टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ (Yeh Hai Mohabbatein) मागील 6 वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या मालिकेत अनेक उतार चढाव प्रेक्षकांना बघायला मिळाले. पण इशिता अय्यर (दिव्यांका त्रिपाठी- Divyanka Tripathi) आणि रमण भल्ला (करण पटेल- Karan Patel) यांचं प्रेम आजही प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडत आहे. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील रमण भल्ला अर्थात करण पटेलने ‘खतरों के खिलाडी’ साठी हा शो सोडला होता. पण आता पुन्हा एकदा शो चा टीआरपी खाली आल्याने करण पटेल मालिकेमध्ये पुन्हा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लव्ह स्टोरीमध्ये वेगळा ट्विस्ट येणार असल्याचीही चर्चा आहे.
मालिका ‘ये है मोहब्बतें’ मधील रमण भल्ला (करण पटेल- Karan Patel) आणि इशिता भल्ला (दिव्यांका त्रिपाठी) यांच्या किडनॅपिंगनंतर या कथेने एक वेगळं वळण घेतलं होतं. यानंतर इशिताने आपला नवरा रमण भल्लाच्या शोधासाठी स्वतःला पूर्ण झोकून दिलं होतं. रमण तिला सापडलादेखील पण तेदेखील एका उंच ठिकाणाहून त्याला फेकण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली होती आणि एक नवा चेहरा चैतन्य चौधरी याने रमण भल्ला म्हणून मालिकेत प्रवेश केला होता. तसंच मध्ये नताशाचादेखील ट्रॅक दाखवण्यात आला होता ज्यामध्ये ती रमण भल्ला हा तिचा पती असून त्याचं नाव शार्दुल असल्याचं सांगत होती.
तसं तर हा सगळा सिक्वेन्स पुढे आला आहे. पण यावरूनच आता कथेला वेगळं वळण मिळणार असून पुन्हा एकदा करण पटेलचा या मालिकेत प्रवेश होणार आहे. या मालिकेपासून करणने काही काळ ब्रेक घेतला होता. पण करणशिवाय ही मालिका अपूर्ण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही कथा वेगळं वळण घेऊन करणची या मालिकेत एंट्री होणार आहे. करणदेखील पुन्हा मालिकेत येण्यासाठी उत्सुक आहे. करणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून करण पुन्हा मालिकेत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘मी येत आहे’. केवळ इतकीच कॅप्शन असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आपला अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
मालिका ‘ये है मोहब्बतें’मध्ये रमण आणि इशिताचा मुलगा आदित्य भल्लाची भूमिका निभावणारा अभिनेता अभिषेक वर्माने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्याच्या जागी त्याच्यासारखाच दिसणारा असा युग मालिकेत दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिकेची कथा मजेदार करत करणची पुन्हा कशी काय एंट्री होणार याचीच चर्चा रंगली आहे. तसंच त्याच्या परत येण्याने कथा कशी बदलण्यात येईल याबद्दलही सध्या चर्चा आहे. यामध्ये इशिताला सर्व माहिती आहे की, रमण आणि इशिताचा हा प्लॅन आहे असं काही दाखवण्यात येणार असंही म्हटलं जात आहे. या बातमीने करण पटेलचे चाहते मात्र अत्यंत आनंदी आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच्या या फोटनंतर अनेकांनी कमेंट्स करायला सुरूवात केली असून बऱ्याच जणांना पुन्हा एकदा करणने या मालिकेत परत यावं असंच वाटत आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.