मुतखड्याचा त्रास होऊ लागला की जीव अगदी बेजार होतो. याचं कारण मुतखड्याच्या त्रासामुळे पोटात अतिशय तीव्र वेदना जाणवतात. असं म्हणतात की, भारतात दर दहा माणसांपैकी एकाला मुतखड्याचा त्रास होतो. मूत्राशयामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. किडनी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका पार पडत असते. ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते. जेव्हा अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे मूत्राशयाच्या या कार्यांत अडथळा येतो. तेव्हा मूत्राशयातील विषद्रव्यांमुळे मूत्राशयात स्फटिकाप्रमाणे खडे तयार होतात. ज्यांना किडनी स्टोन अथवा मुतखडा अथवा मूत्रपिंड दगड असं म्हणतात. मुतखड्याचा आकार आणि प्रमाणानुसार याचा त्रास जाणवतो. या विकाराची लक्षणे पटकन न जाणवल्यामुळे अचानक त्याचे प्रमाण वाढल्यावर तीव्र पोटदुखी जाणवते. ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन झाल्याचे निदान होते. खरंतर सर्वांना या समस्येबाबत माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला किडनीस्टोनची लक्षणे, कारणे आणि उपचारपद्धती माहीत असायलाच हव्या. शिवाय किडनी स्टोन घरगुती उपचारांनी कसा बरा करता येईल हे ही माहीत असायला हवं.
किडनी स्टोन अथवा मुतखड्याची समस्या कोणालाही होऊ शकते. मात्र मुतखड्याचा त्रास काही लोकांना होण्याची शक्यता दाट असते. यासाठी जाणून घेऊया मूत्रपिड दगड त्रास नेमका कोणाला होऊ शकतो.
जर तुमच्या घरातील सदस्यांना किडनी स्टोन झालेला असेल तर तुम्हालाही मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता दाट आहे. आई, वडील, भावंडे यांना हा त्रास यापूर्वी झाला असेल तर तुम्हाला याबाबत सावध राहाणं गरजेचं आहे. शिवाय जर तुम्हाला जर एकदा मुतखड्याचा त्रास झाला तर तो भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता नक्कीच असू शकते.
जर तुम्ही नियमित मुबलक पाणी पित नसाल तर तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक आहे. कारण माणासाच्या शरीरातील सर्व कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्हाला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र कधी कधी काही लोकांना खूपच कमी पाणी पिण्याची सवय असते. थंड हवेच्या ठिकाणी राहणारे अथवा हिवाळ्यात माणसे कमी प्रमाणात पाणी पितात. असं केल्यास शरीर डिहायड्रेट होतं आणि मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या आहाराचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण जर तुम्ही आहारातून अती मीठ, अती प्रमाणात प्रोटिनयुक्त आहार, अती गोड पदार्थ खात असाल तर सावध राहा. कारण अती प्रमाणातून घेतलेलं मीठ आणि साखरेचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि मग हे टाकाऊ पदार्थ मूत्राशयात साचून राहतात आणि तुम्हाला किडनी स्टोन होतो. यासाठीच जाणून घ्या हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल करावे.
काही लोकांचं वजन त्यांच्या आदर्श वजनापेक्षा अधिक असतं. ज्यामुळे त्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त असतो. अशा लोकांना किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला पोटाचे आजार असतील अथवा तुमच्या पोटाची सर्जरी झाली असेल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. याचं कारण असं की या आजारामुळे तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होतो आणि तुमच्या किडनीवर त्याचा ताण येऊ शकतो.
काही आरोग्य समस्यांचा थेट परिणाम तुमच्या मुत्राशयावर होतो. ज्यामुळे तुमच्या मूत्राशयाच्या कार्यात अडचणी येतात. ज्यामुळे मूत्राशयाचा निचरा व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
मुतखड्यावर निदान करण्यासाठी त्याची प्रमुख लक्षणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे मुतखड्याचा त्रास कमी करता येतो.
किडनी स्टोन झाल्यामुळे पोटातून आणि पाठीतून ज्या वेदना जाणवतात त्या असह्य असतात. ज्या लोकांना याचा त्रास होतो ते सांगतात की या वेदना प्रसववेदनेप्रमाणे तीव्र असतात. अनेकांना तर अशा तीव्र वेदना जाणवल्यावरच त्यांना मुतखडा झाला आहे याचे निदान होते. या वेदना साधारणपणे ओटीपोटातून सुरू होतात. युरीन साफ न झाल्यामुळे या वेदना जाणवू लागतात. शिवाय या वेदनांमुळे तुम्हाला युरीनला प्रंचड त्रास होतो.
जर तुमचा मुतखडा अथवा मुतखडे मूत्राशयातून मूत्रमार्गातून बाहेर पडू लागले तर त्यामुळे युरीन करताना जळजळ होते. युरीन बाहेर पडताना यामुळे प्रचंड त्रास होतो. यामुळे तुम्हाला युरीन इनफेक्शनदेखील होऊ शकते.
मुतखडे अतिशय कठीण असतात. शिवाय हे खडे हळूहळू मूत्राशयातून मूत्रमार्गावाटे बाहेर पडू लागतात. मूत्रमार्गात हे खडे अडकल्यामुळे मूत्रावाटे रक्त पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे काही वेळा युरीनला गेल्यावर रूग्णांच्या मूत्रमार्गातून रक्त येऊ लागते. मूत्रमार्गात जखम झाल्यामुळे लघवी करणं कठीण जातं.
तुमचे आरोग्य चांगले आहे हे तुम्हाला शौचावाटे अथवा मूत्रावाटे समजू शकते. मुतखडा झाल्यामुळे तुमच्या मूत्रमार्गात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुम्हाला युरीनला व्यवस्थित होत नाही. मूत्रावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. मात्र या कार्याला अडथळा आल्यामुळे मूत्र शरीरात साठून राहते. टाकाऊ पदार्थांचा निचरा न झाल्यामुळे तुमच्या युरीनला दुर्गंध येतो शिवाय फेसाळ युरीन होते.
बऱ्याचदा मुतखडे छोटे आणि मोठे असे दोन्ही आकाराचे असतात. मुतखड्यांचा आकार लहान असेल तर ते लघवीवाटे बाहेर पडतात. मात्र जर त्याचा आकार प्रमाणापेक्षा मोठा असेल तर त्यामुळे तुमचा मूत्रमार्ग बंद होतो. युरीनला व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. शिवाय युरीन न झाल्यामुळे अस्वस्थ वाटते. वारंवार लघवीला होण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र मूतखडा हे त्यापैकी एक महत्त्वाचे कारण असू शकते.
मुतखड्याचे हे एक प्रमुख लक्षण आहे. शरीरात निसर्गतः स्वच्छता राखण्याची योजना केलेली असते. शौच आणि मूत्रावाटे शरीरातील विषद्रव्ये आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. मात्र यात अडथळा आल्यामुळे तुम्हाला मळमळ आणि उलटी झाल्यासारखे वाटते. मूत्रमार्ग बंद झाल्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी शरीरामध्ये अशी लक्षणे जाणवतात.
तुम्हाला मुतखड्याचा त्रास होत असेल तर थंडी भरून ताप येऊ शकतो. किडनी स्टोन ही एक भयंकर मोठी आरोग्य समस्या आहे ज्यामुळे तुमच्या इतर शारीरिरक कार्यात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातून अशा प्रकारे दर्शवला जातो. जर तुम्हाला या समस्येमुळे ताप आला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वास्तविक मुतखडा ही जरी गंभीर समस्या असली तरी तुम्ही काही घरगुती उपचार करून ती बरी करू शकता. यासाठी तुम्हाला काही नैसर्गिक आणि घरगुती औषधे आणि उपचारांविषयी माहीत असायलाच हवे. तेव्हा जाणून घ्या मुतखडा घरगुती उपाय कसे करावेत
जर तुम्हाला भविष्यात ही समस्या कधीच नको असेल तर हा उपाय आधीपासून करायला काहीच हरकत नाही. शिवाय मुतखड्याचा त्रास झाल्यावर ते नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडण्यासाठीदेखील हा उपाय फायदेशीर आहे. यासाठी भरपूर पाणी पिण्याची सवय स्वतःला लावा. पाणी अथवा पेय पिण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि तुम्हाला मुतखड्याचा त्रास होत नाही.
काही लोकांना नैसर्गिक विधीला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे लघवीला झाल्यावर ती रोखून धरतात. ज्यामुळे तुमचा किडनी स्टोनचा त्रास अधिकच वाढू शकतो. यासाठी नैसर्गिक विधी वेळच्यावेळी करणं फार गरजेचं आहे.
किडनीचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी नियमित डाळिंबाचा रस पिणे फायदेशीर ठरेल. कारण या रसामुळे तुम्हाला युरीनला साफ होतं. डाळिंबामध्ये भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो.
गव्हांकुरामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर गव्हांकुराचे फायदे चांगले होतात. जर तुम्ही नियमित गव्हांकुराचा रस घेतला तर तुमचा मुतखडा अगदी सहज पद्धतीने बाहेर पडू शकतो. जर तुम्हाला ताजे गव्हांकुर मिळाले नाहीत तर त्याची पावडर वापरून तुम्ही त्याचा रस करू शकता.
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास कमी करायचा असेल तर हा उपाय नक्की करा. दररोज लिंबू पाणी पिण्याने तुमचा त्रास कमी होऊ शकतो. कारण लिंबातील सायट्रिक अॅसिडमुळे तुमच्या मूत्राशयातील मुतखडे विरघळ्याची शक्यता असते. म्हणूनच आहारात लिंबूपाण्याचा समावेश करा.
तुळशीच्या पानांच्या रसात अनेक औषधी घटक असतात. ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनमधील वेदनेपासून आराम मिळू शकतो. तुळशीच्या पानांमधील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे तुमच्या शरीरातील दाह आणि वेदना कमी होतात. यासाठी सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्या. तुळशीच्या पानांच्या रसामुळे तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थांचा निचरा व्यवस्थित होतो.
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये किडनी स्टोनला विरघळवण्याचे सामर्थ्य असते. जर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर आहारात केला तर तुमच्या मूत्रावाटे मुतखडे विरघळून बाहेर पडू शकतात. शिवाय तुमच्या वेदनादेखील कमी होतात. चांगल्या परिणामासाठी दररोज अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि निरोगी राहा. घरीच मुतखडा उपचार करण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे.
अनेकांच्या घरी पाणफुटीची रोपं कुंडीत लावलेली असतात. पाणफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मात्र एवढंच नाही यामुळे तुमचा मुतखड्याचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी पाणफुटीच्या पानांचा रस नियमित घ्या. ज्यामुळे तुमचे मूत्रशयाच्या समस्या कमी होतील. मुतखडा घरगुती उपाय करण्यासाठी घरीच पाणफुटीचे रोप लावून तुम्ही हा उपाय करू शकता.
मुतखड्याचा त्रास झाल्यावर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काही पदार्थ खाण्यामुळे तुमचा मुतखड्याचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. यासाठी हे पदार्थ खाणे टाळा. शिवाय काही पदार्थ आहारात समाविष्ठ करून तुम्ही किडनी स्टोन पासून स्वतःचा बचाव करू शकता.
सायट्रिक अॅसिड हे एक नैसर्गिक अॅसिड आहे हे तुम्हाला भाज्या, फळे यामधून मिळते. सायट्रिक अॅसिड शरीराच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. लिंबू वर्गीय फळांमध्ये ते मोठ्या प्रमाणात असते. शिवाय अशा पदार्थांमुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत नाही. यासाठी द्राक्षे, संत्री, लिंबू अशा पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर करा.
मुतखडा होणे टाळण्यासाठी आहारातून कॅल्शियम कमी करणे गरजेचे आहे हा एक मोठा गैरसमज आहे. कारण तुमच्या हाडांना बळकटी येण्यासाठी कॅल्शियम गरजेचं आहे. यासाठी कॅल्शियम पदार्थ आहारातून पूर्णपणे नक्कीच टाळू नका. कारण त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
मॅग्नेशियम हे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे मिनरल आहे. मात्र असे असूनही अनेक लोह आहारातून मॅग्नशियम कमी प्रमाणात घेतात ही एक मोठी खंतच आहे. या मिनरल्समुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. शिवाय आहारातील मॅग्नेशियममुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो.
निरोगी शरीर आणि सुदृढ प्रकृतीसाठी आहारात मीठाचे प्रमाण बेताचेच असावे. शिवाय जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर मीठ आहारातून कमी प्रमाणात घेणे फायद्याचे ठरेल. कारण मीठामुळे शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढते. ज्यापासून मुतखडा तयार होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही मासांहारी असाल तर तुम्हाला मुतखड्याची समस्या कमी होईपर्यंत या आहारावर नियंत्रण ठेवायला हवं. याचं कारण मटण, मासे यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याची समस्या अधिक असते.
ज्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात Oxalic acid असतं असे पदार्थ खाणे टाळा. कारण असे पदार्थ मोठ्या प्रमाणावर सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील Oxalic acid चे प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात मुतखडा तयार होण्याची शक्यता अधिक वाढते. यासाटी असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
काही संशोधनानुसार व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ अती प्रमाणात खाण्यामुळे तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यामुळे तुमच्या युरीनमध्ये मुतखडा तयार होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं. मात्र असे पदार्थ शरीरासाठी पोषक असल्यामुळे प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही.
मुतखडा ही आरोग्य समस्या आजकाल अनेकांना जाणवते. मात्र त्याची लक्षणे जाणवल्यावर लगेच योग्य त्या चाचण्या आणि उपचार करण्याची गरज असते.
ब्लड टेस्ट केल्यामुळे तुम्हाला मुतखडा झाला आहे का याचे निदान करता येऊ शकते. कारण रक्त चाचणी केल्यामुळे तुमच्या युरीनमध्ये किती प्रमाणात कॅल्शियम, युरीक अॅसिड आहे हे समजू शकते. तुम्ही तुमच्या रक्ताच्या चाचणीमधून तुमच्या आरोग्याची स्थिती समजू शकते.
तुमच्या युरीनच्या सॅंपलवरून तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे का हे समजू शकते. कारण 24 तासांच्या आत घेतलेल्या युरीनच्या सॅंपलमधून डॉक्टरांना याचे निदान करता येते.
मुतखड्याचे निदान करण्यासाठी तुमच्या पोटाचा एक्स- रे अथवा सोनोग्राफी केली जाते. ज्यामुळे तुमच्या मूत्राशयात नेमके किती आकाराचे मुतखडे झाले आहेत हे अचूक समजू शकते. यासाठी तज्ञ्जांच्या मदतीने तुम्हाला या चाचण्या कराव्या लागतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्य समस्येचे निदान होते. योग्य निदान झाल्यामुळे उपचार घेणे सोपे होऊ शकते.
कधी कधी मूत्रावाटे लहान आकाराचे मुतखडे सहज बाहेर पडतात. जर तुमच्या मूत्रावाटे बाहेर पडलेल्या मुतखड्यांचे सॅंपल डॉक्टरांना दिले तर त्यावरून ते तुमच्या समस्येचे योग्य निदान करू शकतात. या खड्यांवरून तुम्हाला ही समस्या का झाली आहे हे शोधता येते.
या सर्व चाचण्या झाल्यावर तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषध उपचारांनी तुमच्या या समस्येचे निराकरण करता येऊ शकते. काही वेळा फक्त् औषधे घेऊन तुमच्या मूत्राशयातील मुतखडे विरघळून जातात पण जर मोठे मुतखडे झाले असतील तर ते शस्त्रक्रियेनेच काढावे लागतात.
मुतखड्याचा त्रास अनुवंशिक असतो. शिवाय तुम्ही जो आहार घेता त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जरी ही समस्या पूर्णपणे बरी होणार नसली तरी तुम्ही आहार आणि जीवनशैलीत बदल करून तिच्यावर नियंत्रण आणू शकता.
तुमच्या मूत्राशयात किती प्रमाणात आणि ज्या आकाराचे मुतखडे झालेले आहेत यावरून तुम्ही कोणते उपचार करावेत हे ठरतं. जर लहान प्रमाणात मुतखडे झालेले असतील तर तुम्ही घरगुती उपचार करून तुमचा त्रास कमी करू शकता.
पाणी शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी गरजेचे असते. पाण्यामुळे तुम्हाला युरीनला व्यवस्थित होते. युरीनवाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.