सध्या आपल्याकडे असं वातावरण आहे की, क्षणात ऊन तर क्षणात पाऊस. यामुळे आपल्या त्वचेवर सर्वात जास्त वाईट परिणाम होत असतो. लवकरच थंडी येईल आणि थंडीत आपली त्वचा जास्त कोरडी होते आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या व्यक्तींना. कारण Combination Skin मध्ये पूर्ण चेहऱ्याची त्वचा ही एकसमान नसते. त्यामध्ये कुठे तेलकट तर कुठे कोरडी अशी त्वचा तुमची होते. त्यामुळे या त्वचेसाठी नक्की कशाचा वापर करायचा याचा अंदाज येत नाही. पण आता तुम्ही जास्त काळजी करू नका. कारण तुम्ही घरच्या घरी फेसपॅकचा वापर करून तुमची त्वचा चमकदार करू शकता. घरगुती फेसपॅकचा वापर हा कधीची तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी हे करून पाहायलाच हवं.
सफरचंद अर्थात apple केवळ तुमच्या आरोग्यासाठीच चांगलं नाही तर तुमच्या त्वचेसाठीही चांगलं असतं. विशेषतः कॉम्बिनेशन त्वचेसाठी खूपच परिणामकारक आहे. यासाठी तुम्ही सफरचंद कापून त्याची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये साधारण 5 चमचे मध मिक्स करा. त्यानंतर हा फेसपॅक व्यवस्थित तुम्ही चेहऱ्यावर लावून घ्या. 15 मिनिट्सनंतर पाण्याने धुवून घ्या.
मध त्वचेला मुलायम बनवतं आणि लिंबाचा रस त्वचेवर उजळपणा घेऊन येतो. तसंच हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावरील तेल दूर राखायला मदत मिळते. मध आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिट्सनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
अवोकाडो त्वचेला अधिक मऊ करून मुलायम बनवण्याचं काम करतं. तसंच तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर हा फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरायला हवा. यासाठी 1 चमचा मॅश्ड (mashed) अवाकाडो घेऊन त्यात 1 छोटा चमचा दही आणि साधारण ½ चमचा मध मिसळा. हे मिश्रण नीट मिक्स करा आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि 15-20 मिनिट्स तसंच ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि परिणाम पाहा.
कोरफडमध्ये त्वचा अधिक चमकदार करण्याची आणि तेल काढून व्यवस्थित मॉईस्चराईज करण्याचे गुण असतात. तसंच काकडीमध्ये त्वचा मुलायम करण्यासह त्वचेवरील टॅन हटवण्याचेही गुण असतात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 चमचा कोरफड जेल अथवा रस, 1 छोटा चमचा मध, 1/4 कप दही आणि अर्धी कापलेली अथवा किसलेली काकडी. आता हे सर्व मिक्सरमध्ये घालून नीट ब्लेंड करा. तयार झालेली ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिट्सने थंड पाण्याने धुवा.
गुलाब चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी आणि गुलाबपाणी पोर्स बंद करण्यासाठी उपयोग होतो शिवाय त्वचा व्यवस्थित टोन करण्यासाठीही होतो. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही एका गुलाबाच्या पाकळ्या (वाटलेल्या) + 1 चमचा गुलाबपाणी + थोडंसं दही + थोडासा मध घ्या. हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. तसंच हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने वर्तुळाकार (circular motion) मसाज करा. 2-3 मिनिट्स मसाज केल्यावर 10-15 मिनिट्स तसंच ठेवा आणि शेवटी पाण्याने धुवा.
संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी हा फेसपॅक म्हणजे वरदान आहे. त्यासाठी तुम्ही एक पिकलेलं पीच (mashed Ripe Peach) मॅश्ड करून घ्या. पॅक तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिट्नंतर धुवा.
तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा 'हे' फेसपॅक
तुमची त्वचा जर कोरडी असेल तर पपई, केळी अशी फळं तुमच्या त्वचेला पोषण देण्यासह मॉईस्चराईज करतात. हे फेसपॅक त्वचेवरील कोरडेपणा आणि तेलकट दोन्हीसाठी उपयुक्त आहे. एका भांड्यात पपई अथवा केळ्याचे तुकडे घेऊन मॅश करा. त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे चेहऱ्यावर लावा आणि मग सुकल्यावर पाण्याने धुवा.
हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतो. ओटमीलची पावडर बनवा. या पावडरमध्ये पेस्ट होण्याइतका मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कमीत कमी 5 मिनिट्स ठेवा आणि मग पाण्याने धुवा आणि चमकती त्वचा मिळवा.
दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं जे त्वचेला पोषण देतं. तसंच स्किन टोनदेखील लाईट करण्यासाठी मदत होते. तसंच तेलकट त्वचा आणि कोरडी कॉम्बिनेशन त्वचेसाठी हा फेसपॅक अप्रतिम आहे. यासाठी तुम्ही 1 चमचा दूध आणि त्यात मध मिसळा हे चेहऱ्यावर लावा. आता त्वचेच्या तेलकट भागावर थोडा लिंबाचा रस लावा आणि कोरड्या भागावर अर्थात गालावर थोडं बदामाचं तेल लावा. 20 मिनिट्सनंतर चेहरा पाण्याने धुवा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.