खिचडीचे 5 चविष्ट आणि पौष्टिक प्रकार नक्की करुन पाहा

खिचडीचे 5 चविष्ट आणि पौष्टिक प्रकार नक्की करुन पाहा

डाळ- भात.. भाजी- पोळी असा आहार घेऊन कधीकधी फारच कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. आता काही वेगळं खायचं म्हणजे हल्लीच्या डाएटवाल्यांना काहीही खाऊन चालत नाही. पोटभरीचं पण पौष्टिक असं काहीतरी खाण्याचा प्रकार आपल्याला हवा असतो. बरेचदा असे काही तरी खायची इच्छा झाली की, घरी पटकन खिचडी लावली जाते. डाळखिचडी, पालकखिचडी, लसूणखिचडी असे काही प्रकार केले जातात. जर तुम्हालाही खिचडी हा प्रकार आवडत असेल तर तुमच्यासाठी 5 चविष्ट आणि पौष्टिक खिचडीची रेसिपी

ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज (Cake Recipes For Christmas In Marathi)

1. स्प्रिंग ओनिअन अँड गार्लिक खिचडी

Instagram

साहित्य:   2 वाटी तयार मुगाच्या डाळीची खिचडी ( साल असलेल्या मूग डाळीची खिचडी बनवून घ्या, पातीचा कांदा, मोहरी, 2 सुक्या मिरच्या, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं- लसूण पेस्ट, धणे-जीरे पूड,मीठ

फोडणीसाठी: तेल, हिंग, हळद, जीरे , लाल तिखट

कृती:   

 • एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात लाल मिरची, मोहरी आणि जीरं घाला.
 •  जीरं तडतडल्यानंतर त्यात हिंग घाला. 
 • आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला बारीक कांदा, हळद, लाल तिखट, धणे-जीरे पूड, मीठ घालून  2 मिनिटं परता.
 • थोडे पाणी आणि कोथिंबीर घालून एक उकळी येऊ द्या.
 • तयार मिश्रणात टोमॅटो घालून तो चांगला शिजू द्या.
 • तयार मूग डाळीची खिचडी यामध्ये घाला.
 • तयार खिचडीमध्ये अर्धाकप पाणी घालून मिश्रण एकजीव करा
 • तुम्हाला थपथपीत किंवा ओलसर खिचडी हवी असेल तर त्या आवडीनुसार पाणी घाला.
 • आता एका फोडणीच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात जीरं घालून तडतडू द्या. लाल तिखट घालून गॅस बंद करा.
 • तयार फोडणी खिचडीवर घाला. पातीच्या कांदा घालून सर्व्ह करा. 

2. पालक खिचडी

Instagram

साहित्य: पालकाची पाने, अर्धा कप तांदूळ, ¼ कप पिवळी मूग डाळ, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, हिंग, हळद, धणे-जीरे पूड, आलं लसूण पेस्ट, लाल सुक्या मिरची, गरम मसाला, लाल तिखट, तेल

कृती:

 • एका कुकरमध्ये डाळ आणि तांदुळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. 
 • त्यात हिंग, हळद , मीठ आणि 1 कप पाणी घालून कुकर लावा. 1 शिटी काढल्यानंतर गॅस बंद करा. 
 • एका मिक्सरमध्ये पालकची पाने घेऊन त्यात तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरची घाला.पालकाची छान पेस्ट करुन घ्या. 
 • एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. 
 • त्यात टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पूड, सगळे सुके मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. 
 • टोमॅटो थोडा शिजल्यानंतर त्यात पालकाची तयार प्युरी घाला. पालकाचा कच्चा वास जाईपर्यंत तुम्ही पलक शिजवून घ्या. 
 • खिचडी लावलेला कुकर उघडून ही खिचडी चांगली घोटून घ्या. 
 • तयार पालकाच्या मिश्रणात ही खिचडी घाला. ही खिचडी छान उकळून घ्या. आता तुम्हाला जशी कन्सिस्टंसी हवी तेवढी ठेवा. 
 • फोडीणीच्या  भांड्यात तेल गरम करुन त्यात तेल, लसूण, हिंग, जीरं, मिरची घालून ही फोडणी खिचडीवर ओता. तुमची पालक खिचडी तयार 

3. पंचडाळ खिचडी

Instagra

साहित्य:  पाव वाटी उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ, पिवळी मूग डाळ, चणा डाळ घ्या आणि 1 वाटी तांदूळ,  आलं-लसूण पेस्ट, जीरं,गरम मसाला, लाल तिखट, तेल, कडीपत्ता, लाल सुकी मिरची 

कृती: 

 • डाळ आणि तांदुळ एकत्र करुन ते स्वच्छ धुवून घ्या.
 •  कुकरच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात कडीपत्ता, कांदा, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्या. 
 • सगळे कोरडे मसाले घालून छान परतून घ्या. 
 • धुतलेले तांदुळ आणि डाळ घालून छान परतून घ्या. 
 • त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मीठ घालून कुकर बंद करुन तीन शिट्टया काढा. 
 • कुकर थंड झाल्यावर खिचडी उघडून ती चांगली घोटून घ्या. 
 • फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात लाल सुकी मिरची, जीरं, लाल तिखट घालून तयार फोडणी खिचडीत घाला.

 

#Fishlover जाणून घ्या फिश फ्राय करण्याची योग्य पद्धत

4. काठियावाडी खिचडी

Instagram

साहित्य:  एक वाटी डाळ आणि तांदूळ, लवंग, तमालपत्र, जीरं, हिंग, दालचिनी, कडीपत्ता, सुकी मिरची लाल, कांदा, मटारचे दाणे, गाजर, पापडी, बटाटा, तेल, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, तूप

कृती:

 • कुकरमध्ये एक चमचा तूप आणि तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात  जीरं, हिंग, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. मसाले छान परतून घ्या. 
 • त्यानंतर त्यात लाल सुकी मिरची आणि कडीपत्ता घाला. चिरलेला कांदा घालून कांदा परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट घाला.  थोडे परतून घ्या. 
 • आता यात मटारचे दाणे, गाजर, पापडी, बटाटा घालून ते चांगले परतून घ्या. तुरीचा सीझन असेल तर त्याचे दाणे घातले तरी चालतील. सगळ्या भाज्या छान परतून घ्या. 
 • भाज्या परतल्यानंतर त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालून हे मिश्रण मंद गॅसवर परतून घ्या. त्यात धणे- जीरे पूड घालून त्यात साधारण भाताच्या अंदाजाने पाणी घाला. 
 • आता भिजवलेले डाळ आणि तांदूळ यात घाला . कुकर बंद करुन तीन शिट्टया काढा 
 • तुमची राजवाडी काठीयावाडी खिचडी तयार. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वर तूपही घालू शकता. 

5. मिक्स व्हेजिटेबल खिचडी

Instagram

साहित्य: तुम्हाला आवडत असलेल्या सगळ्या भाज्या, 1 वाटी डाळ आणि तांदुळ, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, किचन किंग मसाला, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट , पातीचा कांदा, टोमॅटो, धणे- जीरे पूड, 

कृती:

 • सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ एकत्र करुन धुवून घ्या. 
 •  एका भांड्यात तेल, तूप किंवा पांढरे लोणी,  गरम करुन मोहरी, जीरं, आलं-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्या. 
 • फोडणी परतल्यानंतर त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. ( भाजी छान बारीक चिरा). तुम्हाला आवडत असेल तर त्यात हिरवी मिरची घाला. 
 • जर तुम्ही जास्त भाज्या घेणार असाल तर त्या एक एक करुन घाला. 
 • भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर त्यात धुतलेली डाळ आणि तांदुळ घाला. परतून घ्या. 
 • पाणी घालून खिचडी चांगली शिजवून घ्या. चवीनुसार मीठ घाला
 • आता तुम्हाला खिचडी थोडी खमंग हवी असेल तर मग तुम्ही एका तव्यावर किंवा भांड्यात थोडे तेल गरम करुन त्यावर खिचडी छान परतून घ्या. तुमची खमंग खिचडी तयार 

आता तुम्हाला काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही या पौष्टिक आणि  चविष्ट खिचडी करा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.