17 नोव्हेंबर 2019चं राशीफळ, वृषभ राशीच्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता

17 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,  वृषभ राशीच्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता

मेष : खास व्यक्तीसोबत भेट शक्य
एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट घडू शकते. कौटुंबिक तणाव दूर होईल. जोडीदारासह एखाद्या सोहळ्यात जाण्याची संधी मिळेल. एखाद्या संस्थेमार्फत सन्मान करण्यात येईल. अपत्यांकडून चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ : महत्त्वाचे काम रखडू शकते
कार्यालयाच्या ठिकाणी ओळखीच्या अभावी एखादं काम करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचं काम रखडू शकते. विरोधकांपासून सावध राहा. अचानक धनलाभ होऊ शकतो. राजकारणातील आवड अधिक वाढू शकते.

मीन : घरातील सदस्याच्या प्रकृतीत बिघाड
कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागतील. आर्थिक व्यवहारांचे प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक कार्यांमधली रुची वाढेल. 

वृषभ : पदोन्नती मिळण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी झालेल्या बदलाचा फायदा होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील सर्व करार पूर्ण होतील. मेहनतीला यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. 

मिथुन : मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यानं तुम्ही दुःखी होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजनासंदर्भात चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण आणा. आर्थिक बाबींसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. नवीन नातेसंबंध देखील निर्माण होण्याची शक्यता. 

कर्क : मानसिक तणाव दूर होईल
कौटुंबिक वाद मिटल्यानं मानसिक तणाव दूर होईल. तब्येत ठीक राहील. व्यवसायात मेहनत केल्याने मोठे यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवहारात सतर्कता बाळगा.

सिंह : कौटुंबिक कलह वाढेल
कौटुंबिक संपत्ती प्रकरणामुळे कुटुंबात तणाव वाढू शकतो. अपत्यांच्या वर्तनामळे दिवस चिंतेत जाईल. राजकीय कार्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कन्या : शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल
अनावश्यक धावपळीमुळे त्रस्त व्हाल. यामुळे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. नियमित दैनंदिन कार्य करा. व्यवसायाच्या निमित्तानं झालेल्या प्रवासामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

तूळ : अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता  
एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक : एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता  
एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. आखलेल्या कार्यांमध्ये  तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. जोडीदाराबरोबरचे संबंध रोमँटिक असतील. अचानक एखाद्याला गरजूला मदत करावी लागेल. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.

धनु : करिअरची चिंता
करिअरबद्दल तरुणांना चिंता सतावणार आहे. कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. वादविवाद करणं टाळा. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत भेटू घडू शकेल. सामाजिक बाबींमध्ये तुमची बाजू बळकट होईल.

मकर : नवीन व्यवसाय सुरू होऊ शकेल
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जोडीदारासह प्रवासाचे नियोजन केले जाईल.

अधिक वाचा :

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का