ADVERTISEMENT
home / Make Up Products
मेकअपसाठी असा करा ब्युटी ब्लेंडरचा वापर

मेकअपसाठी असा करा ब्युटी ब्लेंडरचा वापर

 

मेकअप केल्यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो. अनेकींना स्वतःचा  मेकअप स्वतःच करायला आवडतं. शिवाय आजकाल मेकअप करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. सणसमारंभासाठीच नव्हे तर दैनंदिन ऑफिस अथवा कॉलेजसाठीदेखील महिला आणि मुली मेकअप करणं पसंत करतात. मात्र मेकअप करणं ही एक कला आहे हेदेखील तितकंच खरं आहे. कारण जर तुमचा मेकअपमध्ये छोटीशी जरी चुक झाली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या लुकवर पडतो. यासाठी मेकअपचं साहित्य आणि ते कसं वापरावं हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. मेकअप करण्यासाठी बऱ्याचदा मेकअप ब्लेंडरचा वापर केला जातो. मात्र काही जणींना हे मेकअप ब्लेंडर नेमकं कसं वापरावं हे माहितीचं नसतं. यासाठीच ते वापरण्याची पद्धत आम्ही  तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

ब्युटी ब्लेंडर कशासाठी वापरलं जातं

 

ब्युटी ब्लेंडर हे अंडाकृती अथवा ओव्हल शेपचं एक मेकअपचं साहित्य  आहे. मेकअप करताना फाऊंडेशन, कन्सिलर, कोणतंही फेसक्रीम, हायलाईटर, फेस पावडर  लावण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ब्रशने कधी कधी फाऊंडेशन अथवा कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड होत नाही. यासााठी तुम्ही या साहित्याचा वापर करू शकता. 

instagram

ब्युटी ब्लेंडरचा वापर कसा कराल

 

ब्युटी ब्लेंडरचा वापर करण्याआधी तुम्हाला या मेकअप साहित्याविषयी सर्व गोष्टी आधीच माहीत असतील. तर त्याचा वापर करणं नक्कीच सोपं जाईल.

ADVERTISEMENT

स्टेप 1 – ब्युटी ब्लेंडरचा वापर करण्यापूर्वी ते कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवा. ब्लेंडरमध्ये पाणी चांगलं मुरू द्या. जितकं त्यामध्ये पाणी मुरेल तितकं ते चांगलं परिणाम देतं. जर तुम्ही घराबाहेर असाल तर सोबत पाण्याची बॉटल अथवा स्प्रे ठेवा. ज्याच्या मदतीने तुम्ही मेकअप ब्लेंडर भिजवू शकता. 

स्टेप 2- भिजवलेला ब्लेंडरमधील पाणी पिळून घ्या.  पाण्याने भिजलेल्या ब्लेंडरच्या स्पंजवर कोणतेही सौंदर्यप्रसाधन व्यवस्थित बसते. ज्यामुळे ते तुमच्या चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने ब्लेंड होण्यास मदत होते. अशा पद्धतीने ब्लेंडरचा वापर केल्यामुळे तुमचा मेकअप पॅची दिसत नाही.

स्टेप 3 – लक्षात ठेवा ब्लेंडर वापरताना ते एखाद्या स्वच्छ भांड्यात अथवा हातात ठेवा. चुकूनही ते कुठेही ठेवू नका. नाहीतर तुमच्या त्वचेला इनफेक्शन होऊ शकतं. सर्वात आधी फाऊंडेशन लावताना तेल तुमच्या नाक आणि डोळ्यांच्या खाली लावा. ब्लेंड करण्यासाठी ब्लेंडरच्या टोकाकडील भागाचा वापर करा. ब्लेंडरचा मोठा भाग तुमच्या मान, कपाळ, गाल आणि हनुवटीला मेकअप करताना वापरा. 

स्टेप 4  – ब्युटी ब्लेंडर वापरताना ते तुमच्या चेहऱ्यावर दाबून अथवा पसरवून लावा. चुकूनही ते चेहऱ्यावर रगडू नका. 

ADVERTISEMENT

shutterstock

ब्युटी ब्लेंडर कसे स्वच्छ करावे

 

ब्युटी ब्लेंडर वापरल्यानंतर आणि वापरण्याआधी स्वच्छ करणं फार गरजेचं आहे.

स्टेप  1 – एका वाटीत अथवा भांड्यात गरम पाणी घ्या. त्यामध्ये तुमच्या ब्लेंडरचा स्पंज बुडवून ठेवा. ज्यामुळे ब्लेंडरच्या स्पंजमध्ये अडकलेले जीवजंतू मरून जातील.

स्टेप 2 – ब्लेंडरला एखादं सौम्य शॅम्पू लावून ते स्वच्छ करा. ब्लेंडरमधील फाऊंडेशन निघाल्यामुळे ते स्वच्छ दिसू लागते. 

ADVERTISEMENT

स्टेप 3 – पुन्हा एकदा स्वच्छ आणि कोमट पाण्यातून ब्लेंडर धुवून काढा. त्यानंतर ते एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ कपड्यावर ठेवा. ज्यामुळे ते पुन्हा वापरण्यासाठी तयार होईल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

 तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

22 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT