नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

प्रत्येकाच्या जन्म एका विशिष्ट वेळेवर महिन्यात होतो. त्याच्या जन्मानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव आणि इतर गोष्टी ठरलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीचं वैशिष्ट्य वेगळं असतं. त्यामुळे त्यानुसार त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, चांगलं - वाईट या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तसंच नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींची रास वृश्चिक असते. या राशीचा स्वामी असतो मंगळ. या राशीच्या व्यक्तींंना फारच सिक्रेटिव्ह अर्थात रहस्यमयी व्यक्ती समजण्यात येतं. नोव्हेंबर महिन्यात जन्म होणाऱ्या व्यक्ती या अत्यंत प्रभावशाली असल्याचं नेहमीच समोर येतं. या व्यक्ती जिथे जातात तिथे तिथे आपला प्रभाव निर्माण करतात आणि स्वतःची छाप सोडून येतात. मात्र नोव्हेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींना मेहनतीशिवाय कधीच यश मिळत नाही. या व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जन्म नोव्हेंबर महिन्यात असेल तर नक्की जाणून घ्या कशा आहेत या व्यक्ती - 

नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात जाणून घ्या -

1- पॅशनशिवाय या राशीच्या व्यक्ती अपूर्ण आहेत. करिअरपासून ते नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत या व्यक्तींची पॅशन अफलातून असते. कितीही अपयश आलं तरीही एखादी गोष्ट पूर्ण करण्याची जिद्द या व्यक्तींनी मनात धरली तर काहीही झालं तरी ती गोष्ट पूर्णत्वाला नेल्याशिवाय या व्यक्ती थांबत नाहीत. परिस्थिती कशीही असो या व्यक्तींना पुढे जाणं आवडतं. या व्यक्तींकडे असणारा आशावाद फारच कमी व्यक्तींमध्ये असतो. 

2- या व्यक्तींमध्ये सहनशक्ती आणि समजून घेण्याची वृत्ती भरपूर प्रमाणात असते. पण या व्यक्तींच्या बाबतीत एक गोष्ट वाईट ठरते जी, एखाद्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते तीच गोष्ट मिळवण्यासाठी या व्यक्तींना दुप्पट मेहनत करावी लागते. अतिशय कष्ट करूनच या व्यक्तींंना यश मिळतं. यांची गुणवत्ता असूनही त्यांना मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. 

3- या राशीच्या व्यक्तींच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या व्यक्ती अतिशय आत्मप्रेरित असतात आणि आयुष्यात नक्की काय करायचं आहे आणि काय मिळवायचं आहे ते या व्यक्तींना माहीत असतं. करिअर असो वा उद्योग दोन्हीमध्ये तितक्याच झोकून देऊन या व्यक्ती काम करतात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती या सहसा संवेदनशील लेखक, पोलीस, पत्रकार, कलाकार अथवा डिटेक्टिव्ह होणं स्वीकारतात. 

4- या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे जादुई असतं. कोणालाही आपलंसं करून घेण्याची यांची वृत्ती असते. विशेषतः या राशीच्या मुली या अतिशय स्मार्ट असतात. सुंदर नसल्या तरीही या मुली अतिशय आकर्षित असतात आणि प्रत्येकाच्या मनात आपली जागा बनवतात. या व्यक्ती अतिशय रोमँटिक असतात. या व्यक्तींना फँटास्टिक लव्हर म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. यामुळेच या आपल्या जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा करतात. या व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. पण  त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या व्यक्ती सहसा त्यांना सापडत नाहीत. 

5- प्रेम ही या व्यक्तींसाठी केवळ भावना नाही तर त्यांच्यासाठी ते एक प्रकारचं व्यसन आहे. प्रेम नक्की मिळेल की नाही याबाबत त्यांना शंका असते. पण तुम्ही जर त्यांना विश्वास दिलात की, त्यांचं मन तुम्ही तोडणार नाही. तर तुम्हाला त्यांच्याकडून इतकं प्रेम मिळेल की, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही. प्रेमात कायम विश्वास जपणारी रास म्हणून वृश्चिक राशीच्या व्यक्ती ओळखल्या जातात. 

6- या व्यक्तींचा विश्वासघात केल्यास अथवा या व्यक्तींना त्रास दिल्यास, या व्यक्ती समोरच्याला कधीही माफ करत नाहीत आणि कधी विसरतही नाहीत. ज्या व्यक्ती त्यांच्या भावनांंशी खेळतात त्यांचा सूड वेळ बघून नक्कीच घेतात. 

7- आपल्या आकर्षक व्यक्तीमत्वासाठी या व्यक्ती प्रसिद्ध असतात. या व्यक्तींचा Sense of Humour आणि हजरजबाबीपणा अतिशय कमाल असतो. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता हातळण्याची यांची हातोटी असते. इतर व्यक्तींपेक्षा या नेहमीच वेगळ्या ठरतात. या व्यक्ती इतक्या वेगळ्या असतात की, यांच्यासारख्या व्यक्ती होणं कठीण आहे. इतर लोकांपेक्षा अतिशय वेगळे विचार या व्यक्तींचे असतात आणि त्यामुळे त्या इतर लोकांमध्ये उठून दिसतात. 

8- भूतकाळाबद्दल या व्यक्तींना नेहमीच लगाव असतो. आयुष्यात केलेल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीची आठवण या व्यक्ती जपून ठेवतात. तसंच या व्यक्तींची Intuition Power अफलातून असते. कोणत्याही घडणाऱ्या गोष्टीचा पूर्वाभास या व्यक्तींना आधीच होतो. लोकांचा चेहरा वाचण्यात या व्यक्तींचा हातखंडा असतो. चेहरा बघूनचा या समोरची व्यक्ती जाणून घेऊ शकतात. 

9- नोव्हेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींचा हेतू आजूबाजूच्या सर्व लोकांच्या भल्याचा विचार करण्यात जास्त असतो. या व्यक्ती अतिशय दयाळू आणि परोपकारी असतात. सहनशक्तीच्या बाबतीतही या व्यक्ती कमालीच्या चांगल्या असतात. पण या व्यक्तींचा स्वाभिमान दुखावला तर मात्र समोरच्या व्यक्तींचं काही खरं नाही. 

10- या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती जे काम हातात घेतात ते कायम उत्तम होईल की नाही याचाच विचार करतात. तसंच आपल्या जोडीदारानेही तसंच राहावं असंही त्यांना वाटतं. त्यांना कोणीही काही बोललं तरीही त्यांना फरक पडत नाही. पण त्यांचं ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम आहे त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेण्याची त्यांची तयारी नसते. आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहानसहान इच्छा पूर्ण करणं हे स्वतःचं कर्तव्य समजतात आणि त्याबदल्यात त्यांनी आपल्यावर प्रेम करावं इतकीच यांची इच्छा असते. 

भाग्यशाली क्रमांक – 1,3,7

भाग्यशाली रंग –  मरून, केशरी आणि गुलाबी

भाग्यशाली दिवस –  मंगळवार आणि गुरूवार

भाग्यशाली खडा – पोवळं 

नोव्हेंबरमध्ये जन्म घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

शाहरुख खान, विन्स्टन चर्चिल, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, विराट कोहली, ऐश्वर्या राय, सानिया मिर्झा, नीता अंबानी, अमर्त्य सेन, कमल हासन, यामी गौतम, जुही चावला, राणी लक्ष्मीबाई, तब्बू, सुष्मिता सेन, झीनत अमान 

हेदेखील वाचा - 

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा

जाणून घ्या मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात कशा

फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या