हिवाळ्यात आस्वाद घ्या 'या' स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती

हिवाळ्यात आस्वाद घ्या  'या' स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती

जेवणाची चव अधिक रुचकर व्हावी, यासाठी आपण ताटामध्ये आवर्जून लोणच्याचा समावेश करतो. आपल्या देशात निरनिराळ्या प्रकारची लोणची चाखायला मिळतात. कित्येक घरांमध्ये आजही लोक पराठे, वरण-भातासह लोणचं चवीनं खाणं पसंत करतात. एकवेळ ताटामध्ये भाजी नसल्यास चालेल पण लोणच्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. विविध मसल्यांच्या वापरामुळे लोणच्याला एक वेगळीच चव येते. योग्य प्रमाणात साहित्य आणि पाककृतीची पद्धत वापरून सादिष्ट लोणचं तयार होऊ शकतं आणि ते दीर्घकाळ टिकूनही राहतात. तसं पाहायला गेलं बहुतांश जणांची आंब्याच्याच लोणच्याला पसंती असते. कित्येकदा घराघरांमध्ये हवामानुसार विविध प्रकारची लोणची तयार केली जातात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्येच आंबे उपलब्ध असतात, त्यामुळे या ऋतुमध्ये आंब्याचे लोणचं घालून वर्षभर त्याचा आस्वाद घेतला जातो. पावसाळा आणि हिवाळ्यातही लोणची तयार केली जातात. यासाठी तुम्हाला फक्त हंगामी भाज्यांबाबत माहिती असणं आवश्यक आहे. निरनिराळ्या लोणच्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी आम्ही तुम्हाला हिवाळ्यात तयारी केली जाऊ शकतात अशा काही निवडक लोणच्याची रेसिपी सांगणार आहोत. यंदाच्या हिवाळ्यात या लोणच्यांचा आस्वाद घेऊन पाहा. 

आंबट-गोड लोणच्यांची रेसिपी

1.गाजराचं लोणचं
सर्वप्रथम आपण गाजराच्या लोणच्याची रेसिपी जाणून घेऊया. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. गाजराच्या हलव्याचा आस्वाद घराघरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीनं घेतला जातो. केवळ हलवाच नाही तर गाजराच्या लोणच्यालाही या ऋतुमध्ये प्रचंड मागणी असते. दुकानातून विकत आणण्यापेक्षा घरातच लोणची तयार करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कित्येक आठवडे त्याची साठवणदेखील करू शकता. यासाठी गाजर, मोहरी पावडर, मीठ, मोहरीचं तेलासहीत पाककृती करावी.

(वाचा : पूजेला बसताना नवराबायकोचं एकत्र बसणं मानलं जातं शुभ)
2. आल्याचं लोणचं
थंडीमध्ये आल्याचं लोणचंदेखील चवीसाठी चांगलं असतं. यामध्ये साहित्य म्हणून केवळ तुम्हाला लिंबू, आले, मीठ आणि व्हिनेगर लागेल. आले सोलून घेतल्यानंतर त्याचे तुमच्या आवडीनुसार काप तयार करतात. त्यावर व्हिनेगर आणि लिंबूचा रस मिक्स करावा आणि लोणचं तयार होण्यासाठी ठेवून द्यावं. हे लोणच्याचा हलका गुलाबी असा रंग असतो.
(वाचा : दह्यात मीठ घालून खाणं योग्य की अयोग्य)
3. मिरची-लिंबूचं मिक्स लोणचं
हिवाळ्यात तिखट-आंबट खाण्याची प्रचंड इच्छा होते. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही मिरची-लिंबूचं मिक्स लोणचं तयार करू शकता. यासाठी तुम्हाला पाव किलो मिरच्या, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, मीठ, 4 लिंबू, अर्धा वाटी तेल हे साहित्य लागेल. मिरच्या उभ्या कापून घ्याव्यात, लिंबूचे चार समांतर भाग करावेत आणि सर्व साहित्य एकत्र करून लोणचं मुरण्यास ठेवून द्यावं.
(वाचा : तुमच्या पोटात जाताहेत भेसळयुक्त मसाले, होऊ शकतात गंभीर आजार)
4. आवळ्याचं लोणचं
आवळ्याचं नियमित सेवन केल्यानं शरीराला याचे प्रचंड फायदे होतात. आवळ्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे भरपूर प्रमाण असते. याचेही लोणचे तुम्हीही तयार करू शकता. यासाठी 15 ते 20 आवळे, 3 चमचे मोहरी, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद-हिंग, फोडणीसाठी 2 ते 3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.

 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.