दिवसभर आपले पाय किती काय सहन करत असतात. गर्दीतून वाट काढतात, आपल्याला इच्छित ठिकाणी लवकर पोहोचवण्यास मदत करतात आणि बरेच काही….दिवसभर इतके काम करणाऱ्या पायांना कधीतरी आरामाची ही गरज असते. आता तुमच्या पायांची योग्य काळजी घेणे तुमच्याच हातात आहे. तुमचे पाय चांगले राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या पायांची काळजी घेता यायला हवी. म्हणूनच आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. पायांची काळजी घेताना पायांच्या नेमक्या समस्या कोणत्या आणि पाय चांगले राहावे म्हणून काय करायला हवे ते पाहुयात.
पायांचे सौंदर्य वाढविणारे पेडिक्युअरचे हे प्रकार तुम्हाला माहीत हवे
पायांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच काही त्रास होत असतात. तुम्हालाही पायांसदर्भात आम्ही माहिती देत असलेल्या तक्रारी आहेत का ते पाहा.
पायांना भोवरी येण्याचा त्रासही 100तील 75लोकांना होतोच. एकदा हा त्रास झाला की, भोवरी झालेला भाग खूप दुखू लागतो. पायाच्या खालच्या बाजूला जो असतो त्याला Corns म्हणतात आणि तळव्याकडे येणाऱ्याला callus असे म्हटले जाते. या त्रासाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.
पायांना सतत जखमा पडणे. बोटांच्यामध्ये जखमा होणे. तळपायाला जखमा होणे असे प्रकार अॅथलीट फूटमध्ये दिसू लागतात. हा त्रास असह्य असतो. नखांवर देखील हा त्रास दिसू लागतो. सतत वाढणाऱ्या जखमा तुमच्या पायांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतो.
पायांंसंदर्भातील हा त्रासही सर्वसाधारण आहे.पायांचे हाड वाढण्याची अनेकांची तक्रार असते. पायांचे हाड वाढल्यानंतर ते आधी लक्षात येत नाही. पण जेव्हा तुमच्या अंगठ्याचे हाड जास्त वाढू लागते. त्यावेळी मात्र तुमच्या पायांचा आकारही बदलू लागतो. तुमच्या पायांचे हाडही वाढू लागले असेल तर तुम्ही आताच त्याची पायांची काळजी घ्या.
क्रॅम्पस असा शब्द तुम्ही सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या तोंडून ऐकला असेल. अनेकदा अचानक आपले स्नायू ताणले जातात.स्नायू अचानक ताणल्यानंतर थोडावेळ चालताही येत नाही. हा त्रास फार लोकांना असतो. त्यामुळे पायांसंदर्भातील हा त्रास फारच सर्वसाधारण आहे.
खूप जणांना पायांना खूप घाम येतो. याचा परिणाम बूट काढल्यानंतर पायांना खूप घाण वास येऊ लागतो. पायांना असा घाण वास आल्यानंतर चारचौघात फारच लाज जाते. खूप जणांच्या पायांना असा घाण वास येतो. पण त्याकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. पण असा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही तुमची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
पाय सतत पाण्यात असतील तर अशांना पायांचे अनेक त्रास असतात. त्यापैकी एक त्रास म्हणजे पायांच्या नखांना बुरशी येते. बुरशीचे कारण आपल्या नखांचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. तुमचे पाय वाळले नाही तरी देखील तुमच्या पायांना घाणेरडा वास येऊ शकते. पाय पांढर पडणे, पायाची त्वचा सुरकुतणे असे त्रास तुम्हाला यामुळे होऊ शकतात.पायांच्या नखांना बुरशी येण्यासोबतच पायांनाही योग्य काळजी घेतली नाही तर फंगस येऊ शकतात. सतत पाण्यात असणाऱ्यांना, डिटर्जंटच्या संपर्कात असणाऱ्यांना तर हा त्रास हमखास होतो. संपूर्ण तळव्यांना फंगस आल्यानंतर चालायलाही कंटाळा येतो. चपला लागू लागतात. पायातील मॉयश्चर कमी होऊन पायांना भेगा पडतात आणि जखमा होऊ लागतात.
नखांच्या संदर्भातील आणखी एक त्रास म्हणजे तुमच्या पायांची नखं दुभंगणे. अनेकदा काही कारणामुळे तुमच्या पायांची नख तुटू लागतात किंवा दुभंगू लागतात. दुभंगलेल्या नखांमुळे अनेकदा त्यातून रक्तस्राव होऊ लागतो. या नखांना जरासा ही धक्का लागला तरी कळ मस्तकात जाते. त्यामुळे ज्यांची नखं तुटलेली आहेत. त्यांनी विशेष काळजी घेणे फारच गरजेचे असते.
अनेकदा चुकीच्या चपलांची निवड पायांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. जर तुम्हाला योग्य चपला घालायचे कळत नसेल तर तुम्ही याची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. फार घटट्, फार मोठ्या चपलांमुळे तुमच्या पायांना आराम मिळत नाही. उलट तुमचे पाय त्यामुळे अधिक दुखू लागतात अनेकांना चुकीच्या चपलांच्या निवडल्यामुळे पायदुखीचा त्रास होतो.
काही जणांना पायांना सतत जखमा होत असतात. या जखमा त्यांना चुकीच्या चपलांच्या निवडीमुळे तर होतातच. शिवाय अनेकदा काहींना पाय खाजवण्याची सवय असते. यामुळेही अशा प्रकारच्या जखमा होतात. पायांना झालेल्या जखमा तुम्ही अजिबात दुर्लक्षित करुन चालत नाही. तर तुम्हाला त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. कारण तुम्हाला त्यामुळेच तुम्हाला साथीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे या जखमांवर त्वरीत औषधोपचार करणे आवश्यक असते.
पायांच्या त्रासामध्ये टाचदुखीचा त्रास हा हमखास अनेकांना असतो. अनेकदा टाचांना भेगा पडल्यानंतर टाचा दुखण्याचा त्रास अनेकांना होतो. टाचदुखी असलेल्यांना पाय जमिनीवर टेकवणेही अगदी नकोसे होऊन जाते. टाचांसंदर्भात त्रास असलेल्यांना अनेकदा पायदुखण्याचा त्रास असतो. टाचा खाली न टेकवल्यामुळे संपूर्ण भार हा पोटऱ्यांवर येतो आणि त्यामुळे पाय दुखू लागतात.
तुम्हाला पायांचे कोणतेही त्रास नको असतील तर तुम्ही तुमच्या पायांची घरच्या घरीही अगदी सोप्या सोप्या गोष्टींतून काळजी घेऊ शकता. घरच्या घरी पायांची काळजी नेमकी कशी घ्यावी ते पाहुया
पायांच्या काळजीमध्ये सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे पाय स्वच्छ ठेवणे. तुम्ही अगदी कुठेही गेलात तरी तुमचे पाय धुणे हे महत्वाचे असते हे अगदी लहानपणापासूनच आपल्याला सांगण्यात येते. त्या गोष्टीचा विसर तुम्हाला पडला असेल तर पायांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही पाय स्वच्छ ठेवा. तुम्ही घराबाहेर पडत नसाल तरी तुम्ही दोन ते तीन वेळा पाय धुवायलाच हवे. रात्री झोपताना तुम्ही आंघोळ करुन झोपत नसाल तर तुम्ही रात्री पाय धुवूनच झोपायला हवे.
पायांच्या नसांना आराम मिळावा म्हणून अनेक जण दर महिन्याला पेडिक्युअर करुन घेतात. पेडिक्युअरमध्ये तुमचे पाय आधी गरम पाण्याच बुडवून ठेवले जातात. पाय गरम पाण्यात ठेवल्यानंतर तुमच्या पायांच्या नसा रिलॅक्स होतात. आता प्रत्येकाला पेडिक्युअर करणे शक्य नसते. कामांच्या वेळा, कामाचे स्वरुप, घरातील कामं यामधून स्वत:साठी वेळ काढणे कठीण गोष्ट असते. अशावेळी तुम्हाला घरच्या घरी आंघोळ करताना गरम पाण्यात पाय बुडवून ठेवता येईल. आठवड्यातून तुम्ही किमान दोनदा तरी गरम पाण्यात पाय ठेवा. तुम्हाला आराम मिळेल
तुमचे पाय तुम्हाला खरखरीत लागत असतील तर तुम्हाला तुमचे पाय मॉश्चराईज करण्याची गरज आहे. तुम्ही घराबाहेर पडताना आणि रात्री झोपताना तुमच्या पायांना मॉश्चरायधर लावून झोपा. तुम्हाला तुमच्या त्वचेत बराच फरक झालेला दिसेल. त्यामुळे तुमच्या नियमित वापरामध्ये एखादे फूट क्रिम किंवा मॉश्चरायझर अगदी हमखास असू द्या. जर तुम्हाला पायाला मसाज करता येत असेल तर फारच उत्तम कारण त्यामुळे तुम्हाला फारच बरे वाटेल.
काही जणांना नखं कापण्याचा फारच कंटाळा असतो. पण नखं न कापण्याची ही सवय तुमच्या पायांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. कारण जर तुम्ही योग्य वेळी नखं कापली नाही तर नखं तुटण्याचा, दुभंगण्याचा आणि त्यामुळे जखमा होण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. नख दुभंगली आणि ती सतत तुटत राहिली तर मात्र पायांचे सौंदर्य बिघडतेच. शिवाय तुम्हाला सतत त्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पायाची नखं जास्त वाढवू नका. पायांची नखं आठवड्यातून एकदा तरी कापा.
मसाजचे फायदे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. तुमच्या पायांसाठी मसाज हा फारच महत्वाचा असतो. कोणतेही क्रिम किंवा तेल घेऊन तुम्ही तुमच्या पायांना छान मसाज करा. जर तुम्हाला पायांचा मसाज करायचे माहीत नसेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहून मसाज करणे शिकू शकता. मसाज करताना तुम्हाला तुमच्या पायांच्या बोटांपासून सुरुवात करायची आहे. पायांची बोट, टाचा आणि पोटऱ्या यांना योग्य पद्धतीने मसाज करा.
कधी कधी पायांवर मृत त्वचा साचून राहते. मृत त्वचा पायांवर तशीच राहिली तर तुमचे पाय घाणेरडे दिसू लागतात. तुम्हाला तुमच्या पायांचे सौंदर्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पायांवरची मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पायांना स्क्रब करा. तुमच्याकडे कोणतेही स्क्रब असेल तरी तुम्ही ते पायांना चोळा. तुम्हाला किमान 10 मिनिटे तरी हे स्क्रब पायांना चोळायचे आहे.
पायांची काळजी घेण्यामध्ये नखांची स्वच्छता ही फार महत्वाची आहे. नख कापण्यासोबतच नखातली घाण काढणेही महत्वाचे असते. नखांमध्ये घाण राहिली तर तुम्हाला कोर होण्याची शक्यता असते. नखांना कोर झाले की,मग नखांचे कोपरे दुखू लागतात. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही नख रोजच्या रोज स्वच्छ करा. जर तुम्ही मातीत जास्त खेळत असाल तर मग तुम्हाला तुमच्या नखात साचणारा कचरा तुम्ही योग्य वेळी काढायला हवा.
काहींना टाचा दुभंगण्याचा त्रास असतो. विशेषत: हिवाळ्यामध्ये हा त्रास अगदी हमखास होतो.टाचांसंदर्भात तुमच्याही काही तक्रारी असतील तर तुम्ही टाचांची काळजी घ्यायला हवी. दररोज रात्री तुम्ही तुमच्या टाचांना कोकमाच्या मुळीयाल तुमच्या टाचांना चोळा तुम्हाला आराम मिळेल. या शिवाय बाजारात टाचांची काळजी घेण्यासाठी काही विशिष्ट सॉक्स मिळतात त्यांचा वापरही तुम्ही करु शकता.
पायांना सनस्क्रिन लावण्याची काय गरज असे अनेकांना वाटते. पण तुम्ही तुमचे पाय नीट निरखून पाहिले तर तुम्हाला तुमचे पाय टॅन झालेले दिसतील. त्यामुळे चेहऱ्यासोबत तुमच्या पायांनाही सनस्क्रिनची गरज असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायांना सनस्क्रिन लावायला विसरु नका. घरातून बाहेर पडताना तुमच्या पायांना सनस्क्रिन लावा.
पायांची काळजी घेताना तुम्हाला वरील सगळे पर्याय अवलंबता येतीलच. पण त्यासोबतच पायांच्या काळजीमध्ये पायांचा व्यायामही महत्वाचा आहे. पायांचा व्यायाम करताना स्कॉट्स, स्कॉट्स किक, फ्लटर किक्स असे काही व्यायाम प्रकार अगदी हमखास करु शकता. त्यामुळे तुम्ही पायाचा व्यायाम करायला अजिबात विसरु नका.
पायांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला जर चांगल्या क्रिम हव्या असतील तर तुमच्यासाठी आम्ही या 10 क्रिमची निवड केली आहे. तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेण्यासाठी या क्रिमची निवड करु शकता.
बेबी प्रोडक्टसाठी हिमालया फारच प्रसिद्ध आहे. त्याची पायांची काळजी घेणारी ही क्रीम फारच चांगली आहे. फुटलेल्या टाचांसोबत तुमच्या निस्तेज पायांना कोमलपणा आणण्याचे काम हे क्रीम करते. त्यामुळे तुम्ही हे क्रीम वापरायला काहीच हरकत नाही.
ओरिफ्लेमच्या क्रीमही फारच चांगल्या असतात. त्यांची अवॅकाडो आणि अॅलोव्हेरा असलेले हे फूट क्रीम पायांसाठी फारच चांगले आहे. तुमचे पाय कोरडे पडले असतील तर तुम्ही तुमच्या पायांना ही क्रीम लावू शकता. रात्री झोपताना ही क्रीम लावा म्हणजे तुम्हाला तुमच्या पायामध्ये झालेला बदल जाणवेल.
तुमच्या पायांसाठी कायाची ही क्रीमही चांगली आहे. याला वापरणे फारच सोपे आहे. पायांसोबतच तुम्हाला ही जंतू हत्या हात काळजी क्रीम लावा येते. त्यामुळे तुम्हाला ही क्रीम फायदेशीर ठरते. या क्रीमचा डबा कदाचित तुम्हाला फारसा आवडणार नाही. कारण तुम्हाला क्रीमसाठी सतत हात डब्यात घालावा लागतो.
जर तुम्ही चांगल्या फ्रॅगनंन्सच्या शोधात असाल तर तुम्ही ही क्रीम नक्कीच वापरु शकता. तुम्हाला याचा वास नक्कीच आवडू शकेल. पायांना कोमल करण्याचे काम हे क्रीम करते.
तुम्हाला हर्बल्स प्रोडक्ट आवडत असतील तर मग तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच वापरुन पाहायला हवे.लवंगाचे तेल आणि चंदनाचे तेल यामध्ये असल्यामुळे त्याचा मंद सुगंध येतो.
किमतीच्या तुलनेत हे क्रीम महाग असले तरीदेखील तुम्हाला ही क्रीम आवडू शकेल. तुम्हाला अगदी किंचितशी क्रीम घेऊन पायांना लावता येईल. या क्रीममध्ये शिआ बटर असल्यामुळे तुमच्या पायांची त्वचा कोमल होते.
पायांना मॉश्चरायझ करताना त्यांचे स्पा करणेही गरजेचे असते. पेडिक्युअर करताना स्पा पेडिक्युअर करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला ते करणे शक्य नसेल तर तुम्ही ही क्रीम नक्कीच वापरु शकता.
सोल ट्री उत्पादन खूप प्रसिद्ध आहे. या क्रीममध्ये आपणास हाताची काळजी घेणारी उत्पादने आणि फूट क्रीम यांचे समान मिश्रण मिळू शकते. कोकम आणि मध अर्क या क्रीममध्ये आहे. तर ही पाय आपल्या पायांच्या तळांवर चांगली आहे.
द मॉम्स कंपनीचे हे प्रोडक्ट असून पायांच्या सौंदर्यासाठी हे प्रोडक्ट फारच उत्तम आहे. शिआ बटर, ऑरगन ऑईल, ऑलिव्ह ऑईल असल्यामुळे तुमच्या पायांची काळजी हे प्रोडक्ट घेऊ शकते.
खादीचे प्रोडक्टही फारच प्रसिद्ध आहे. तुम्ही जर या आधी कधी हे प्रोडक्ट पाहिले नसतील तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच पाहू शकता. याची किंमतही फार कमी आहे. त्यामुळे एकदा वापरुन पाहायला काहीच हरकत नाही.
प्रत्येक वेळी पार्लर किंवा तज्ज्ञांकडे जाऊन पायांची काळजी घेणे शक्य नसते. अशावेळी तुम्हाला तुमच्या पायांची काळजी घरच्या घरीही अगदी सहज घेता येऊ शकते. पाय स्वच्छ धुणे, नखं वेळच्यावेळी कापणे,नखांमधील घाण स्वच्छ करणे अशा गोष्टी तुम्ही घरच्या घरी करु शकता. तुम्ही तुमच्या पायांना आठवड्यातून किमान दोनवेळा तरी गरम पाण्यात बुडवून ठेवा. तुमच्या पायांना आराम मिळेल.
तुम्ही जर पायांमध्ये सॉक्स घालत असाल तर ते चांगलेच आहे. पण घट्ट आणि जाड सॉक्स घालू नका. पातळ सॉक्स घाला. सॉक्स घालण्याआधी तुम्ही तुमच्या पायांना मॉश्चरायझर क्रिम लावा. म्हणजे तुमच्या पायांना ते मुलायम ठेवण्यास मदत करतील. मॉश्चरायझर क्रिमसोबत तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालू शकेल.
काही जणांना पाय गरम होण्याचा त्रास असतो. विशेषत: ज्यांना उष्णतेचा त्रास असतो. त्यांना हा त्रास अगदी होतोच. अशांनी पायांची विशेष काळजी घ्यायला हवी. ही काळजी घेताना तुमच्या पायांसाठी तुम्ही आरामदायी चपलांची निवड करायला हवी. शिवाय जर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा. कारण ही एक मेडिकल कंडीशन आहे. ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत हवे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.