नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण नखांना नेलपॉलिश लावतो. प्रत्येक मुलीकडे नेलपॉलिशचे कितीतरी रंग असतात. पण ज्यावेळी तुम्ही नेलपॉलिश लावता त्यावेळी तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का की, या नेलपॉलिशचा शोध कसा लागला. आम्हाला नेलपॉलिशच्या शोधाचे कुतूहल होते म्हणूनच आम्ही नेलपॉलिशचा इतिहास शोधून काढला. आज आपण जाणून घेऊया नखांचे सौंदर्य वाढविणाऱ्या नेलपॉलिशचा इतिहास
तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार निवडा तुमच्यासाठी बेस्ट लिपस्टीक
नेलपॉलिशला नेल वॉरनिश, नेल इनॅमल किंवा नेलपेंट असे म्हटले जाते. साधारण 600 वर्षांपूर्वी चीनमध्ये नेलपॉलिशचा शोध लागला. त्यावेळी झोऊ डिनॅस्टीच्या काळात याचा शोध लागला. त्यावेळी रॉयल घराण्यामध्ये गोल्डन आणि सिलव्हर रंगाचा वापर केला जात होता. नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठीच त्याचा शोध लागला. सुरुवातीला गोल्डन आणि सिलव्हर रंगानंतर लाल रंगाच्या नेलपेंटचा शोध लागला. लाल रंग ही राजघराण्याची ओळख होती. त्यामुळे राजघराण्यातील महिला लाल रंगाच्या नेलपेंट वापरत असतं. सुरुवातीला नेलपॉलिश बीवॅक्स, अंड्याचा पांढरा बलक, जेलेटीन, व्हेजिटेबल डाईज, गम अरेबिक यापासून बनवले जात होते.
आता आपल्याला वेगवेगळे रंग दिसत असले तरी आधी फार रंग मिळत नव्हते. इजिप्तमध्ये तर रंगावरुन स्त्रियांचे काम ओळखले जायते. फिक्कट पिवळा रंग हा तेथे काम करणाऱ्या महिला वापरत असत. त्यांना राजघराण्यातील रंग वापरण्याचा अधिकार नव्हता. इजिप्तमध्ये मोठ्या घराण्यातील स्त्रिया नखांना मेंदी किंवा गडद चॉकलेटी रंग लावत असत.
ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर (Vaseline Uses In Marathi)
आता 600 वर्षांपूर्वी नेलपेंटचा शोध लागला असला तरी देखील रंगीबेरंगी नेलपॉलिशचा शोध लागला नव्हता. 1920 पर्यंत तरी रंगीबेरंगी नेलपेंट अस्तित्वात नव्हत्या. नेलपॉलिश बनवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती होत्या.लव्हेंडर ऑईल, कॅरमाईल, ऑक्साईड टीन, बरगोमट ऑईलचा वापरही केला जायचा.
सौंदर्यप्रसाधनांच्या बाबतीत चीन आजही पुढे आहे. वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा शोध त्यांनी आतपर्यंत लावला आहे. नखांच्या बाबतीतही त्यांनी अधिक काळजी घेतली होती. त्यावेळी नख सुंदर दिसण्यासाठी नखांवर अनेक प्रयोग केले जायचे. आता ज्याप्रमाणे नखांना चमकवण्यासाठी फाईलरचा उपयोग केला जातो. त्या काळातही नखांना घासले जायचे आणि चमकवले जायचे. नख चमकवण्यासाठी त्याकाळी एक विशिष्ट पेस्टचा वापर केला जायचा.
आता महिलांच्या सौंदर्यात भर घालणारा नेलपॉलिश हा प्रकार पुरुष लावत असतील यावर आपल्याला नक्कीच विश्वास बसणार नाही. पण त्या काळात पुरुषही नेलपॉलिशचा प्रयोग करत होते. नखं दुभंगू नये नखांना त्रास होऊ नये म्हणून पुरुष पारदर्शक नेलपॉलिशचा प्रयोग नखांना करत होते. पण कालांतराने हा महिलांचा शृगांर असल्याचा स्टँप नेलपॉलिशवर बसला आणि त्याचा वापर पुरुषांनी करायचे सोडून दिला.
मग आता तुम्ही लावणारी नेलपॉलिश किती जुनी आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
देखील वाचा -