11 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या सुखसाधनांमध्ये वाढ

11 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या सुखसाधनांमध्ये वाढ

मेष - व्यवसायात लाभ मिळेल

आज तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मानसिक स्थिती समाधानकारक असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आईवडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. 


कुंभ - आईवडीलांसोब मतभेद होतील

आज तुमच्या कुटुंबातील समस्या वाढण्याची शक्यता आहे. आईवडीलांसोबत मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. 


मीन - ताणतणाव जाणवेल

आज नकारात्मक विचारसरणीमुळे तुम्हाला ताणतणाव जाणवणार आहे. एखादी वाईट बातमी मिळाल्यामुळे मन निराश होईल. कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. 


वृषभ - संतानसुख मिळण्याची शक्यता

आज भावंडांमध्ये कडवटपणा येण्याची शक्यता आहे. आईवडीलांची चांगली साथ मिळेल. संतान सुख मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायासाठी कामे मिळण्याची शक्यता आहे. विरोधक नमणार आहेत. 


मिथुन - व्यापारात अडथळे येण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 


कर्क - सुख साधनांमध्ये वाढ होईल

आज तुम्हाला रखडलेले धन मिळणार आहे. भौतिक सुख-साधनांमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. नवीन संबंध निर्माण होतील. मित्रांसोबत व्यावसायिक प्रवास कराल. 


सिंह - विरोधक त्रास देण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास होण्याची शक्यता आहे. दुर्लक्षपणा केल्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे विसरण्याची  शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


कन्या - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज मानसिक समस्यांमुळे तुमचा तणाव वाढणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावध राहा. 


तूळ - ध्येय साध्य कराल

प्रेमसंबंधात ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. जोडीदारासोबत पार्टीला जाण्याची इच्छा वाटेल. अधिकाऱ्यांची साथ मिळेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. देणी घेणी सांभाळून करा. 


वृश्चिक - रचनात्मक कार्यात मन रमवाल

आज तुम्ही एखादे रचनात्मक काम करणार आहात. व्यवसायात राजकारणाची साथ मिळेल. कोर्ट कचेरीत यश मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. परदेशी जाण्याचा योग आहे. 


धनु - आर्थिक संकट येण्याची शक्यता  

आज दिखावा करण्याच्या प्रयत्नात तुमचा खर्च वाढणार आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनासारखा प्रवास कराल. एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल. 


मकर - आरोग्यात सुधारणा येईल

आज तुम्हाला घरगुती उपचारांचा फायदा होईल. मानसिक शांतता मिळणार आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

अधिक वाचा -