ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
त्या दिवशी असं काही घडलं की, ज्यामुळे लागला आईस्क्रीम कोनचा शोध

त्या दिवशी असं काही घडलं की, ज्यामुळे लागला आईस्क्रीम कोनचा शोध

आईस्क्रीम अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो अथवा हिवाळा आईस्क्रीम कोणत्याही ऋतूत खाता येतं. कप आणि कॅन्डीप्रमाणेच कोनमधला आईस्क्रीम खाण्यात एक वेगळीच मौज येते. पण या आईस्क्रीमच्या कोनचा शोध कधी  लागला हे तुम्हाला माहीत आहे का ? कारण आईस्क्रीमच्या कोनच्या जन्माची कहाणी खरंच रंजक आणि मजेशीर आहे. वास्तविक याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र ही कथा नक्कीच प्रेरणादायी आहे. 

shutterstock

जाणून घ्या आईस्क्रीम कोनच्या जन्मामागची कथा

असं म्हटलं जातं की एकोणीसाव्या शतकामध्ये अमेरिकेतल्या सेंट हुईस या शहरात एक खाण्याच्या पदार्थांचे प्रदर्शन भरले होते. ज्यात आईसक्रीमचे अनेक स्टॉल लावण्यात आले होते. त्याकाळात आईस्क्रीम विक्रेते ग्राहकांना पेपर डिश अथवा कपमधून आईस्क्रीम देत असत. असाच एक आईस्क्रीम विक्रेता या प्रदर्शनात सहभागी झाला होता. अरनॉल्ड फोरनाचोने या प्रदर्शनात  आपला आईस्क्रीमचा स्टॉल लावला होता. त्याच्याकडील आईस्क्रीम अप्रतिम असल्यामुळे त्या दिवशी त्याच्या स्टॉलवर खूप गर्दी जमा झाली. सर्व ग्राहकांना तो पेपर डिश आणि कपमधून आइस्क्रीम विकत होता. पण गर्दी इतकी होती की फक्त पेपरडिश अथवा कपमधून गिऱ्हाईकांना तो भराभर आईस्क्रीम देऊ शकत नव्हता. शेवटी त्याच्या जवळील मागणी एवढ्या प्रमाणावर वाढली की त्याच्याजवळील सर्व पेपरडिश आणि पेपरकप संपून गेले.  त्याच वेळी त्याच्या शेजारी अरनेस्ट हॅमवी या विक्रेत्याने वॅफल नावाच्या खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता.आजकाल या वॅफल्सनां खूप मागणी आहे. मात्र त्याकाळात हॅमवीकडे फारसे गिऱ्हाईक नव्हते. हॅमवीने या अरनॉल्डची गडबड पाहिलीय. जरी त्याच्या स्टॉलवर गिऱ्हाईक नव्हते तरी तो याबाबत चिंता करत बसला नाही. त्याने अरनॉल्डची मदत करण्याचा विचार केला आणि त्याची मदत करू लागला. हॅमवी आपल्याला एवढी मदत करत आहे हे पाहून अरनॉल्डला बरे वाटले. पण  अरनॉल्डलाही हॅमवीला मदत करायची होती. मग त्याने यावर एक उपाय शोधून काढला. त्याने हॅमवीकडच्या वॅफलची सुरनळी केली आणि आपल्याकडील आईस्क्रीम त्यावर ठेवलं. अशा पद्धतीने दिलेलं आईस्क्रीम गिऱ्हाईकांनाही आवडलं. कारण यात पेपरडिश अथवा पेपरकप टाकून देण्याची गरज नव्हती. आईस्क्रीमच्या कपसकट आईस्क्रीम खाणं लोकांना आवडलं. खरंतर अरनॉल्डचा वेळ वाचावा म्हणून हॅमवी त्याच्या मदतीला आला होता. मात्र त्यामुळे आईस्क्रीम देण्याची एक नवी पद्धत पुढे जन्माला आली. शिवाय यामुळे पेपर डिश आणि कपमुळे होणारा टाकाऊ कचराही कमी झाला. हा  सर्व प्रकार पाहणाऱ्या आसपासच्या विक्रेत्यांनाही आईस्क्रीम कोनची ही नवी कल्पना आवडली आणि पुढे सर्वांनीच अशा पद्धतीने आईस्क्रीम विकण्यास सुरूवात केली. 

ADVERTISEMENT

shutterstock

या कथेमधील सत्यता –

आईस्क्रीमच्या कोनच्या शोधामागे अनेक कथा सांगितल्या जातात. यातील कोणती कथा सत्य आणि कोणती असत्य  हे सांगणे तसे कठीणच आहे. मात्र काहीही असलं तरी यामुळे आपल्याला आईस्क्रीमच्या कोन मिळाले ही मजेशीर गोष्ट आहे. लहान मुलांना तर आईस्क्रीमच्या कोनमधून आईस्क्रीम खाणं फारच आवडतात. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीमच्या कोनला मागणी आहे. यात नाविण्य आणण्यासाठी विक्रेते निरनिराळ्या प्रकारचे आईक्रीम तयार करत असतात. आईस्क्रीम वॅफल हादेखील याचाच एक नवीन प्रकार जो आजकाल अनेकांना फारच आवडतो.  असो थंडीला सुरूवात होत आहे तेव्हा गार वातावरणात थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच… तेव्हा मनसोक्त आईस्क्रीम खा आणि आनंदी राहा.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

नखांचे सौंदर्य वाढवणाऱ्या नेलपॉलिशचा असा लागला शोध

ADVERTISEMENT

या कारणासाठी लागला होता ‘कॉर्नफ्लेक्स’ चा शोध

घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे ’10’ प्रकार

 

13 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT