3 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, कुंभ राशीसाठी दिवस रोमॅंटिक

3 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, कुंभ राशीसाठी दिवस रोमॅंटिक

मेष - आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे

कमी वेळात अधिक कमावण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचे नुकसान करून घेणार आहात. विनाकारण खर्च करणे टाळा. आर्थिक स्थिती बिघडू शकते. तणाव वाढण्याची  शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट होईल. 


कुंभ - जोडीदाराशी नाते रोमॅंटिक असेल

आज जोडीदारासोबत तुमचे नाते रोमॅंटिक असेल. सामाजिक सन्मानात वाढ होईल. जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अधिकाऱ्यांशी नाते मजबूत असेल. व्यावसायिक प्रवासाला जाण्याची  शक्यता आहे.


मीन - नवीन यश मिळेल

आज तुम्हाला रचनात्मक कार्यात प्रगती होईल. रखडलेली कामे पुन्हा नव्याने सुरू करण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी प्रवास सुखाचा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. 

वृषभ - आरोग्य उत्तम असेल

आज जीवनशैली आणि आरोग्य उत्तम असेल. जुनी प्रिय व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.व्यवसायातील ओळखींचा फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. 


मिथुन - कठीण काळात जवळच्या व्यक्तींची मदत मिळणार नाही

आज तुम्हाला तुमच्या कठीण काळात जवळच्या व्यक्तीची मदत मिळणार नाही. विरोधक सक्रीय होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींमुळे ताण वाढवून घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय बदलावा लागेल. 


कर्क -  मुलांचा तणाव वाढेल

आज मुलांची चिंता तुम्हाला सतावणार आहे. अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. देणी घेणी सांभाळून करा. 


सिंह - आयात निर्यातीच्या कामात यश मिळेल

आज तुम्हाला आयात निर्यातीच्या कामात यश मिळेल. विद्यायर्थ्यांना खेळात आवड निर्माण होईल. नवीन मित्रांची भेट होईल. मुलांकडून आनंदीची बातमी मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. 


कन्या - भावनात्मक मतभेद दूर होतील

आज तुमच्या भावनिक नातेसंबंधांमधील मतभेद दूर होतील. मित्रांसोबत मौजमस्ती कराल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. नवीन ओळखींचा फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. 


तूळ - कामे रद्द होण्याची शक्यता 

मेहनत करूनही चांगला लाभ मिळणार नाही. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. आर्थिक कष्ट होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता 

आज रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातून सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रेमसंबंधात महत्त्वाचे निर्णय त्वरीत घ्यावे लागेल.  


धनु - करिअरसाठी दगदग करावी लागेल

आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार आहे. विनाकारण खर्च करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.जोखिमेची कामांपासून  दूर राहा. 


मकर - आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. देणी घेणी सांभाळून करा. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का