वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय

वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय

वातावरणातील धुळ, माती, प्रखर सुर्यप्रकाश, अयोग्य आहार आणि  प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर सतत परिणाम होत असतो. सुंदर, नितळ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येकीला वाटत  असतं. मात्र प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. ज्यामुळे अशा निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा पूर्ववत कसं करावा हा प्रश्न नक्कीच तुमच्यासमोर उभा राहतो.  कधी कधी त्वचेवर महागडे उपचार करूनही फारचा चांगला परिणाम दिसून येत नाही. यासाठीच अशा त्वचेवर घरगुती आणि नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतात. 

निस्तेज त्वचेसाठी नैसर्गिक उपचार -

बदलत्या हवामानामुळे त्वचेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी घरीच करा हे घरगुती उपचार

लिंबू -

लिंबामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर इस्टंट ग्लो येतो. शिवाय तुमची त्वचा फ्रेशदेखील दिसू शकते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर होतो.  

काय कराल- 

एका लिंबाचा रस घ्या त्यात एक ते दोन थेंब मध टाका. मिश्रण चांगले एकजीव करा आणि चेहऱ्यावर लेप लावा. वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. टॉवेल टिपून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड असल्यामुळे तुमच्या त्वचेला दाह होऊ शकतो. यासाठीच लिंबाचा रस लावण्यापूर्वी तुम्हाला त्याची अॅलर्जी नाही ना हे पॅचटेस्ट घेऊन अवश्य तपासा. 

shutterstock

लिंबू -

मधामध्ये त्वचेचं योग्य पोषण करण्याची क्षमता असते. कारण मधामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. तुमच्या त्वचेवर पिंगमेंटेशनच्या खुणा अथवा काळेपणा आला असेल तर मध तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. 

काय कराल -

शुद्ध मधाचे काही थेंब घ्या आणि त्याचा एक पातळ थर त्वचेवर लावा. चांगल्या परिणामासाठी महिन्यातून कमीत कमी चार वेळा हा फेसपॅक जरूर वापरा. 

कोरफडीचा रस -

कोरफडीमध्ये चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्याचे  सामर्थ्य असते. जेव्हा तुम्ही कोरफडीचा गर तुमच्या चेहऱ्यावर लावता  तेव्हा तुमची त्वचा चमकदार आणि मऊ होते. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर हा उपाय जरूर करा.

काय कराल -

कोरफडीच्या गरामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑईल आणि थोडीशी ओटमील पावडर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लाऊन साधारण अर्ध्या तासाने थंड पाण्याने धुवून घ्या आणि मग पाहा परिणाम....

shutterstock

काकडीचा रस -

काकडीच्या रसात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. काकडी तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं लवकरात लवकर आणि अगदी सोप्या पद्धतीने मिटवते. यामधील असेलेल्या अँटीऑक्सिडंट्स मुळे काळे डाग कमी करण्याचं काम काकडी करते. 

काय कराल -

काकडीचा रस काढून हा रस तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि काही वेळ अर्थात किमान अर्धा तास तरी हा रस तसाच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका. याचप्रमाणे थकवा दूर करण्यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून तुम्ही शांत झोपही घेऊ शकता. 

shutterstock

कडूलिंबाची पाने -

कडूलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं इनफेक्शनपासून रक्षण होतं. शिवाय तुमच्या त्वचेला थंडावाही मिळतो.  कडूलिंबाच्या रसामुळे तुम्ही तरूण दिसता आणि तुमची त्वचा फ्रेश आणि चमकदार होते. 

काय कराल -

कडूलिंबाची पानं आणि गुलाबाची पानं एकत्र गुलाबपाण्यात वाटून घ्या. ही तयार झालेली पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर साधारण 10 ते 15 मिनिट्स लाऊन ठेवा आणि सुकल्यानंतर पाण्याने साफ करा. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा असं केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार तर होईलच शिवाय डागविरहित आणि मुलायमदेखील होईल. 

shutterstock

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स