सनी लिओनचा हा चित्रपट अडकला आहे वादाच्या भोवऱ्यात

सनी लिओनचा हा चित्रपट अडकला आहे वादाच्या भोवऱ्यात

सनी लिओन सध्या काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लवकरच सनी लिओन लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी नसून तामिळ असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सनी लिओन तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे. या चित्रपटाची तयारी सध्या सुरु झाली असून या चित्रपटाव्यतिरिक्त ती आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे इतक्यावेळ कोणत्याही चित्रपटातून ब्रेक घेतलेल्या सनीला तुम्हाला पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

पिरियॉडिक चित्रपटात दिसणार सनी

‘वीरमादेवी’ नावाचा एक चित्रपट तामिळमध्ये येणार आहे. या चित्रपटात सनी लिओन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी सनी तामिळ चित्रपटा दिसली आहे. पण तिने प्रमुख भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे प्रमुख भूमिका असलेला तिचा हा पहिला चित्रपट असणार आहे. वीरमादेवी ही एक योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथच्या इतिहासात वीरमादेवीची ख्याती आहे. म्हणूनच तिच्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या रोलसाठी सनीची निवड करण्यात आली. 

सनीच्या निवडीवर उभा राहिला वाद

Instagram

सनी एक पॉर्नस्टार असल्याची ओळख तिने मिटवून टाकली असली तरी देखील लोक अजूनही तिला पॉर्नस्टार म्हणूनच ओळखतात. त्यामुळे तिला अशा शूर योद्धा वीरमादेवीचा रोल देणे चांगले नाही असे म्हणत तामिळनाडूमध्ये या गोष्टीला कडाडून विरोध करण्यात आला. गेल्यावर्षी मे महिन्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. त्यानंतरच हा सगळा वाद सुरु झाला. या चित्रपटाचे शुटींग सध्या सुरु असल्याचे कळत असले तरी हा चित्रपट फ्लोअरवर कधी येणार ते मात्र अद्याप कळले नाही.

100 कोटींचा चित्रपट

सनी लिओनने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले असले तरी सुद्धा हा चित्रपट तिच्यासाठी खास होता कारण हा चित्रपट तब्बल 100 कोटींचा आहे. इतक्या मोठ्या चित्रपटात सनीला लीड रोल करण्याची संधी मिळाली हे फार महत्वाची गोष्ट होती. पण 2018 साली रिलीज होणारा हा चित्रपट विरोधानंतर अडकला आहे. काही संघटनांनी वीरमादेवीसाठी सनी लिओनीला पर्याय मिळाला नाही का असे प्रश्न उपस्थित केले होते.त्यानंतरच या चित्रपटाते काम रखडले.

हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार सनी

Instagram

वीरमादेवी हा चित्रपट जरी अडकला असला तरी सनी लिओनकडे आणखी एक चित्रपट आहे. तो म्हणजे ‘कोका कोला’. हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून लवकरच हा चित्रपट फ्लोअरवर येणार आहे. हॉरर चित्रपटात काम करण्याचा अनुभव सनीला आधीही आहे. या आधी तिने 'रागिनी MMS' या चित्रपटातही काम केले आहे. त्यामुळे तिला हॉररपट काही नवीन नाही.

या कारणांमुळे लोकं बघतात बिग बॉससारखे शोज

सनीने नुकताच शेअर केला व्हिडिओ

सनी इन्स्टाग्रामवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये ती लैला मे लैला या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.