योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर | POPxo

योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर

योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर

नात्यात भांडण अगदी स्वाभाविक आहेत. पण नात्यातील  काही भांडणं इतकी विकोपाला जातात की, ती मिटता मिटत नाहीत. त्यामुळे नात्यातील दुरावा वाढू लागतो.नात्यात आलेला दुरावा वेळीच मिटवणे फारच गरजेचे असते. जर तुमच्या नात्यातही असा दुरावा आला असेल तर तुम्ही तुमच्या नात्यातील दुरावा योग्यवेळी मिटवा. कारण जर तुम्ही तुमच्या नात्यातील दुरावा योग्यवेळी मिटवला तरच तुम्हाला तुमचे नाते अधिक दृढ आणि चांगले करता येईल.

या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

चूक कोणाची?

shutterstock
shutterstock

 नाते बिघडवणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ‘EGO’. कोणत्याही कारणास्तव तुमच्यामध्ये भांडण झाली असेल ती काही केल्या मिटत नसतील तर त्याला जबाबदार ही गोष्ट आह. याचे कारण असे की, भांडण झाल्यानंतर चूक कोणाची हा छडा लावल्यासाठी आपण बराच वेळ घालवतो. त्यामुळे चूक कोणाची यासाठी तुम्ही वेळ घालवू नका. चूक तुझी की माझी सॉरी कोणी म्हणायचे यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विषय संपवायचा प्रयत्न करा. मागच्या चुका काढण्यापेक्षा भविष्याचा विचार करा. 

उदा. जर तुमची भांडणं कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे झालेली असेल तर अशी भांडणं  टिकवणे अजिबात चांगले नाही. कारण अशी भांडणं एकमेकांमध्ये अविश्वास वाढवत असतात. 

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

चांगल्या गोष्टी आठवा

नात्यातील दुरावा मिटवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या रिलेशनशीपमधील चांगल्या गोष्टी आठवायला हव्यात. कारण  त्या चांगल्या गोष्टी तुम्हाला पुन्हा जवळ आणण्यास मदत करतील. दुरावा येण्याचे कारणच असे असते की, तुम्हाला तुमच्यातील चांगल्या गोष्टी न आठवणे.आपल्या डोक्यात एकदा राग भरला की, तो जाता जात नाही.  त्यामुळे एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आठवतच नाही. तुमच्या डोक्यातही असा राग भरला असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी आठवण्याची गरज आहे.

उदा. तुम्ही घालवलेला चांगला काळ किंवा तुमची एखादी चांगली डेट तुम्ही आठवा.

खूप बोला

shutterstock
shutterstock

नात्यामध्ये संवाद हा महत्वाचा असतो. अनेक जोडपी  भांडणानंतर मनाशीच काहीतरी ठरवून घेतात आणि ते एकमेकांशी बोलणे टाळतात.  एकमेकांशी इतका अबोला धरतात की, त्यांना एकमेकांचे तोंडही पाहायचे नसते. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट या नंतर करायची आहे ती म्हणजे तुम्हाला एकमेकांशी खूप बोलायचे आहे.  हा पण हे बोलताना पुन्हा तुमचा विषय भांडणाकडे दाणार तर नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण बरेचदा असे होते की, भांडणं मिटवता मिटवता ती अधिकच वाढत जातात. तेही नात्यात चांगले नाही


नाती म्हटली की भांडण आलीच पण ती भांडण योग्यवेळी मिटवण्याचा प्रयत्न करा. कारण योग्यवेळी जखम भरली की, भविष्यात त्याचा त्रास होत नाही. 

नात्यात 'या' चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.