हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

केस पांढरे झाल्यानंतर बरेच जण त्यावर केमिकलयुक्त रंगाचा वापर करायला लागतात. पण हर्बल मेंदीचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांना जास्त चांगला रंग देऊ शकता आणि त्याशिवाय नैसर्गिकरित्या तुमचे केस चांगले राहण्यास याचा फायदा होतो. केसांच्या अनेक समस्या असतात त्यावर नक्की काय करायचं यासाठी अनेक घरगुती उपायदेखील असतात. हर्बल मेंदीचा वापर हादेखील त्यातलाच एक उपाय. तुमच्या केसांचा व्हॉल्युम चांगला ठेवण्यासाठी नेहमीच या मेंदीचा वापर करता येऊ शकतो. त्याशिवाय या मेंदीच्या वापराने तुमचे केस चांगले राहतात आणि केसगळतीदेखील कमी होते. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे हर्बल हीना अर्थात हर्बल मेंदीचे नक्की काय फायदे आहेत आणि ती कशा तऱ्हेने वापरायची असते ते सांगणार आहोत. सर्वात पहिले आपण याचे नक्की फायदे काय आहेत ते जाणून घेऊया - 

हर्बल मेंदीचे फायदे

Shutterstock

सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल अर्थात रसायन आढळत नाही. ही नैसर्गिक असल्याने तुमच्या केसांच्या मुळांना अथवा केसांना हानी पोहचत नाही. 

  • हर्बल मेंदीमुळे केसांना शाईन मिळते आणि चांगला व्हॉल्युम येतो
  • स्काल्पवर येणारी खाज अथवा इन्फेक्शन आणि कोंड्यापासून ही हर्बल मेंदी सुटका मिळवून देते
  • केसांवर बाहेरून योग्य लेअर करून केसांना ऊन, धूळ आणि प्रदूषण यासारख्या त्रासदायक गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यास याची मदत होते
  • केसांना चांगलं कंडिशन करून केसांची वाढ होण्यास हर्बल मेंदीचा उपयोग होतो
  • केसांना अवेळी पांढरं (pre-mature greying) होण्यापासूनही हर्बल मेंदी वाचवते. तसंच केसगळती रोखण्यासाठी उपयोगी आहे
  • डॅमेज्ड केसांना रिपेअर करते आणि स्काल्पचा pH बॅलेन्सदेखील रिस्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो

हातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा 'हे' सोपे उपाय

हर्बल हिना अर्थात मेंदीची पेस्ट कशी बनवावी? (How to make herbal heena paste)

Shutterstock

हर्बल हिना केसांच्या सर्व समस्यांसाठी उत्तम उपाय आहे. तसंच तुमच्या केसांना सुंदर बनवण्यासाठी याचा उत्तम फायदा करून घेता येतो. या मेंदीमुळे तुम्हाला लोखंडाच्या कढईपेक्षाही जास्त लोह मिळतं. यामुळे केसांचा दर्जा सुधारण्यास मदत मिळते. ही कशी बनवायची आपण बघूया - 

साहित्य - 

- हिना अर्थात मेंदी पावडर – 4 मोठे चमचे (लहान केसांसाठी 2 मोठे चमचे मेंदी घ्या)

- आवळा पावडर – 1 चमचा

- मेथी दाणे – 1 लहान चमचा

- 1 लिंबाचा रस 

- अंडं – 1 (अथवा दही आणि मध)

- चिमूटभर मीठ (स्कॅल्प इन्फेक्शन दूर करण्यासाठी)

- चहा पावडर – 3 चमचे (अथवा 2 टी बॅग्ज)

- पाणी – 1.5 ग्लास

कृती - 

सर्वात पहिले पाणी उकळून घ्या आणि त्यात चहा पावडर मिसळा. हे व्यवस्थित उकळल्यावर त्यात मेथीचे दाणे घाला आणि पुन्हा उकळून गॅस बंद करा. तयार पाणी नीट गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता लोखंडाच्या कढईत मेंदी पावडर, आवळा पावडर, लिंबाचा रस, मीठ घाला आणि मिक्स करा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही कडिलिंबाची पावडरदेखील थोडी मिक्स करू शकता. तुम्हाला तुमच्या केसांना थोडा रंग द्यायचा असेल तर यामध्ये कॉफीची साधारण दीड चमचा पावडर मिक्स करा. या सगळ्या मिश्रणात वरील पाणी घालून नीट मिक्स करून घ्या. थोडी जाडी पेस्ट तयार करा आणि साधारण 5-6 तास तसंच राहू द्या आणि मग तुम्ही केसांना लावा. सकाळी ही मेंदी तुम्हाला काळ्या रंगाची दिसेल. हे लोखंडाच्या कढईमुळे होतं. मेंदीचा कोरडेपणा दूर करण्यासाठी यामध्ये अंडं घाला. जर तुम्हाला अंडं नको असेल तर तुम्ही यामध्ये व्यवस्थित मध मिसळून घ्या. लावताना ही पेस्ट जास्त पातळ नाही ना याची नीट काळजी घ्या. व्यवस्थित क्रिमी बनवून घ्या. 

केसांना करा कलर आणि हायलाईट घरी

कशी लावावी ही हर्बल मेंदी? (How to apply herbal heena)

Shutterstock

केसांमध्ये व्यवस्थित फणी फिरवून विंचरून घ्या. मेंदी सोप्या पद्धतीने लावण्यासाठी केसांना तुम्ही थोडंसं ओलंही करू शकता. मेंदी लावण्यापूर्वी हेअरलाईनच्या चारही बाजूंना व्हॅसलिन लावून घ्या. यामुळे तुमच्या त्वचेवर डाग पडणार नाही. आता केसांच्या छोट्या छोड्या बटा घ्या आणि ग्लोव्ह्ज अथवा ब्रशच्या मदतीने त्यावर मेंदी लावा. एक भाग झाला की, क्लिपने तो भाग वर करून ठेवा. तुम्हाला हवं असल्यास, केसांच्या मध्यभागापासून अर्थात क्राऊनपासून सुरुवात करा. नंतर केस गोल करत करत मेंदी लावून झाली की वरच्या बाजूने एकावर एक बटा टाकत जा. यामुळे एक टाईट आंबाडा तयार होईल. साधारण 40-45 मिनिट्स ठेवा आणि मग पाण्याे केस धुवा. शँपू लावू नका. तुमच्या केसांना कोरडेपणाची अडचण नसेल तर ही मेंदी तुम्ही साधारण दोन तासदेखील लावून ठेवू शकता. 

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

क्विक टिप्स:- Quick Tips

Shutterstock

- मेंदी तुमचा स्काल्प आणि केसांना कोरडं बनवते आणि तुम्हाला जर कोरडेपणाचा जास्त त्रास असेल तर तुम्ही केसांची मेंदी काढून टाकल्यानंतर स्काल्पला तेल लावून मसाज करा आणि मग साधारण एक ते दोन दिवसांनंतर केसांना शँपू करा

- मेंदी लावण्यापूर्वी तुम्हाला केसांना तेल लावायचं असेल तर साधारण 1-2 तास आधी तेल लावा आणि मग मेंदी लावा

- जास्त कोरडे केस अथवा जास्त स्काल्प इन्फेक्शन असेल तर केसांना मेंदी अजिबात लावू नका

- महिन्यातून दोन वेळा मेंदी लावल्याने केस अधिक निरोगी आणि सुंदर होतात. जास्त मेंदी लावू नये

- मेंदी लावताना नेहमी चांगल्या दर्जाच्या मेंदीचा वापर करा. olive ग्रीन रंगाची मेंदी उत्तम असते. फिक्या रंगाच्या मेंदीचा वापर करू नये

केसांवर चमत्कारी हर्बल हिनाचा वापर करून केसांना तुम्ही चमकदार बनवा आणि केसांना हेअर स्पा केल्याचा अनुभवदेखील द्या. हर्बल मेंदीचा वापर करून तुमचेही केस होतील अधिक चमकदार आणि सुंदर. त्यामुळे नक्की याचा वापर करून पाहा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.