायला हवेत. याने घराची शोभा तर वाढतेच. शिवाय घरामध्ये कायम सकारात्मक वातावरणही राहतं. त्याचप्रमाणे घरात बघायलाही ही हिरवळ सुंदर वाटते.
घराचा रंग हा नक्कीच घराच्या सजावटीचा एक भाग आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग तर निवडा. पण तुमचं घर कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घराची रंगसंगती निवडणं गरजेचं आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.