18 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता

18 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता

मेष : पाय-गुडघे दुखीमुळे त्रास होऊ शकतो
पाय किंवा गुडघे दुखीमुळे आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. वादग्रस्त प्रकरणे चर्चेच्या माध्यमातून सुटतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे  सहकार्य लाभेल. 

कुंभ : प्रियकराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता 
जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. सामाजिक कार्यात भागीदार वाढेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेले काम पूर्ण करण्यात यश मिळेल.

मीन : विद्यार्थ्यांना येऊ शकतो ताण 
शिक्षणाशी संबंधित समस्यांमुळे विद्यार्थ्यांना ताण येऊ शकतो. निरर्थक वाद टाळा. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. अनुभवी व्यक्तीकडून फायदा करून घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

वृषभ : कौटुंबिक सहकार्यामुळे मिळेल यश 
आज कौटुंबिक सहकार्य मिळेल. यामुळे तुमचं एखादं ध्येय साध्य करण्यासाठी यश मिळेल. घरामध्ये मंगलमय कार्याची योजना आखली जाऊ  शकते. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यवसायात फायदा होईल.

मिथुन : विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल 
विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन चांगल्या पद्धतीनं लागेल. आयुष्याची दिशा नवीन वळण घेईल. खास बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागतील. प्रवासाचा योग आहे. 

कर्क : करार रद्द होण्याची शक्यता 
व्यवसायात तोटा होऊ शकतो. करार रद्द होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर होईल. मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.

सिंह :आरोग्य सुधारेल
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारांतून मुक्तता मिळून आरोग्यामध्ये सुधारणा होईल. निष्काळजीपणे वागू नका. चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. उत्साहात वाढ होईल. आर्थिक बाजू बळकट होईल.

कन्या : प्रेम संबंधांमध्ये तणावाची शक्यता
काही कौटुंबिक समस्यांमुळे प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय योजना पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीत  जोखीम घेऊ नका. रचनात्मक कार्यांमध्ये वाढ होईल.

तूळ : प्रकृतीत बिघाडू शकते  
व्यावसायिक ताणतणावापासून दूर रहा. प्रकृती बिघडू शकते. रक्तदाब संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा.  कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक : अचानक धनलाभाची शक्यता 
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे सहजरित्या पूर्ण  होतील. उत्साहात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्तीमध्येही वाढ होईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. वृद्धांची काळजी घ्या.

धनु : प्रेम संबंध सुधारण्याची शक्यता
प्रेमसंबंधात निर्माण झालेली कटुता दूर होऊ नाते सुधारण्याची शक्यता आहे. कार्यालयाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. विवादास्पद प्रकरणे मार्गी लागतील. आत्मसन्मान वाढेल. आर्थिक स्थिती बळकट होईल. धर्मकार्यात रस वाढेल.

मकर : योजनांसंदर्भातील समस्या कायम राहतील
व्यावसायिक योजनांमधील अडचणी कायम राहतील. काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी दबाव येईल. द्विधा परिस्थिती निर्णय घेण्यास असमर्थ ठराल. रचनात्मक कार्यांमध्ये मन गुंतेल.

वाचा अधिक : 

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या

राशीनुसार निवडा तुमचे करिअर