परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण

परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण

बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी… सध्या जिकडेतिकडे बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. ‘मिल्खा सिंग’पासून ते ‘एम.एस. धोनी’ यांच्या बायोपिकनं बॉक्सऑफिस चांगलंच गाजवले. यानंतर आणखी एका खेळाडूचा बायोपिक सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री परिणिती चोप्रा सायनाची भूमिका साकारत आहे. यासाठी परिणिती प्रचंड मेहनत देखील घेत आहे. यासंदर्भातील अनेक पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. सायनाविषयीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी परिणिती जाणून घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे तिनं सिनेमासाठी बॅडमिंटनचे धडेदेखील घेतले आहेत.   

या बायोपिकव्यतिरिक्तही परिणितीकडे आणखी काही सिनेमे आहेत. सायनाच्या बायोपिकचं शुटिंग पूर्ण केल्यानंतर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ सिनेमाच्या रीमेकवर ती आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. या सर्व चर्चांदरम्यानच परिणिती चोप्रानं अजय देवगणचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’मधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमामध्ये काम करण्यासाठी परिणिती अतिशय उत्सुक होती. पण अन्य प्रोजेक्ट्समुळे ‘भुज’सिनेमासाठी तारखा देणं तिला शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे. तारखांच्या अडचणीमुळेच परिणितीनं ‘भुज’ सिनेमातून थेट एक्झिट घेणंच पसंत केलं. 

भुज : देशभक्तीवर आधारित सिनेमा

‘भुज’मध्ये अजय देवगणशिवाय संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 1971मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर सिनेमाचा विषय आधारित आहे. सिनेमामध्ये अजय देवगण जवान विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक दुधिया करणार असून गिन्नी खनुजा, वजीर सिंह, भूषण कुमार आणि अभिषेक या  सिनेमाचे निर्माते आहेत. 2020मध्ये 14 ऑगस्टच्या दिवशी ‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’ बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

(वाचा : ‘ये हे मोहब्बते’मधील ‘खतरों के खिलाडी’ करण पटेलची होणार पुन्हा एंट्री)

 

सोनाक्षी सिन्हामुळे सोडला सिनेमा?

मिळालेल्या माहितीनुसार,’भुज’ सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हाचीही मुख्य भूमिका आहे. रिपोर्ट्सनुसार, पण या सिनेमावरून परिणिती आणि सोनाक्षीमध्ये कोल्ड वॉर सुरू होते. सोनाक्षी वारंवार आपलं पात्र हे सिनेमातील मुख्य भूमिका असल्याचं सांगत परिणितीसोबत स्पर्धा करू पाहत होती. यामुळे दोघींमधलं बोलणंदेखील पूर्णतः बंद झालं होतं. या सर्व बाबी लक्षात घेऊन परिणितीनं सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

(वाचा : अभिताभ बच्चन नंतर आता आयुषमान ठरतोय बॉलीवूडचा नंबर वन)

हे आहेत परिणितीचे आगामी सिनेमे

‘जबरिया जोडी’ या सिनेमामध्ये परिणिती शेवटची दिसली होती. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर अतिशय वाईट पद्धतीनं आपटला. त्यामुळे आता करिअरच्या दृष्टीकोनातून योग्य विचार करूनच परिणिती भूमिका स्वीकारताना दिसत आहे. ‘संदीप और पिंकी  फरार, द गर्ल ऑन द ट्रेन आणि सायना’ हे प्रोजेक्ट्स सध्या परिणितीकडे आहेत. 

(वाचा : Viral : ऐश्वर्या राय देणार गोड बातमी...)

सायनाच्या बायोपिकसाठी परिणिती घेत आहे प्रचंड मेहनत

मोठ्या पडद्यावर हुबेहुब सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणितीकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. जवळपास चार महिने तिनं बॅडमिंटनचं ट्रेनिंग घेतलं. शुटिंगदरम्यान परिणितीनं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच आपला मुक्काम ठोकला होता. एका मुलाखतीदरम्यान  परिणितीनं सांगितलं होतं की, ‘घरापासून ते शुटिंग लोकेशनपर्यंत पोहोण्यासाठी मला जवळपास 4 ते 5 तासांचा वेळ लागत होता. एवढा वेळ वाया जाऊ देणं निरर्थक होतं. यावर तोडगा म्हणून मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला’. दरम्यान, यापूर्वी बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार होती. यासाठी बॅटमिंटनचा सराव करण्यासही सुरुवात केली होती. पण श्रद्धानं अन्य काही सिनेमांसाठीही तारखा दिल्या होत्या. अखेर व्यस्त वेळापत्रकामुळे श्रद्धाला सायनाचा बायोपिक सोडावा लागला.    

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.