खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि करीना कपूरच्या (Kareena Kapoor) चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. अक्षय-करीना या जोडीचा बहुचर्चित सिनेमा ‘गुड न्यूज’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सिनेरसिकांकडून ट्रेलरला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. इमोशनल कॉमेडी असलेल्या या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’नं केली आहे.
ट्रेलर आणि पोस्टर रिलीजनंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण सिनेमाचं टायटल पाहिल्यानंतर प्रेक्षकांसमोर वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. सिनेमाच्या टीमनं नावामध्ये वेगळा प्रयोग केल्याचं दिसत आहे. ‘Good News’ ऐवजी ‘Good Newwz’ असं सिनेमाचं टायटल ठेवलं आहे. यावरून ‘न्यूज’चं स्पेलिंग चुकीचं ठेवण्यामागे नेमकं गणित काय आहे? असं कोडं अनेकांना पडलं. पण नावात काय आहे?, त्यामुळे यावर जास्त विचार करू नका. कारण तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं निर्माता करण जोहरनं संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं आहे.
(वाचा : आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक रिलीज)
सिनेमाच्या नावाचं स्पेलिंग ‘Good News’ नाही तर ‘Good Newwz’ असं करण्यात आले. यामागे एक निराळी कहाणी असल्याचं निर्माता करण जोहरनं सांगितलं होतं. सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान करण जोहरला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना करणनं सांगितलं की,‘क्रिएटिव्ह जगतात सिनेमांच्या नावांची सुरुवात एखाद्या विशेष अक्षरावरून करण्यासंदर्भात अंधश्रद्धा आहे’. करणनं याबाबत स्वतःचाही अनुभव सांगितला. तो म्हणाला की, मी देखील अशाच एका अंधश्रद्धेत फसलो होतो. आपल्या कित्येक सिनेमांच्या नावाची सुरुवात ‘K’ अक्षरापासूनच केली. शिवाय, अनेक सिनेमांमध्ये करीना कपूरला कास्ट करूनही ते बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरले. पण यानंतर ठरवलं की हे सारे काही आपले डोक्यातील विचारांचे खेळ आहेत,त्यामागे काहीही तथ्य अथवा वास्तव नाही'.
(वाचा : समीरा रेड्डीने मुलीसोबतचा फोटो शेअर करत दिला हा पावरफुल मेसेज)
करण जोहरनं सांगितलं की, गुड न्यूजच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर मी दिग्दर्शक राज मेहताला भेटलो. जो प्रत्येक गोष्टीमध्ये एक हटके विचार करत असतो. प्रोजेक्टसंदर्भात चर्चा सुरू असतानाच सिनेमाचं नाव ‘A Good News’ असं ठेवू शकतो का? असं राज मेहतानं विचारलं. यावर हे चुकीचं इंग्रजी असल्याचं मी त्याला सांगितलं. यानंतर दिग्दर्शक राज आणि म्युझिक क्युरेटर अजीम दयानी पुन्हा एक भन्नाट कल्पना घेऊन आले आणि म्हणाले या सिनेमाचं नामकरण ‘Good Newwz’ असं करूया.
(वाचा : परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण)
‘राजनं सुचवलेल्या नावावर मी विचार केला आणि म्हटलं उद्या जर काही चुकीचं घडलं तर हे सर्व जण मिळून माझ्यावर खापर फोडतील. त्यामुळे नावाचं स्पेलिंग बदलण्यास संमती दर्शवली. खरंतर हे सर्व काही हास्यास्पद आहे पण राज आणि अजीमनं मिळून सिनेमाच्या नावाचं एक स्पेलिंग तयार केलं आहे, या बदलाचा सर्वांनी स्वीकारदेखील केला. त्यामुळे मलादेखील यामध्ये कोणतीही समस्या नव्हती’, असा सिनेमाच्या नामकरणाचा किस्सा करणनं शेअर केला.
अक्षय कुमार आणि करीना कपूर ही जोडी तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 2009मध्ये आलेल्या ‘कमबख्त इश्क’ सिनेमामध्ये ही जोडी दिसली होती. या दोघांव्यतिरिक्त सिनेमामध्ये दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी देखील आहेत. या कलाकारांच्या चाहत्यांनी गुड न्यूजच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सिनेमाची कहाणी दोन विवाहित जोडपे आणि प्रेग्नेंसी या विषयावर आधारीत आहे. या सिनेमा येत्या 27 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
Celebrate this Christmas with the Batra's & the biggest goof-up! #GoodNewwzTrailer https://t.co/rR0uWHtgns#GoodNewwz #KareenaKapoorKhan @diljitdosanjh @Advani_Kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta @NotSoSnob @ZeeStudios_ @DharmaMovies #CapeOfGoodFilms
— Akshay Kumar (@akshaykumar) November 18, 2019
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.