नितळ आणि सुंदर त्वचा हवी आहे, मग 'हे' उपाय नक्की करा

नितळ आणि  सुंदर त्वचा हवी आहे, मग 'हे'  उपाय नक्की करा

नितळ, चमकदार आणि सुंदर चेहऱ्यासाठी केवळ महिला वर्गच नाही तर पुरुषदेखील कित्येक उपाय करत असतात. चेहऱ्यावर मनासारखा ग्लो आल्यास तुम्हालादेखील प्रसन्न वाटतं. आपला चेहरा सुंदर दिसावा, यासाठी कित्येक जण नैसर्गिक उपाय, औषधोपचारांचाच पर्याय स्वीकारतात. तर तात्पुरतं सुंदर दिसण्यासाठी अधिकतर लोक आजही ब्युटी प्रोडक्ट्सवर अवलंबून आहेत. यामुळे पैसा पाण्यासारखा वायाच जातोच, पण विविध दुष्परिणामांचाही सामना करावा लागण्याची भीती असते. नितळ चेहरा मिळवण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी नैसर्गिक उपचारांचा मार्ग स्वीकारल्यास उत्तम. कारण यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अधिकचा खर्च होत नाही. चेहऱ्यावरील चमक नाहीशी होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे प्रदूषण आणि तणाव. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर सर्वाधिक वाईट परिणाम होतात. चेहऱ्याचा पोत खराब होऊ नये, यासाठी नियमित देखभाल करणं आवश्यक आहे. आपला चेहरा सदैव चमकत राहावा, अशी स्वाभाविकच प्रत्येकाची इच्छा असते. डागविरहीत चेहऱ्यासाठी लोक काय-काय करत नाहीत. एवढं करूनही चेहऱ्यावर मनासारखा ग्लो येत नाही. पण नैसर्गिक बाबींचा वापर करून चेहऱ्याची त्वचा उजळण्यास नक्कीच मदत होते. आम्ही तुम्हाला काही नॅचरल ब्युटी टिप्स सांगणार आहोत, त्या फॉलो केल्यास चेहऱ्यामध्ये फरक पडल्याचं जाणवेल.  

हे नैसर्गिक उपाय करा आणि मिळवा नितळ चेहरा

1. हळद 
एक चमचा दुधाच्या मलईमध्ये चिमुटभर हळद आणि एक चमचा गुलाबपाणी मिसळावे. हलक्या हातानं या मिश्रणानं चेहऱ्यावर मसाज करावा. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवावा.  

2. फेशिअल स्टीमिंग
चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ देणं ही पद्धत तशी फार जुनी आहे. यामध्ये चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी कमीतकमी 5 ते 7 मिनिटांसाठी चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ देणं आवश्यक आहे. 

वाचा - चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे

3. मुलतानी माती 
तुमची त्वचा तेलकट असल्यास मुलतानी मातीचा लेप हा त्यावरील रामबाण उपाय आहे. मुलतानी मातीमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल. अर्धा चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा टोमॅटोचा रस मिसळा. जवळपास 15 ते 20 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर गरम पाण्यानं पॅक काढा.  

FB-natural-beauty-tips %281%29

4. गुलाब पाणी
चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा. गुलाब पाण्यामुळे तुमची निस्तेज त्वचेची समस्या कमी होऊन चेहरा फ्रेश दिसू लागतो. गुलाब पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. गुलाब पाण्याचा वापर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एखाद्या फेस पॅकमध्येही तुम्ही गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावू शकता किंवा केवळ गुलाब पाणीही थेट चेहऱ्यावर लावू शकता. 

5. लिंबूचा रस 

लिंबूमध्ये अॅसिडिक गुण असतात. लिंबूतील हा गुणधर्म  चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत होते. एका वाटीत लिंबूचा रस घ्या आणि चेहऱ्यावर जेथे-जेथे डाग आहेत. तेथे-तेथे कापसाच्या बोळानं तो रस लावावा. 5 ते 10 मिनिटांनंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. लिंबूच्या रसामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.

lemon

6. संत्रा पावडर

संत्री खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण त्या कचऱ्याच्या डब्यात न फेकता पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. शिवाय, त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा रसही प्यावा.

7. मध

चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करावा. यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. हवे असल्यास यात 4 ते 5 लिंबाचे थेंबदेखील टाकू शकता.

NOTE : प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगवेगळा असतो. त्यामुळे या टीप्स फोलो करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा.  

अधिक वाचा :

नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय

जेवणानंतर कधीही करु नका आंंघोळ जाणून घ्या कारण

तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.