शरीर निरोगी राहण्यासाठी तुम्ही उत्तम आहार आणि जीवनशैली महत्वाची असते. आपल्या शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळत असतात. व्हिटॅमिन A,B,C,D प्रत्येक मनुष्याच्या शरीरासाठी आवश्यक असते. व्हिटॅमिन्सची मात्रा तुमच्या शरीरात कमी असेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवतील. आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन D विषयी सर्वकाही. करुया सुरुवात
व्हिटॅमिन D हे फॅट सोल्युबल सेकोस्टेरॉईड आहे. हे व्हिटॅमिन्स तुमच्या शरीरात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असे घटक पुरवण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन D तुम्हाला वेगवेगळ्या घटकांमधून मिळत असते. तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवांसाठी हे आवश्यक आहे. व्हिटॅमिन D ला सनशाईन असे देखील म्हणतात. अन्नपदार्थांसोबतच तुम्हाला सूर्यप्रकाशातूनही व्हिटॅमिन D मिळत असते. त्यामुळेच त्याला सनशाईन असे म्हटले जाते. लहानमुलांमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर पटकन जाणवत नाही. पण वृद्धापकाळात त्याचा त्रास अधिक तीव्र होतो.
व्हिटॅमिन D काय हे कळल्यानंतर तुम्हाला ते शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे कळलचं असेल पण आता त्याचा नेमका फायदा कसा होतो ते जाणून घेऊया.
हाडांना बळकटी देण्याचे काम व्हिटॅमिन D करत असते. तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन D आवश्यक असते. हाड मजबूत राहिली तर तुम्हाला सांधेदुखी किंवा अन्य त्रास होत नाही. तुम्हाला चालताना किंवा अन्य गोष्टी करताना कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखी किंला इतर काही त्रास असतील तर तुम्ही व्हिटॅमिन D ची समावेश तुमच्या आहारात करायला हवा.
तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही व्हिटॅमि D करते. तुम्हाला डाएबिटीजचा त्रास असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन D ची गरज आहे. व्हिटॅमिन D च्या योग्य सेवनामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. तुमची साखर नियंत्रणात राहिली तर तुमचे आरोग्यही चांगले राहील.
वाचा - व्हिटॅमिन बी 6 चे दुष्परिणाम
जर तुमचा आहार योग्य नसेल तर गर्भावस्थेत महिलांना अनेक त्रास होतात. जर तुम्ही गर्भावस्थेत योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D घेतले तर गर्भावस्था सुलभ जाते. तुम्हाला कसलाही त्रास होत नाही.या काळात होणारे मूड स्विंग्सही होत नाही. त्यामुळे गर्भावस्थेत तुम्ही अगदी आवर्जून व्हिटॅमिन D घ्यायला हवे.
७ दिवसात २ ते ६ किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन (Lose Weight In 7 Days In Marathi)
कॅन्सरला प्रवृत्त करणारे पेट्रोजन हे कॅन्सरला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन D करते. हल्ली इतर कोणत्याही आजारांपेक्षा कॅन्सरची भीती अधिक असते. बदललेल्या लाईफस्टाईमुळे हा आजार अधिक बळावताना दिसतो. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन D असावे.
हल्ली हृदयविकाराचा त्रास कोणत्याही वयोगटात आणि कोणालाही होतो. जर तुमचा आहार योग्य असेल तर हा त्रास तुम्हाला होत नाही. या आहारात व्हिटॅमिन D चे प्रमाण योग्य असेल तर हृदयविकार तुमच्यापासून दूर पळतो.
व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे आजारपणांना निंमत्रण मिळते. जर तुम्ही व्हिटॅमिन D चे सेवन योग्य प्रमाणात केले तर तुमचे आजार तुमच्यापासून दूर पळतात. आजारांना लढण्याची प्रतिकारशक्ती व्हिटॅमिन D मुळेच तुम्हाला मिळत असते.
वाचा - त्वचेसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Skin)
व्हिटॅमिन D तुमच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला कळलेच असेल. पण जर तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D मिळत नसेल तर मात्र तुम्हाला आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी उद्धभवू शकतात. नेमके हे त्रास कोणते ते देखील जाणून घेऊया.
जर तुम्हाला सतत आजारपण येत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता झाली आहे असे समजावे. तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होत असतात. सतत प्रकृतीच्या तक्रारी तुम्हाला जाणवत राहतात.
व्हिटॅमिन D तुमच्या शरीरात कमी झाले तर तुम्हाला अगदी हमखास थकवा जाणवायला लागतो. तुम्ही दिवसभरात जास्त कामही करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला सतत असे वाटते की, खूप काम करुन आपली दमछाक झाली आहे. तुमचा सततचा थकवा तुम्हाला अॅक्टिव्ह राहण्यापासून दूर ठेवतो. त्यामुळे होतं असं की, तुमची काहीही नवीन करण्याची इच्छा मरुन जाते. तुम्हाला नवे काही करावेसे वाटत नाही.
वाचा - तुरटीचे गुणकारी फायदे
शरीरात व्हिटॅमिन D कमी जाले तर केसगळतीचे प्रमाणही वाढू लागते. केसांसाठी अनेक चांगल्या गोष्टी पोटात जाणे आवश्यक असते. त्यापैकीच एक आहे व्हिटॅमिन D. जर तुमच्या शरीरात त्याचे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला केसांच्या तक्रारी जाणवू लागतात. केस गळती हे त्यापैकीच एक आहे.आधी केसांची गळती अगदी कमी असते. पण कलांतराने केसगळतीचे प्रमाण वाढते आणि मग चिंतेचे कारण बनते.
तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D मिळाले नाही तर तुमचे अंग सतत दुखत राहते. तुमचा हा थकवा सतत वाढत राहिला तर तुमचे स्नायू दुखत राहतात. अकाली अंगदुखीचा त्रास तुम्हाला होऊ लागतो. तुम्ही कोणताही व्यायाम करत नसाल आणि तरी तुम्हाला स्नायू दुखी होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D फारच कमी झाले समजावे.
थकवा, सतत येणारे आजार यामुळे साहजिकच तुमचे मन उदास राहणार… जर तुम्हाला काहीही कारण नसताना सतत दु:खी असल्यासारखे वाटत असेल तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन D कमी झाले आहे असे समजावे. मन सतत दु:खी राहिले तर तुम्हाला काहीही करावेसे वाटणार नाही. तुमच्यातील नकारात्मक उर्जा वाढेल.
स्थुलपणा आलेला कोणालाच आवडत नाही. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण योग्य असेल तर तुमचे वजनही नियंत्रणात राहते. पण जर व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी झाले तर मात्र स्थुलपणा वाढतो. तुम्हालाही स्थुलपणा वाढलेला नको असेल तर तुम्ही व्हिटॅमिन D चे आहारात सेवन करायला हवे. तरच तुमचे वजन नियंत्रणात राहील.
व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर तुम्हाला काही पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन तुम्ही करायला हवे. ते देखील तुम्हाला माहीत हवे. त्यामुळे आम्ही व्हिटॅमिन D असलेल्या पदार्थांची एक यादीच तयार केली आहे.
बाजारात कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या मिळतात. जर तुम्ही अंडी किंवा मासे खात नसल तर अनेकदा त्यांच्यातील पोषकतत्वे तुम्हाला मिळावे म्हणून कॉड लीव्हर ऑईल असलेल्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कॉड लीव्हर ऑईल घेण्याचे काही दुष्परिणाम नाहीत. पण जर तुम्हाला काही त्रास असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचे सेवन करायला हवे.
डाएट करणाऱ्यांना सोयाबीनचे दूध माहीतच असेल. व्हिटॅमिन D आणि मिनरल्सनी युक्त असलेले सोयाबीनचे दूध तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. जर तुम्हाला गायीचे दूध आवडत नसेल तर तुम्ही सोयाबीनचे दूध पिऊ शकता. सोयाबीनचे दूध हल्ली सर्वत्र उपलब्ध आहे
गायीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन D भरपूर असते. जर तुम्ही दिवसातून दोनदा दूध पित असाल तर तुम्हाला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D मिळेल. लहान मुलांनाही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसातून किमान एकदा तरी ग्लासभरुन दूध प्यायला काहीच हरकत नाही. अनेकांना दूध आवडत नाही. पण व्हिटॅमिन D मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुधामध्ये कोणतीही पावडर घालून दुधाचे सेवन करु शकता.
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D असते. जर तुम्ही मासे खात असाल तर तुम्ही शिंपल्या ट्राय करायला हव्यात. शिंपल्या करणे अनेकांना कष्टाचे वाटते म्हणून ते करायला पाहत नाहीत. पण जर तुम्हाला शिंपल्या करलवता येत नसतील तर तुम्ही त्या सरळ उकडून त्यातील मांस काढून घेऊ शकता. त्यांनतर तुम्ही तुमच्या पद्धतीची ग्रेव्ही किंवा सुक्या मसाल्यामध्ये शिंपल्या करु शकता.
कोळंबी हा माशाचा प्रकारही अनेकांना आवडतो. जर तुम्ही कोळंबी खात असाल तर फारच उत्तम. कोळंबी साफ करण्याचे कष्ट अनेकांना आवडत नाही. शिवाय ती उष्ण असतात म्हणूनही अनेक जण खाणं टाळतात. पण तुम्ही योग्य प्रमाणात कोळंबी खाल्ली तर तिचा तुम्हाला त्रास होणार नाही. उलट तुम्हाला कोळंबीपासून भरपूर फायदे मिळतील. कोळंबीच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनतात. आम्ही काही कोळंबी रेसिपी शेअर केल्या आहेत त्या देखील करुन पाहा.
अनेक जणांना नाशत्यामध्ये अंडी खाण्यास पसंती देतात. अंडी शरीरासाठी चांगली असतात हे सांगणाऱ्या अनेक जाहिराती तुम्ही या आधीही पाहिल्या असतीलच. त्यामुळे तुम्हाला अंड्यांमध्ये असणाऱ्या पोषकतत्वाबद्दल काही विशेष सांगायला नको. पण आहारात तुम्हाला अंडीचा समावेश करणे फारच फायद्याचे आहे. त्यामुळे तुम्ही दिवसात किमान दोन तरी अंडी खाच.
आता जर तुम्ही शाकाहारी असाल तरी तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण मशरुम्समध्येही व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात असते. हल्ली डाएटमुळे अनेकांना मशरुम्स खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हल्ली मशरुम्स सगळीकडेच मिळतात. मशरुम्स तुम्ही भाजी किंवा भातात घालू शकता आणि त्याचे सेवन करु शकता.
सकाळच्या नाशत्यामध्ये ओट्स खाण्याचा सल्लादेखील दिला जातो. त्यामध्येही व्हिटॅमिन D असते. तुम्हाला ओट्सची चव आवडत नसेल तर हल्ली बाजारात मसाला ओट्ससुद्धा मिळतात. तुम्ही ते खाऊ शकता. ओट्स हे नेहमी गरम खायला हवेत. जर तुम्हाला ओट्सचा उपयोग करुन अन्य काही रेसिपी तयार करता येत असतील तर फारच उत्तम
फळांच्या रसामध्ये ही व्हिटॅमिन D असते. आता संत्र म्हटल्यावर आपल्याला त्यात व्हिटॅमिन C असल्याचेच माहीत आहे.पण संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन D सुद्धा आहे. तुम्हाला सुंदर त्वचेसोबत इतरही फायदे संत्र्याच्या रसामुळे मिळतील.
टुना मासामध्ये व्हिटॅमिन D भरभरुन असते. त्यामुळे तुम्हाला आहारात टुना मासा खाता आला तरी चालेल. खूप जण टुना मासा खात नाहीत. पण जर तुम्ही नव्याने खाणारे असाल तर तुम्ही टुना मासा खाऊ शकता. टुना मासा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण तुम्ही एकदा तरी हा मासा ट्राय करायला काहीच हरकत नाही.
मासे, अंडी, फळं यांचा समावेश व्हिटॅमिन D मध्ये असल्यामुळे तुमच्या त्वचेवरही याचा परिणाम होतो. तुमच्या त्वचेवरील चमक कायम ठेवण्यास हे पदार्थ मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात व्हिटॅमिन D असेल तर तुम्हाला त्याचा हमखास फायदा होईल. म्हणून चांगल्या त्वचेसाठी आहारात व्हिटॅमिन D चा समावेश असू द्या.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला अनेक त्रास होऊ लागतात. सतत येणारी आजारपण, थकवा असे तुम्हाला वाटू लागते. याचा परिणाम तुमच्या मूडवर होतो. चीडचीडेपणा वाढतो. काम करण्याची फारशी इच्छा होत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन D चा परिणाम तुमच्याआरोग्यावर आणि मूडवर होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन D चा समावेश असू द्या.
आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट असलेल्या अन्नपदार्थांमध्ये व्हिटॅमिन D असतेच.तुमच्या शरीरासाठी व्हिटॅमिन D फारच आवश्यक असते. तुमच्या आहारात किमान 10 ते 20 मायक्रोग्रॅम तरी व्हिटॅमिन D हवे. जास्तीत जास्त आणि योग्य प्रमाण 25 ते 100 मायक्रोग्रॅम इतके असते.त्यामुळे तुम्ही दिवसाला किमान इतके तरी व्हिटॅमिन D घ्यायला हवे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
You Might Like This: