5 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रेमात यश

5 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रेमात यश

मेष - प्रेमात यश मिळेल

आज तुम्हाला प्रेम प्रस्तावात यश मिळेल. जोडीदाराशी नातेसंबंध मजबूत होतील. सामाजिक सन्मानात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. आरोग्य चांगले असेल. 


कुंभ - कामे रद्द होण्याची शक्यता

आज तुम्ही घाई केल्यामुळे कामात चुका करू शकता. कामे यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. राजकारणातील एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. 


मीन - स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता

आज तुमचे मन निराश होण्याची शक्यता आहे. स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. जोडीदाराकडून सरप्राईज मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 


वृषभ - रचनात्मक क्षमता वाढेल

आज तुम्हाला मनासारखं यश मिळेल. रचनात्मक क्षमता वाढणार आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळणे सोपे जाईल. प्रेमाची जाणिव होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. 


मिथुन - कर्ज घ्यावे लागेल

आज दिखावा करण्याच्या प्रयत्नात तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे.उत्पन्नावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाची साथ मिळेल. रचनात्मक कार्यात वाढ होईल.  


कर्क - आरोग्य चांगले राहील

आज तुमचे  आरोग्य उत्तम असेल. काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात असेल. नोकरीत बदल करावे लागतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. प्रेमात यश मिळेल. 


सिंह - प्रेमसंबंधात दूरावा येऊ शकतो

आज तुमच्या प्रेमसंबंधात दूरावा येण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. सामाजिक स्तरावर समस्या येतील. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. राजकारणातील रस वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.  


कन्या - दुखण्यामुळे निराश व्हाल

आज तुम्हाला हातापायाचं दुखणं जाणवणार आहे. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. बिघडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. प्रवासाला जाणे सध्या टाळा.

 

तूळ - धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. नवीन टेकनिकचा प्रयोग लाभदायक ठरेल. प्रतिष्ठित व्यक्तींची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात यश मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - घरातील लोकांमुळे कामे पूर्ण होतील

आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाची जाणिव होणार आहे. कौटुंबिक मदतीमुळे व्यावसायिक कामे पूर्ण होतील. जुन्या मित्रांशी झालेली भेट आनंदाची असेल. रागावर नियंत्रण ठेवा. लहान सहान आजारपणांना सामोरं जावं लागेल. 


धनु - अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. आत्मविश्वास कमी जाणवेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. 


मकर - भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून भेटवस्तू मिळणार आहेत. भागिदारीचा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. रखडलेली पेैसे मिळतील. विद्यार्थ्यांना कला आणि संगीत क्षेत्रात आवड निर्माण होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

अधिक  वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी