वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पित असाल तर जाणून घ्या योग्य पद्धत

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पित असाल तर जाणून घ्या योग्य पद्धत

वजन कमी करण्यासाठी आपण किती काय काय करतो. पण अनेकदा असे करताना चुकीची पद्धत अवलंबली जाते. तुम्ही काय खाता? काय पिता हे डाएटमध्ये जाणून घेणे फार गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा लिंबाचे पाणी पित असाल तर तुम्हाला लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत हवी. म्हणजे तुमच्या शरीरातील मेद कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन कसे करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

लिंबू पाणी पिण्याची सर्वसाधारण पद्धत

shutterstock

सर्वसाधारणपणे उपाशी पोटी  कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात मध घालून पाणी आपण पितो. अशा प्रकारचे पाणी प्यायल्यानंतर अगदी महिन्याभरात फरक पडतो असे म्हणतात पण काहींना त्यांच्यात काहीच फरक झाला नाही असे वाटते आणि ते खरे आहे. अशा प्रकारे तुम्ही पाणी पित असाल तर तुम्हाला त्याचा फरक कितपत पडत असेल या बाबत काहीच खात्री देता येत नाही. पण आता आम्ही लिंबाचे पाणी पिण्याची एक वेगळी पण परिणाम करणारी पद्धत आणली आहे.त्यामुळे तुमच्या शरीरातील मेद हमखास कमी होईल. 

 

असे सेवन करा लिंबू पाणी

shutterstock

आता आपण  फॅट बर्न करणाऱ्या लिंबू पाण्याबद्दल एक महत्वाची चूक करत आहोत ते म्हणजे आपण फक्त लिंबाचा रस घेतो. खरंतर तुमच्या फॅटवर काम करणारी लिंबाची साल असते. ती लिंबाची सालचं आपण फेकून देतो. पण जर तुम्ही लिंबाच्या फोडी करुन त्याच्या बिया काढून टाका. लिंबू सालीसकट तुम्ही मिक्सरमधून काढा. तयार पेस्ट गरम पाण्यात टाकून त्यात मध घालून तुम्हाला ते पाणी प्यायचे आहे. फॅट बर्न करण्यासाठी तुम्हाला लिंबाची साल खाणे आवश्यक असते. म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने  लिंबू आमि मध प्या. असे पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला महिन्याभरात झालेला बदल जाणवेल.

लिंबाची पेस्ट नक्की करा ट्राय

shutterstock

आता तुम्हाला लिंबाची पेस्ट म्हटल्यावर थोडे विचित्र पाटले असेल पण तुम्ही हा प्रयोग नक्की करुन पाहा. कारण लिंबाची साल तुमच्यातील फॅट बर्न करत असते. तुम्ही एकाच वेळी लिंबाची पेस्ट बनवून ठेवण्याचा विचार करत असाल तर एका वेळी जास्त लिंबाचा वापर करु नका. एकावेळी 3 ते 4 लिंबाची पेस्ट करुन ठेवा. तुम्हाला ही पेस्ट फ्रिजमध्ये आरामात ठेवता येईल. 

#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

महिनाभर करा प्रयोग

कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा तुमच्या शरीरावर महिन्याभरानंतर होत असतो. त्यामुळे तुम्ही किमान महिनाभर तरी हा प्रयोग करुन पाहा. आधीच्या लिंबू पाण्याच्या तुलनेत तुमच्यामध्ये बराच फरक झालेला तुम्हाला जाणवेल. 


मग आता हा नवा प्रयोग तुम्ही नक्की करुन पाहा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.