19 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, धनु राशीच्या व्यक्तींना महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता

19 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, धनु राशीच्या व्यक्तींना महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता

मेष : नोकरीसाठी धावपळ
मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी धावपळ होईल. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा दाखवल्यास महागात पडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. आजारानं त्रस्त होऊ शकतो.

कुंभ : व्यावसायिक योजना थांबवावी लागू शकते
आळस आणि निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. एखादी विशिष्ट व्यावसायिक योजना थांबवावी लागेल. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

मीन : अडकलेले पैसे मिळण्याची चिन्हे
तुमचे अडकलेले पैसे आज मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायानिमित्त केलेली परदेशवारी यशस्वी होईल. राजकारणात सक्रियता वाढेल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील.

वृषभ : जोडीदाराच्या प्रकृतीत बिघाड
जोडीदाराच्या प्रकृतीबाबत चिंता वाटेल. मनात निराश आणि असंतोषाची भावना असेल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात रस वाढेल.

मिथुन : सामाजिक बाजू भक्कम होईल
अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे. सामाजिक बाबींमध्ये तुमची बाजू भक्कम होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढू शकतात.

कर्क : विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारेल
नव्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य अधिक सुधारण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती, व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणात आवड वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

सिंह : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात सतर्कता बाळगा. गुंतवणूक करण्याचा निर्णय टाळा. अनावश्यक खरेदीमुळे अर्थसंकल्पात अडथळा निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदारी पार पडण्यात यश मिळेल.

कन्या : प्रसन्नता जाणवेल
जीवनशैलीतील बदलामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. आज तुम्हाला प्रचंड उत्साहीत आणि प्रसन्न वाटेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. कार्यालयाच्या ठिकाणी अनुकूल वातावरणामुळे मन आनंदित राहील.

तुला : जुन्या घटनांमुळे मन विचलित राहील
जुन्या घटनांमुळे मन विचलित राहील. अपत्याकडून निराशाजनक बातम्या मिळू शकतात. सहकाऱ्यांसोबत वाद वाढण्याची अपेक्षा आहे. धार्मिक कार्यात मन गुंतेल. कायदेशीर प्रकरणातून सुटक होईल.

वृश्चिक : हाता-पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त राहाल
हाता-पायाच्या दुखण्यामुळे तुम्ही आज त्रस्त राहाल. नियमित दिनक्रम पाळा. जोखीम असलेल्या कार्यांमध्ये आवड निर्माण होईल. वादग्रस्त प्रकरणे मार्गी लागतील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल.

धनु : महागड्या भेटवस्तू आणि पैसे मिळू शकतात
पालकांकडून महागडी भेटवस्तू आणि रोखरक्कम मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीची भेट सुखद असेल. वाहन चालवताना सतर्कता बाळगा. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील. परदेशवारीचा योग आहे. धार्मिक कार्यात रस असेल.

मकर : मैत्रीचं रुपांतर प्रेमात होण्याची शक्यता
जुन्या मैत्रीचं प्रेमामध्ये रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. जोडीदारासोबत आजचा दिवस मजेत जाईल. प्रभावशाली व्यक्तीची भेट झाल्यास फायद्याचे ठरेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा :

जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्ती असतात कंटाळवाण्या

या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार

जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग