20 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नतीची शक्यता

20 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नतीची  शक्यता

मेष : मालमत्ता खरेदीची योजना
मालमत्ता खरेदीची योजना आखली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. व्यवसायात नवीन करार मिळतील. आत्मविश्वास वाढेल. खर्‍या प्रेमाचा शोध सुरूच राहील. वाहन वापरताना सतर्कता बाळगा.

कुंभ : अविवाहितांसाठी वेळ चांगली
अविवाहितांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाऊ शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत नवीन संधी मिळतील. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल. वाहन वापरात सतर्कता बाळगा.

मीन : विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करू नये
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, याचे चुकीचे परिणाम होण्याची शक्यता आहे. कार्यालयाच्या ठिकाणी सहकाऱ्यासोबत वाद वाढू शकतात. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. आनंददायी बातमीने मन प्रसन्न होईल.

वृषभ : निष्काळजीपणामुळे चांगली संधी गमवाल
निष्काळजीपणामुळे तुम्ही आज चांगली संधी गमावाल. व्यवसायात चढ-उताराची परिस्थितीत राहील. वरिष्ठांकडून ताण वाढू शकतो. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य केले मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

मिथुन : प्रकृती बिघडू शकते
आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये सतर्कता बाळगा. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक असेल. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कर्क : भाऊ-बहिणीतील कटुता दूर होईल
भाऊ-बहिणीच्या नात्यातील कटुता दूर होईल. अपत्याकडून चांगली बातमी मिळू शकते. महत्त्वपूर्ण बाबींमध्ये त्वरित निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे.

सिंह : रचनात्मक कार्यांमध्ये प्रगतीची शक्यता
व्यवसायात राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची परदेशवारी होऊ शकते. नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगती होण्याची शक्यता. प्रियकर/प्रेयसीसोबत झालेली भेट सुखद असेल.

कन्या : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू गमावण्याची किंवा त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण बाबींमध्ये त्वरित निर्णय घ्या. अनावश्यक खर्चामुळे बजेट कोलमडू शकते. वृद्धांच्या आरोग्याची चिंता राहील. जोडीदाराचा भावनिक सहवास लाभेल.

तूळ : आजारात सुधारणा होतील
जीवनशैलीत बदल केल्यामुळे मधुमेहासारखे आजार सुधारतील. नियोजित काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकेल. अभ्यासात यश मिळेल.

वृश्चिक : फसवणूक होण्याची शक्यता
व्यवसायात भागीदाराकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखादी वाईट बातमी ऐकण्यास मिळू शकते. अनपेक्षित प्रवास घडू शकतो. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळण्याची शकेल. आर्थिक परिस्थिती बळकट राहील.

धनु : जोडीदाराच्या प्रकृतीत बिघाड होईल
जोडीदाराच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं मन अशांत राहील. मनात निराश आणि अंसतोषाची भावना असेल. कार्यालयाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. धार्मिक कार्यात विश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होईल.

मकर : नोकरीत पदोन्नती मिळेल
नवीन व्यावसायिक संबंधांमध्ये फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दिवस व्यस्त असेल. सुख-सोयींमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात चूक होऊ शकते.

अधिक  वाचा :

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार