भेसळयुक्त दूध घरबसल्या ओळखण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या

भेसळयुक्त दूध घरबसल्या ओळखण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या

प्रत्येकाच्या घरात नेहमी वापरात येणारा आणि कायमस्वरूपी लागणारा पदार्थ म्हणजे अर्थातच दूध. आपल्या सर्वांच्या घरात अगदी लहान मुलांपासून ते म्हातऱ्यांपर्यंत सर्वांनाच दूध प्यायला लागतं. ते मग चहा, कॉफीमधून असो अथवा नुसतं ग्लासभर असो. पण हल्ली वरचेवर आपल्याला दुधामध्ये भेसळ असल्याच्या बातम्या ऐकायला येतात. पण हे नक्की ओळखायचं कसं याची मात्र आपल्याला माहिती नसते. दुधाची गरज आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याला असते. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त  असल्यामुळे किमान रोज एक ग्लास तरी दूध पोटात जाणं आवश्यक असतं. पण आपली लोकसंख्या लक्षात घेता आपल्याकडे दुधाचा पुरवठा कमी होताना दिसतो. त्यामुळे दुधाच्या कंपनीज जास्त पैशांसाठी दुधाच भेसळ करतात असं लक्षात आलं आहे. 

दुधामध्ये भेसळ करतात म्हणजे नक्की काय?

Shutterstock

बऱ्याच जणांना दुधामध्ये भेसळ करतात म्हणजे नक्की काय करतात याची कल्पना नसते. तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो. दुधामध्ये भेसळ केली जाते म्हणजे नक्की काय असतं. गायी म्हशीचं जे दूध येतं त्यामध्ये पाणी, मीठ, सोडा, साखर अथवा साबणाचा चुरा घालून ते पिशवीमध्ये बंद करण्यात येतं. हे बंद दूध फ्रिजमध्ये भरून ठेवण्यात येतं आणि त्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येतो. असे दूध तुमच्याकडे आल्यास, तुम्ही ते पिता आणि तुम्हाला उलट्या, जुलाब असे त्रास होतात. तसंच तुमचं पोट दूध प्यायल्यावर फुगत असेल तर नक्कीच हे दूध भेसळयुक्त दूध आहे हे समजून जावं. 

दुधात झालेली भेसळ ओळखण्याचे सोपे उपाय

दुधामध्ये भेसळ आहे की नाही हे घरच्या घरी बसून कसं ओळखायचं हे सामान्यतः सर्वांना माहीत नसतं. पण हे सोपे उपाय आहेत. आपण ते जाणून घेऊया - 

1. दुधातील पाण्याची भेसळ

Shutterstock

दुधामध्ये पाणी घालून वाढण्याचे प्रकार हे सरसकट सगळीकडे होत असतात. आता आपल्याकडे आलेल्या दुधामध्ये पाण्याची भेसळ आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही एक काम करा. आपल्या मनगटावर अथवा शरीराच्या सपाट भागावर दुधाचा थेंब टाका. हा थेंब ओघळला आणि ओघळल्यानंतर तुम्हाला त्या  ठिकाणी जर पांढरा डाग दिसला तर तुम्ही समजून जा यामध्ये पाणी मिसळ्यात आलं आहे. शुद्ध दुधाचा डाग तुमच्या शरीरावर राहात नाही. त्यात पाणी मिसळलं की त्याचा डाग मात्र टिकून राहातो. त्यामुळे तुम्ही अशा सोप्या पद्धतीने याची तपासणी घरच्या घरी करू शकता. 

कोजागिरीला ‘मसाला दूध’ पिण्याचे आरोग्यदायी फायदे

2. स्टार्चची भेसळ

Shutterstock

दुधात ज्याप्रमाणे पाणी मिसळतात आणि दूध पातळ होते. तसंच दूध घट्ट करण्यासाठी त्यामध्ये स्टार्चचा वापर करण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी असा वापर करण्यात येतो. पण स्टार्च हे आपल्या आतड्यांसाठी घातक ठरतं. तुम्हाला जर दुधात स्टार्च आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर त्याचीही सोपी पद्धत आहे. तुम्ही साधारण औषधाचं जे बूच असतं त्यामध्ये 5ML इतकं दूध घ्या. त्यामध्ये रोजचं आपलं खाण्यातील मीठ नीट मिक्स करा. मीठ मिक्स केल्यानंतर जर या दुधाचा रंग निळा झाला तर त्यामध्ये स्टार्च घालण्यात आलं आहे हे समजून जावं. 

काय आहे केशर दुधात विशेष जाणून घ्या

3. दुधाचा फिका रंग गडद करण्यासाठी

दुधामध्ये जेव्हा पाणी मिक्स करून भेसळ करण्यात येते तेव्हा त्याचा रंग फिका पडतो. हा रंग गडद करण्यासाठी युरियाचा वापर करण्यात येतो. खरं तर याचा वापर शेतीसाठी करण्यात येतो. पण हल्ली दुधातील भेसळीसाठीही याचा उपयोग केला जातो. सामान्य माणसाला याचे फायदे आणि तोटे याची काहीच कल्पना नसते. मुळात हे शेतीसाठी वापरलं जातं त्यामुळे माणसांच्या शरीरासाठी हे अतिशय हानिकारक असतं. दुधात याची भेसळ करण्यात आली आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही 5ML इतकं दूध घ्या. त्यामध्ये सोयाबीन पीठ अथवा तुरीचं पीठ घाला. ते नीट मिक्स करून घ्या आणि मग साधारण पाच मिनिट्स वाट बघा. त्यानंतर त्यामध्ये लाल रंगाचा लिटमस पेपर टाका. जर लाल लिटमस निळा झाला तर त्यात युरियाची भेसळ आहे असं समजा. 

पदार्थांचे असे ‘कॉम्बिनेशन’ आरोग्यासाठी ठरु शकते घातक

4. साबणाची भेसळ

Shutterstock

दुधात पाणी घातलं की त्याचा चिकटपणा नाहीसा होतो हे तुम्हाला माहीत आहे का? ही भेसळ कळू नये म्हणून त्यामध्ये अजून एक गोष्ट घातली जाते आणि अजून एक भेसळ केली जाते ती म्हणजे कपडे धुण्याच्या साबणाची. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल. पण हे खरं आहे. अशी भेसळ ओळखण्यासाठी तुम्ही दूध एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात थोड्या वरून ओता. असं दोन तीन वेळा करा. जर त्या दुधाला जास्त फेस आला तर यामध्ये साबणाची भेसळ आहे असं समजा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.