मासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय

मासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय

मासिक पाळी आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना दर महिन्याला प्रत्येकीला सहन कराव्या  लागतात. कधी कधी तर मासिक पाळीत होणारी पाठदुखी, कंबरदुखी अथवा पोटदुखी इतकी तीव्र असते की दैनंदिन कामे करणं कठीण जातं. प्रत्येक महिलेचा मासिक पाळीतील त्रास हा निरनिराळा असू शकतो. कोणाच्या पोटात दुखतं तर कोणाच्या कंबरेतून वेदना जाणवतात. कोणाला चक्कर आणि मळमळल्यासारखं वाटतं तर कोणाला ओटीपोट, मांड्यांमधून वेदना जाणवतात. निरनिराळं असलं तरी तर महिन्याला प्रत्येकीला या समस्येला सामोरं जावंच लागतं. शिवाय या समस्येवर दर महिन्याला वेदनाशामक औषधे अथवा इतर औषध उपचार करणे योग्य नाही. यासाठीच जर तुन्हाला  मासिक पाळीमुळे ओटी पोटातून क्रॅम्पस येत असतील तर त्वरीत हे घरगुती उपचार करा. ज्यामुळे तुम्हाला लवकर बरं वाटेल आणि दैनंदिन कामे करणं सोप जाईल. 

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यााठी सोपे उपाय

तेलाने मालिश करा -

मासिक पाळीच्या सुरूवातीला अथवा मासिक पाळी सुरू झाल्यावर तुमच्या पोट, कंबर, मांड्या अथवा पाठीतून कळा येऊ लागतात. पोट फुगल्यासारखं वाटतं. अशावेळी तुमच्या पोट,पाठ, कंबर आणि मांड्यांना कोमट केलेल्या नारळाच्या तेलाने अथवा तिळाच्या  तेलाने मालिश करा. मात्र हे तेल लावताना ते अगदी हलक्या हाताने मालिश करा. रगडून अथवा जोरात मालिश करू नका. तेलाने मालिश केल्यामुळे तुमच्या वेदना कमी होतील.

गरम पाण्याचा शेक घ्या -

कोमट तेलाने मसाज केल्यावर पोट  आणि कंबर गरम पाण्याने शेकवा. आजकाल गरम पाण्यासाठी मिळणाऱ्या हॉट बॅग्ज कोणत्याही केमिस्टच्या दुकानात उपलब्ध असतात. तुम्ही पाण्याची बॉटल अथवा हिटींग पॅडनेही पोट शेकवू शकता. गरम पाण्याच्या शेकामुळे तुमच्या वेदना नक्कीच कमी होतील. 

हर्बल टी प्या -

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. हर्बल टी घेतल्यामुळे तुमच्या पोटाला बरे वाटतं. हर्बल टीमधील औषधी तत्वांमुळे तुमच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

आहारात बदल करा -

मासिक पाळीच्या दरम्यान फार जड आणि मांसाहार करू नका. त्यापेक्षा याकाळात पोषक आणि सात्विक आहार घ्या. ज्यामुळे तुमच्या पोटात गॅस, अपचन होणार नाही. मासिक पाळीच्या काळातील वेदना कमी करता येणं कमी असलं तरी त्या वाढू नयेत यासाठी हा उपाय जरूर करा. दैनंदिन आहारात जर तुम्ही पालेभाज्या, ताजी फळं, सुकामेवा. ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ, तृणधान्य यांचा योग्य वापर केला तर तुमच्या मासिक पाळीच्या वेदना हळहळू कमी होऊ शकतात. 

अॅक्युप्रेशर -

कधी कधी काही सोपे उपाय घरीच करून तुम्ही तुमच्या वेदना कमी करू शकता. यासाठी सोपा उपाय म्हणजे अॅक्युप्रेशर अथवा अॅक्युपंक्चर उपचाप पद्धती. एखाद्या तज्ञ्ज व्यक्तीकडून जर तुम्ही या गोष्टीं शिकून ठेवल्या तर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. शरीरातील काही महत्त्वाचे पॉईंट योग्य प्रेशर देऊन दाबल्यास तुमच्या शरीरातील वेदना कमी होतात. मात्र यासाठी तज्ञ्जांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

shutterstock

झोप घ्या -

मासिक पाळीचा त्रास होत असेल तर पुरेशी झोप घेणं हा एक अगदी साधा उपाय आहे. त्यामुळे शक्य असेल तर अशा वेळी टीव्ही, मोबाईल अथवा इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा सरळ थोडावेळ झोप घ्या.  आरामामुळे तुमचे शरीर निवांत आणि स्नायू शिथिल होतील. ज्यामुळे तुमचा मासिक पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. 

फोटोसौजन्य- शटरस्टॉक

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं

पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय