प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

प्रियांका चोप्रा  जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच चर्चेचा विषय असतात. प्रियांका चोप्राचं परदेशी निकशी झालेलं लग्न, त्यांचे वेकेशन्स, त्यांचं वैयक्तिक आयुष्य याबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा ‘दी स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामुळे प्रेक्षकांनी तिला बऱ्याच काळानंतर बॉलीवूड चित्रपटात पाहिलं. आता प्रियांकाच्या चाहत्यांसाठी एक नवीन खुशखबर आहे. प्रियांका चोप्रा या वर्षी इंटरनेटवर सर्वात सर्च केली जाणारी अभिनेत्री ठरली आहे. एका मीडिया कंपनीच्या सर्व्हेनुसार प्रियांकाने इंटरनेटवर चाहत्यांच्या मनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. या सर्वेक्षणानुसार 2019 मध्ये प्रियांकाला इंटरनेटवर 27.4 कोटीवेळा सर्च केलं आहे. प्रियांकानंतर या लिस्टमध्ये दीपिका पादुकोन आणि सनी लिओनी या अभिनेत्री दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर सर्चमध्ये आहेत. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि सुपरस्टार शाहरूख खान यांचंही नाव आहे. आश्चर्य बॉलीवूड अभिनेत्यांमध्ये म्हणजे दिवंगत अभिनेता अमरिश पुरी तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र या सर्वात इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च असलेल्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका पहिल्या स्थानावर असल्यामुळे तिच्या  चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे. 

प्रियांका आणि निकचं नवं घर

प्रियांका आणि निकने अमेरिकेतील लॉस अॅंजलिसमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. ज्या घराची किंमत जवळजवळ वीस मिलीयन आहे. म्हणजेच भारतीय करंसीमध्ये याची किंमत जवळजवळ 144 कोटीचं  आहे. हे घर वीस हजार स्वेअर फुटवर बांधलेलं आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. प्रियांकाच्या नव्या घरात सात बेडरूम आणि अकरा बाथरूम आहेत. प्रियांकाच्या घराजवळच निकच्या इतर भावंडांनी देखील घरे घेतली आहेत.

https://www.instagram.com/p/BxiLnWiHliQ/

लवकरच प्रियांकाच्या लग्नाला होणार एक वर्ष पूर्ण

बॉडीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचंही हॉट कपल आहे. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियंका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. प्रियंका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे लग्नानंतर सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंका निकपेक्षा मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. प्रियंका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडेल. प्रियंका आणि निक त्यांच्या वैवाहिक जीवनात फार खुश आहेत. लग्नानंतर सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो आणि हॅपी मुव्हमेंट्स शेअर करत असतात. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

गुपचूप केलेल्या लग्नानंतर आता राखी सावंत झाली 'आई'

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका

बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ही विश्वसुंदरी या कारणांमुळे राहिली चर्चेत