सध्या Palazzo खूपच ट्रेंडमध्ये आहे. कारण हे घालायला कंफर्टेबल आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्यामुळे Palazzo घालण्याला बऱ्याच जणी पसंती देतात. नेमकी ही फॅशन कधी मार्केटमध्ये आली हे आता लक्षात नाही. पण आता मात्र दहा जणींपैकी एक तरी Palazzo घालतेच. कारण Palazzo हा कॅज्युअल असो टेड्रीशनल फंक्शन असो छान दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का Palazzo मध्येही बरेच पॅटर्न आहेत. तसंच तुम्ही ते अनेक प्रकारे पेअरअप करू शकता.
पलाझो पँट्स किंवा पलाझोज हे तरूणींमध्ये आणि महिलावर्गामध्ये खूपच लोकप्रिय आहे. कारण ते वाईड-लेग्ड असल्यामुळे हवेशीर आणि फ्लेअर्ड असतात. तसंच पलाझोचे कट्सही रूंद आणि रिलॅक्स्ड असल्यामुळे कधीही घालायला बरं वाटतं. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात घालायला पलाझो परफेक्ट आहेत. सैलसर, फ्लेअर्ड आणि खूपच कंफर्टेबल असलेले पलाझो तुम्ही अगदी ऑफिसपासून ते अगदी लग्नासाठीही घालू शकता.
जर तुम्हाला वाटलं असेल की, पलाझो म्हणजे एकच प्रकार आहे तर तसं नाहीयं. पाहा पलाझोचे विविध प्रकार.
नावाप्रमाणेच स्ट्रेट कट पलाझो हे सिंपल आणि फझ फ्री आहेत. त्यामुळे तुम्ही रोज अगदी ऑफिसवेअर म्हणूनही वापरू शकता. हा पलाझोचा प्रकार तुम्ही बेसिक टॉप्स ते टीजपासून कुर्त्यावरही पेअर करू शकता.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
कंफर्टेबल फ्लेअर्ड पलाझो हे बेसिकपेक्षा जास्त घेरदार असतात. त्यामुळे तुम्हाला वावरताना ही सुटसुटीतपणा वाटतो. तुम्ही या प्रकारचा पलाझो सॉलिड कलर टॉपसोबत पेअरअप करू शकता.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
प्लीटेड पलाझोमध्ये बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. यामध्ये बेसिक प्लीट्सपासून ते डिटेल्ड प्लीट्सपर्यंत अनेक प्रकार आहेत. हा पलाझो पॅटर्न तुम्ही ऑफिसला आणि अगदी तिथून पार्टीला जातानाही घालू शकता. यावर तुम्ही सिंपल लेस टॉप पेअर अप करून चिक स्टाईल कॅरी करू शकता.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना की या कॅटेगरी लेयर्ड पलाझो का म्हणतात? हा पलाझो तुम्हाला स्कर्ट घातल्यासारखा लुक देतो. तुम्ही वीकेंड पार्टीसाठी किंवा एखाद्या मीटींगला जातानाही हा पलाझो घालू शकता. या पलाझो पॅटर्नसोबत तुम्ही अनेक लुक्स ट्राय करू शकता.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
या पलाझो असतो स्लीट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्लीट पलाझो निवडू शकता. पण याचं स्लीटनुसार हा ऑफिसमध्ये किंवा पार्टीला घालायचा हे तुम्हाला ठरवावं लागेल.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
नावाप्रमाणेच हा पलाझो तुम्ही फॉर्मल लुकचा असल्याने ऑफिसवेअर म्हणून वापरू शकता. तुमच्या डेली ऑफिसवेअर वॉर्डरोबमध्ये हा पलाझो असलाच पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला मिळेल ऑफिससाठी परफेक्ट स्मार्ट लुक.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
घेरदार आणि पायघोळ पलाझोपेक्षा हे थोडं वेगळं आहे. हे लांबीला थोडे शॉर्ट असतात. तुम्हाला जर कंटेपररी लुक हवा असेल तर हा पलाझो परफेक्ट आहे. हा पलाझो तुम्हाला देईल ट्रेंडसेटींग लुक.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
दिवाळी असो वा दसरा पलाझो सूट्स हे कोणत्याही फंक्शनला उठून दिसतात आणि तुम्हाला देतात हटके लुक. पलाझोला सूटेबल टॉप किंवा कुर्ता घातल्यामुळे तुम्हाला फंक्शनसाठी हवा तो टेड्रीशनल लुकही मिळतो आणि कंफर्टेबली कॅरीही करता येतं.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
या पलाझोमध्ये समोरच्या बाजूला बांधण्यासाठी दोन टाय अप्स असतात. जे तुमच्या पलाझो लुकमध्ये अजून स्टाईल एड करतात. हा पलाझो तुमच्या कॅज्युअल लुकसाठी एकदम परफेक्ट आहे.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
या पलाझोची लेंथ अँकलपासून तीन-चार इंच वर असते. फ्रेंड्ससोबत आऊटींगसाठी किंवा शॉपिंगला जाताना तुम्ही हा पलाझो घालू शकता. यावर तुम्ही कुर्तीऐवजी टॉप घातल्यास तो जास्त छान दिसेल.
हा पलाझो तुम्ही इथे खरेदी करू शकता.
पलाझोसोबत तुम्ही विविध लुक्स ट्राय करू शकता. मग ते ऑफिसवेअर असो वा पार्टीवेअर. पलाझोसोबत पाहा कसे करता येतील विविध लुक्स.
तुम्हीही करिश्मासारखा व्हाईट पलाझो डार्क आणि लाँग कुर्त्यासोबत पेअरअप करून चिक लुक मिळवू शकता. यासोबत तुम्ही मोजडी किंवा जूती घातल्यास ते जास्त छान दिसेल. तसंच यावर कमीतकमी अक्सेसरीज घाला.
पार्टी किंवा लग्नाला जाताना तुम्ही भूमी पेडणेकरसारखा असा ब्लिंगी पलाझो आणि कुर्ती असं कॉम्बो करू शकता. त्यामुळे एखाद्या फॅमिली फंक्शन किंवा अगदी सणाला ही तुम्ही असा छान लुक करा.
गुलाबी रंग हा सगळ्यांनाच छान दिसतो. करिना कपूरप्रमाणे तुम्ही हा पिंक लुक छान कॅरी करू शकता. त्यावर तुम्ही मस्तपैकी मोठे सनग्लासेस आणि बॅग पेअरअप करा. मैत्रिणींना भेटायला तुम्ही हा छान लुक केल्यास मैत्रिणी नक्कीच तुमच्या लुकच्या प्रेमात पडतील.
जर तुम्हालाही आलिया भटसारखा सिंपल लुक हवा असेल तर असा लुक नक्की करून पाहा. व्हाईट पलाझो आणि त्यावर डार्क कुर्ती हा लुक सिंपल आणि सोबर आहे. त्यावर तुम्ही मोजडी आणि लांब झुमके पेअरअप करू शकता.
क्रिती सनोन या अभिनेत्रीसारखा तुम्ही मोनोक्रोम म्हणजे पलाझो आणि कुर्ता सेम रंगाचा असा लुक करू शकता. या लुकमध्ये तुम्ही बारीकही दिसाल. कधीकधी उशिर झाल्यावर काय घालावं कळत नाही. तेव्हा असा झटपट लुक करा.
शिल्पा शेट्टीला तुम्ही बरेचदा साडीत पाहिलं असेलच पण तिचा हा पलाझो लुक सुंदरच आहे. हा आहे पलाझो सेट लुक. ज्यामध्ये आहे पलाझोला मॅचिंग कुर्ता. हा लुक फेस्टीव्हही आहे आणि कंफर्टेबलसुद्धा.
जर तुम्हाला असं वाटत असेल की पलाझो हे फक्त कुर्त्यासोबतच पेअरअप करता येतो तर तसं नाहीयं. पाहा पलाझोसोबत तुम्ही कशी वेगवेगळी स्टाईल करू शकता.
बिपाशा बासूचा हा लुक नक्कीच प्रेटी आहे. ज्यामध्ये तिने पलाझोसोबत पेअर अप केला आहे गोल्ड आणि व्हाईट पाँचो टॉप. याचा लुक जंपसूटसारखा वाटत असला तरी कॅज्युअल पार्टीसाठी हा लुक परफेक्ट आहे.तसंच एखाद्या फॅन्सी रेस्टारंटमध्ये जातानाही तुम्ही असा क्लासी लुक करू शकता.
दीपिका पदुकोण म्हणजे बॉलीवूडची फॅशन आयकॉनच आहे. तिचा लुक कधीच वाईट नसतो. त्यामुळे तिने केलेला हा ऑफ शोल्डर टॉप आणि क्रॉप्ड पलाझो लुकही छान दिसत आहे. तुम्हीही असा ट्रेंडी लुक ट्राय करायला हरकत नाही. यावर तुम्ही डँगलिंग इअररिंग्ज्स किंवा स्टेटमेंट नेकलेस कॅरी करू शकता.
काजल अग्रवालने घातलेला हा टू कलर्ड पलाझो नक्कीच हटके आहे. प्लेन आणि बोरींग पलाझोपेक्षा हा लुक नक्कीच वेगळा आहे. फक्त तुम्हाला यात कलर कॉम्बिनेशनची काळजी घ्यावी लागेल. जर तुमच्याकडे असा परफेक्ट कलर कॉम्बो टॉप नसेल तर तुम्ही सिंपली व्हाईट शर्ट किंवा टॉपही पेअर अप करू शकता.
सर्वात सिंपल आणि सोपी स्टाईल आहे ही. तुम्हीही परिणिती चोप्राप्रमाणे क्रॉप्ड पलाझोसोबत असे बेसिक व्हाईट स्नीकर्स पेअर अप करून सुपर क्यूट दिसू शकता आणि हे आहेत सुपर कॉम्फी.
नेहमीच्या पलाझोपेक्षा अभिनेत्री आदिती राव हैद्रीचा हा प्रिटेंड पलाझो नक्कीच वेगळा आहे. ती या लुकमध्ये खूपच गॉर्जिअस दिसत आहे. जशी ती नेहमीच दिसते. तुम्हीही प्लेन पलाझोऐवजी तिच्यासारखा प्रिटेंड पलाझो आणि त्यावर प्लेन शर्ट असा लुक करू शकता.
सोनम कपूरला बॉलीवूडची स्टाईल दिवा म्हटलं जातं ते उगाच नाही. तुम्ही कधी पलाझो पँट्ससोबत असा फॉर्मल जॅकेट लुकचा विचार केला होता का. सोनमने फ्लेअर्ड पलाझो, क्रॉप टॉप आणि फॉर्मल जॅकेट असा मस्त लुक केला आहे. तुम्हीही ऑफिस मीटींग किंवा सेमिनारसाठी असा लुक कॅरी करू शकता. यावर जर तुम्ही हील्स घातले तर ते अजूनच छान दिसेल.
तुम्हाला टॉप आणि कुर्त्याऐवजी पलाझोसोबत अजून वेगळं ऑप्शन हवं असल्यास हा लुक तुमच्यासाठी आहे. तुम्हीही अथिया शेट्टीप्रमाणे पलाझो आणि अनारकली सूट पेअरअप करू शकता. हा कॉम्बो उन्हाळ्यातील एखाद्या फंक्शनमध्ये घालण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
पलाझोचे विविध लुक करताना खालील गोष्टीही नक्की लक्षात ठेवा. कारण यामुळे तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडेल.
1. तुम्ही जर बारीक असाल तर स्टफ फॅब्रिक जसं रॉ सिल्क किंवा ब्रोकेड पलाझो तुम्ही घालू शकता.
2. जर तुम्ही स्थूल किंवा हेल्दी असाल तर नेहमी शिफॉन किंवा जॉर्जेट फॅब्रिकची निवड करा.
3. उन्हाळ्यात किंवा कॅज्युअल लुकसाठी कॉटन फॅब्रिकची निवड करा.
1. प्रिटेंड पलाझोसोबत तुम्ही प्लेन टॉप पेअरअप करत असाल तर त्यावर बीडेड नेकलेस तुम्ही घालू शकता.
2. पलाझोवर तुम्ही क्रॉप टॉप घालणार असाल तर हँगिंग ईयररिंग्ज घातल्यास ते छान दिसेल.
3. स्लीव्हलेस टॉप आणि पलाझोसोबत ब्रेसलेट नक्की घाला.
4. तसंच सोबतच स्लिंग बॅग किंवा हँडबैग कॅरी करा.
5. डे आउटींगसाठी तुम्ही पलाझोवर हॅटही घालू शकता.
6. हॅवी एंम्ब्रॉयडरी केलेला पलाझो सूट असल्यास त्यावर बटवा नक्की कॅरी करा.
1. पलाझोसोबत नेहमी फ्लॅट्स किंवा मोजडी छान दिसतात.
2. ब्लॉक हील्स सँडल्ससुद्धा तुम्ही पलाझोच्या प्रकाराप्रमाणे घालू शकता.
3. क्रॉप्ड पलाझो असल्यास तुम्ही स्ट्रॅपवाले फ्लॅट्स घालू शकता.
4. एथनिक पलाझो असल्यास जूती किंवा मोजडी मस्ट आहे.