ADVERTISEMENT
home / Recipes
दिवाळीत उरलेल्या फराळापासून तयार करा हे स्वादिष्ट पदार्थ

दिवाळीत उरलेल्या फराळापासून तयार करा हे स्वादिष्ट पदार्थ

 

दिवाळी सुरू होण्याआधी वेध लागतात ते दिवाळीचा फराळ कधी तयार करायचा याचे. चकली रेसिपी, करंजी रेसिपी, लाडू रेसिपी हे सर्वच आपण यावेळी करत असतो. मात्र दिवाळी संपली की मात्र तो फराळ पाहून आता फराळ कसा संपवायचा हा प्रश्न प्रत्येक घरातील महिलेला पडतो. दिवाळीला काही दिवस झाल्यावर रोज तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय घरचं आणि महागडं तेल आणि तूप वापरून केलेले खमंग पदार्थ फार काळ टिकतही नाहीत. त्यामुळे जर ते लवकर खाल्ले नाहीत तर टाकून द्यावे लागतात. तुमचा ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या घरी उरलेल्या फराळापासून तयार करता येतील असे काही नास्त्याचे झटपट पदार्थ शेअर करत आहोत. तेव्हा वाट कसली पाहताय… फराळापासून हे मस्त आणि खमंग पदार्थ तयार करा आणि कुटुंबासोबत ते मजेत खा. घरच्यांना जर सांगितलं नाहीत तर हे पदार्थ नेमके कशापासून तयार केले आहेत ते त्यांना समजणार सुद्धा नाही. 

Instagram

उरलेल्या फराळापासून तयार करा हे खंमग पदार्थ

 

1. चकलीचे थालीपीठ –

थालीपीठ हा महाराष्ट्रातील असा एक पदार्थ आहे जो सर्वांच्या घरी हमखास बनवला जातो. घरात नास्ता काय करायचा हा प्रश्न डोळ्यासमोर आला की गृहिणींना थालीपीठाचा आधार असतो. तयार भाजणी असेल तर थालीपीठ पटकन तयार होतो. कधी कधी घरात निरनिराळ्या  प्रकारची पीठं असतातच मग त्यात कांदा, कोथिंबीर, भाज्या टाकून मस्त झटपट थालीपीठ करता येतं. आजचं थालीपीठ असंच झटपट होणारं आहे. 

ADVERTISEMENT

साहित्य – चकली, चिवडा अथवा शेव जे काही उरलं असेल ते मिक्समध्ये दळून घ्या. त्यात घरातील थोडी थालीपीठ भाजणी अथवा उपलब्ध असलेली पीठं मिसळा. कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून त्यात टाका. मेथी अथवा इतर कोणत्या पालेभाज्या असतील तर त्याही थोड्या चिरून त्यात मिसळा आणि मिश्रण मस्त एकत्र करून तिखट आणि मीठ गरजेचे असल्यात त्यात मिसळा आणि थालीपीठ तयार करा. चकली, शेवेत भाजणी असल्यामुळे अशी तयार केलेली थालीपीठं अगदी खमंग होतात.

2.चिवड्याची मिसळ –

मिसळ हा महाराष्ट्रातील आणखी एक आवडता पदार्थ आहे. अनेकांच्या घरी उसळ तयार केली जातेच अशा तयार उसळीवर मस्तपैकी चिवडा अथवा शेव पेरा. त्यावर उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा टाका, लिंबू पिळा आणि खंमग मिसळीचा आनंद लुटा. 

3.लाडवांचा शिरा –

ADVERTISEMENT

दिवाळीत प्रत्येकाच्या घरी लाडू तयार केले जातात. रव्याचे, मूगडाळीचे, बेसनाचे असे अनेक लाडू आपण तयार करतो. मात्र चकली आणि चिवडा पटकन फस्त होतो आणि लाडू मात्र तसेच राहतात. मात्र तुम्ही याचा शिरा नक्कीच तयार करू शकता. अनेकांच्या घरी जेवणासोबत काहीतरी गोड खाण्याची सवय असते. नास्त्याला शिरा केला तर सर्वजण खूश होतात. मग काय कराल… रव्याच्या लाडवांपासून रव्याचा शिरा आणि मूगडाळ अथवा बेसनाच्या लाडवापासून मूगडाळ अथवा बेसनाचा शिरा तयार करता येऊ शकतो. लाडवांचा चुरा करून घ्या आणि थोड्यावर कढईत गरम करून त्यात उकळलेले पाणी टाका. वाफेवर शिजवलेला हा शिरा मस्तच लागतो. तसंच शंकरपाळे किंवा करंजीच्या उरलेल्या मैद्याच्या कणकेपासून तुम्ही बालुशाही हा गोड पदार्थ ही करू शकता. 

4.शेवेची भाजी –

शेवभाजी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. घरात तयार केलेल्या एकाद्या उसळीवर मस्तपैकी उरलेली शेव टाकून तुम्ही ही भाजी करू शकता. किंवा अगदी पारंपरिक पद्धतीने शेवभाजीचा मसाला तयार करा आणि त्यावर तयार शेव टाकून भाकरी अथवा  पोळीसोबत चटकदार शेवभाजी खा. 

5. चकली टिक्की –

ADVERTISEMENT

घरात लहान मुलं असतील तर त्यांचा सर्वात आवडता  पदार्थ असतो तो म्हणजे टिक्की…मग जर घरात फराळ उरला असेल तर त्यापासून अशी खमंग टिक्की तयार करायलाच हवी. यासाठी उरलेल्या चकल्या, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, मीठ, तेल आणि ब्रेडक्रम्स घ्या. चकल्या मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या. बटाटे उकडून स्मॅश करून घ्या. बटाटे, चकलीचा बारीक चुरा, मीठ, कोशिंबीर एकत्र करून त्याची मस्त टिक्की बनवून घ्या. ही टिक्की ब्रेडक्रम्समध्ये घोळवून तेलात शॅलोफ्राय करा. 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा 

दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे असा पडलाय प्रश्न, तर वाचा

#sugarcraving कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

ADVERTISEMENT
01 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT