अशक्तहिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय (How To Increase Hemoglobin In Marathi)

 Increase Hemoglobin In Marathi

मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती माहीत असायलाच हवी. 

Table of Contents

  How To Increase Hemoglobin In Marathi

  मानवी शरीराला सरासरी किती हिमोग्लोबिनची गरज असते (How Much Hemoglobin Does Human Body Need)

  हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण हे ग्रॅम अथवा डेसिलीटरमध्ये तपासले जाते. सहा अथवा तीन महिन्यातून डेली रूटीन चेकअप करून तुम्ही तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक केली जाते.  हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आणि लिंगानुसार निरनिराळे असते. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण 17 ते 22 असू शकते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण 11 ते 13 असायला हवे. पौढ वयातील महिलांमध्ये याचे हिमोग्लोबिन 12 ते 16  तर पुरूषांमध्ये हे प्रमाण 14 ते 18 असणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येकाच्या आहारानुसार यात कमी जास्त प्रमाण होण्याची शक्यता दाट असते. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्याठी संतुलित आहार गरजेचा आहे.

  Hemoglobin In Marathi

  हिमोग्लेबबिन कमी होण्याची कारणे (Causes Of Low Hemoglobin In Marathi)

  हिमोग्लोबिन शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी गरजेचं असतं. म्हणूनच ते  कमी झाल्यास शरीरावर त्याचा विपरित परिणाम जाणवतो. यासाठी हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणं माहीत असायलाच हवी. 

  काही गंभीर आजारपणे

  अॅनिमिया, डेंग्यू, थॅलसिमिया, अल्सर, कॅन्सर,  गंभीर किडनीचे आजार अशा आजारपणात अचानक शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. शरीरातील लाल पेशी जितक्या वेगाने कमी होतात तितक्या वेगाने त्या वाढत नाहीत. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आजाराला मात करण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी पडते.

  रक्तस्त्राव

  एखादा अपघात, जंतूसंसर्ग, जखम, वाढलेला रक्तदाब, मासिक पाळीबाबत समस्या अशा अनेक कारणांमुळे अती प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे लाल रक्तपेशी शरीरातून मोठ्या प्रमाणावर कमी होतात. अशा वेळी शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. 

  गरोदरपण

  गरोदरपणात शरीरात अनेक बदल होत असतात. ज्यामध्ये रक्त आणि रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणातही बदल होतात. कधी कधी शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे गरोदरपणात हिमोग्लोबिनच्या पातळीत बदल होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या प्रेगनन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी.

  Hemoglobin In Marathi

  वारंवार रक्तदान करणे

  काही लोकांना वारंवार रक्तदान करण्याची सवय असते. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. मात्र कधी कधी प्रमाणापेक्षा अधिक रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. ज्यामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीत बदल होतात. 

  आहारातील लोहाची कमतरता

  शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी पोषक आणि संतुलित आहाराची शरीराला गरज असते. मात्र शरीराला पुरेसे आणि संतुलित अन्न न मिळाल्यास अथवा आहारात लोहयुक्त पदार्थांची कमतरता असल्यास शरीराला अशक्तपणा येतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. 

  हिमोग्लोबिन कमी होण्याची प्रमुख लक्षणे (Symptoms Of Low Hemoglobin In Marathi)

  शरीराला अशक्तपणा आल्यास तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी ढासळते. लाल रक्तपेशी आणि अॅनिमिया कमी होणे हे हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. यासाठी हिमोग्लोबिन कमी झाले आहे हे ओळखण्यासाठी त्याची लक्षणे जरूर जाणून घ्या.

  त्वचेत बदल होतात

  हिमोग्लोबिन कमी होण्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्याचे ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्वचेत बदल होणे. लाल रक्तपेशींमधील  हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेचा मुळ रंग बदलतो. त्वचा पांढरट दिसू लागते आणि त्वचा ओघळल्यासारखी, निस्तेज दिसू लागते.

  ह्रदयाचे ठोके अनियमित होणे

  हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होत असतो. मात्र हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. ह्रदयाला मुबलक ऑक्सिजन न मिळाल्यास ह्रदयाचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात अथवा कमी होतात. ज्यामुळे भिती वाटणे, छातीत धडधडणे असे प्रकार जाणवू शकतात.

  धाप लागणे

  फुफ्फुसामधून शरीराला शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. हे ऑक्सिजन रक्तातील हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीराला मिळत असते. मात्र हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तुमच्या श्वसनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो आणि तुम्हाला धाप लागते. 

  छातीत दुखणे

  शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ लागतो. ह्रदय आणि श्वसनक्रियेत व्यत्यय आल्यामुळे छातीत दुखू लागते. 

  वारंवार डोकेदुखी

  शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरातील प्रत्येक कार्य योग्य पद्धतीने होणं गरजेचचं आहे. मात्र जेव्हा तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी जाणवते. यासाठी जाणून घ्या डोकेदुखीवर घरगुती उपाय.

  थकवा येणे

  शरीरातील रक्त आणि लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला थकवा येतो. अशक्तपणामुळे चक्कर येणे, भुक न लागणे, पडल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. 

  नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय (Remedy For Increasing Hemoglobin In Marathi)

  हिमोग्लोबिन कमी झाल्यावर ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक पद्धतीने तुम्ही हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा वाढवू शकतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने आणि या घरगुती उपायांनी हिमोग्लोबिनची पातळी वाढवा.

  आहारात लोहाचे प्रमाण वाढवा

  ज्या लोकांना रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवायची आहे. त्यांच्यासाठी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे. लोहयुक्त आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू तुमच्या शरीरातील लाल रक्तरेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमच्या आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.   

  आहारात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा

  अनेक भाज्या आणि फळांमधून तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन सी मिळू शकते. यासाठी आहारात द्राक्षे, संत्री, लिंबू, ब्रोकोली, आंबा, किवी अशा पदार्थांतून तुम्हाला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं.

  आहारात फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढवा

  फोलेट हे शरीराला आवश्यक असणारे महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. यामुळे शरीरात हेम म्हणजेच लोहाची निर्मिती होण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर हा उपाय नक्की करा. तुम्ही पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा, अॅवोकॅडो आणि लॅट्यूस हे पदार्थात आहात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता. 

  व्यायाम

  तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या शरीरात शोषले जाणे फार गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर होतो.

  हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या अन्नपदार्थांचा करा आहारात समावेश (Dietary Supplements To Increase Hemoglobin In Marathi)

  हिमोग्लोबिनचे प्रमाण नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार घेणं गरजेचं आहे. कारण आहारातील अनेक पदार्थांतून नैसर्गिक पद्धतीने  तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढू शकते.

  पालक

  पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे तुम्ही जर नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून अंदाजे तुम्हाला 4 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

  Spinach For Hemoglobin In Marathi

  बीट

  बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी तुम्ही बीट खाण्यामुळे मिळू शकतात. शंभर ग्रॅम बीटामधून जवळजवश 0.8 मिलीग्रॅम लोह मिळते. बीटरूटचा त्वचेवरही चांगला परिणाम होतो. कारण त्वचा उजळ करण्यासाठी बीट उपयुक्त ठरतं.

  Beet For Hemoglobin In Marathi

  चिकन अथवा मटण

  अशक्तपणा झाल्यास त्या व्यक्तीला चिकन अथवा मटणाचे सूप दिले जाते. याचे कारण मटण अथवा चिकनमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर शरीरातील झीज भरून काढण्याची ताकद असते. मात्र मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रील करून खावे. शंभर ग्रॅम चिकन अथवा मटणामधून तुम्हाला 0.7 ते 2.1 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

  पीनट बटर

  शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेलं पीनट बटर लोह मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दररोज नास्ता करताना तुम्ही ब्रेड आणि पिनट बटर खाऊ शकता. शंभर ग्रॅम पिनट बटर मधून तुम्हाला 1.9 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

  Peanut Butter For Hemoglobin In Marathi

  टोमॅटो

  टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून तुम्हाला 0.8 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

  Tomato For Hemoglobin In Marathi

  अंडे

  संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे तर तुम्ही ऐकलं असेलच. कारण अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. महत्त्वाचं म्हणजे अंडं खाण्यामुळे तुमच्या शरीराला लोह मिळतं. एका अंड्यातून तुम्हाला 1.59 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

  Eggs For Hemoglobin In Marathi

  डाळिंब

  डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे तुमच्या शरीराची झीज लवकर भरून निघते. शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून तुम्हाला अंदाजे 0.3 मिलीग्रॅम लोह मिळू शकते. डाळिंब आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही उपयुक्त आहे. यासाठीच जाणून घ्या डाळिंबाच्या सालीचे सौंदर्य फायदे.

  Pomegrante For Hemoglobin In Marathi

  सुकामेवा

  निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा  दररोज खावा असं म्हटलं जातं. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून तुम्हाला लोह मिळू शकते. शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.

  सी-फूड

  सी फूडचे चाहते अनेक असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का सीफूडमधून तुम्हाला लोहदेखील मिळू शकतं. कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला मुबलक लोह मिळेल. 

  मध

  मध शरीरासाठी अतिशय चांगले असते. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात. कारण मधामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. मधामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळते. शंभर ग्रॅम मधामधून शरीराला 0.4 ग्रॅम लोह मिळू शकते.

  सफरचंद

  'अॅन अॅपल ए डे कीप्स दी डॉक्टर अवे' हे तर तुम्ही ऐकलं असेल. पण सफरचंदातून तुमच्या शरीराला पुरेसं लोह मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का. कारण सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी  दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते. एका सफरचंदातून तुम्हाला अंदाजे 0.31 लोह मिळू शकते. 

  खजूर अथवा खारीक

  गोड चवीचे खजूर अथवा सुकलेले खारीक अनेकांना आवडतात. उपासाच्या दिवशी अथवा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूराला यासाठीच सूपरफूड असं म्हटलं जातं. खजूरामुळे तुमचे हिमोग्लोबिन वाढू शकते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक आहे. एका खजूरामधून तुम्हाला 0.8 मिलीग्रॅम लोह मिळू शकते. 

  हिमोग्लोबिन वाढवण्याबाबत तुमच्या मनात असलेले प्रश्न (FAQ's)

  1- हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय करावेत का ?

  तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे आणि ते कमी झालं असेल तर का झालं आहे यावर काय उपाय करावेत हे ठरतं. जर प्रमाण फारच कमी असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र जर ते थोड्या प्रमाणात कमी झालं असेल तर तुम्ही आहारातून ते नक्कीच वाढवू शकता.

  2- मासिक पाळीत अती रक्तस्त्राव झाल्यास हिमोग्लोबिनची पातळी कमी होते का ?

  होय, जर तुम्हाला नेहमीपेक्षा अती रक्तस्त्राव झाला तर त्याचा परिणाम तुमच्या हिमोग्लोबिनच्या पातळीवर नक्कीच होतो. मात्र नॉर्मल रक्तस्त्राव झाला असेल तर असं  होत नाही. काही असलं तरी तुमच्या डॉक्टरांचा याबाबत नक्कीच सल्ला घ्या.

  3- हिमोग्लोबिनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काय करावे ?

  निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगले विचार फार महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य संतुलन नक्कीच राहू शकते. 

   फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

  हे ही वाचा -

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

  अधिक वाचा -

  महिलांमधील हॉर्मोन्स असंतुलनाची कारणे

  अॅसिडीटीचा होतोय त्रास मग तुम्ही करा हे घरगुती उपाय