डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

लग्नसराईला सुरूवात झाली आहे. घरात लग्न कार्य ठरलं की अनेक गोष्टींचं प्लॅनिंग सुरू होतं. लग्न कुठे आणि कशा पद्धतीने करायचं ही सर्वात मोठी गोष्ट असते. आजकाल डेस्टिनेशन वेडिंगला सर्वात जास्त पसंती दर्शवली जाते. त्यामुळे अगदी निवांतपणे चार ते पाच दिवस लग्नाचे विधी कुटूंब आणि मित्रपरिवारासोबत केले जातात. घरापासून दूर बाहेरगावी लग्नकार्य होत असल्यामुळे कोणतीही घाई  अथवा गडबड होत नाही.बॉलीवूड सेलिब्रेटीजप्रमाण डेस्टिनेशन वेडिंग करण्याची अनेकांची इच्छा असते. जर लग्नासाठी भरपूर खर्च करण्याची तुमची तयारी असेल तर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लग्नाचा शाही थाटमाट करू शकता. मात्र अशा पद्धतीने लग्न करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी नक्कीच माहीत असायला हव्या.

डेस्टिनेशन वेडिंग ठरवण्यासाठी सोप्या टिप्स -

डेस्टिनेशन वेडिंग ठरवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचं लग्नकार्य आनंदात पार पडेल. 

लग्नसोहळा एक अविस्मरणीय अनुभव

जर तुम्हाला तुमचा विवाहसोहळा सर्वाच्या लक्षात राहावा असं वाटत असेल तर डेस्टिनेशन वेडिंग हा एक बेस्ट पर्याय आहे. भारतात लग्न हा एक अविस्मरणीय सोहळा असतो त्यामुळे तो सर्वाच्या लक्षात राहील असा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल.

Instagram

तुमच्या बजेटनुसार ठरवा डेस्टिनेशन

डेस्टिनेशन म्हटलं की सर्वात आधी लोकांच्या नजरेसमोर येतं ते म्हणजे लेक कोमो. थोडक्यात परदेशात अथवा एखाद्या महागड्या डेस्टिनेशनवर जाऊनच अशी पद्धतीने लग्न केलं जातं अशी प्रत्येकाची समजूत असते. मात्र असं मुळीच नाही. कारण तुम्ही भारतात अथवा अगदी आपल्या महाराष्ट्रातही तुमचं डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. कमी बजेटमध्ये विवाह सोहळा करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय ठरेल.

अधिक वाचा - डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही '10' ठिकाणं आहेत परफेक्ट

वेडिंग प्लॅनरची घ्या मदत

जर तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायची इच्छा असेल तर एखाद्या एक्सपर्टची मदत जरूर घ्या. कारण लग्नसोहळ्याचं आयोजन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात जर तुम्हाला बाहेरगावी जाऊन तुमचा विवाह करायचा असेल तर त्यासाठी तज्ञ्ज व्यक्तीची मदत गरजेची आहे. ज्यांना यातील योग्य ज्ञान आहे अशा लोकांची मदत घ्या.

Instagram

लग्नाची थीम ठरवा -

आजकाल लग्नसोहळ्यातील विविध विधींना काही विशिष्ठ थीम दिल्या जातात. ज्यामुळे त्या विधींमध्ये कोणता पेहराव असावा, खादपदार्थ कोणते असावेत, डेकोरेशन काय असावं याचं नियोजन करता येऊ शकतं. जर याचं योग्य नियोजन आधीच केलं तर तुमच्या वेडिंग कार्डवर त्याबद्दल तुम्हाला माहिती देता येईल. ज्यामुळे येणारे पाहुणे त्या थीमनुसार पेहराव करतील. सध्या ब़ॉलीवूड थीम, राजेशाही थीम, फेअरी टेल थीम, रेड कार्पेट अशा थीम सध्या लोकप्रिय होत आहेत.

अधिक वाचा - लग्नात वधूवरांना आर्शीवाद देण्यासाठी '25' शुभेच्छा संदेश

डेस्टिनेशन थीम ठेवा सोपी

डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्हाला आणि तुमच्या पाहुणेमंडळींना फार मोठा प्रवास करावा लागतो. म्हणूनच तुमच्या वेडिंगची थीम शक्य असल्यास साधी आणि सोपी ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला आणि निमंत्रकांना जास्त सामान कॅरी करावं लागणार नाही.

बॅग भररण्यापूर्वी या गोष्टींचा करा विचार

लग्नकार्यासाठी तुमच्या वेडिंग डेस्टिनेशनवर जाण्यापूर्वी तुमच्या सामानाची यादी बनवा. कारण यात वर-वधूच्या  कपड्यांपासून आहेराच्या सामानापर्यंत सर्व गोष्टी असतात. ऐनवेळी तुमची थावपळ होऊ नये यासाठी अशी यादी अथवा टू डू लिस्ट तुमच्या मदतीची गोष्ट असेल. 

पेपर वर्क करा -

लग्न कार्य म्हटलं की अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो. मात्र डेस्टिनेशन वेडिंग कररताना त्यात आणखी काही गोष्टी अधिक वाढतात. शिवाय तुमचं डेस्टिनेशन अगदी कमी वर्दळीच्या बाजारपेठेपासून दूर असेल तर तुम्हाला ऐनवेळी कोणतीच मदत मिळत नाही. यासाठी तुमचं नियोजन एखाद्या पेपर, वही, नोटपॅडवर नोंद करा. ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींचा अचूक अंदाज येईल.

प्लॅन बी तयार ठेवा -

तुमचं डेस्टिनेशन जर आऊटडोअर असेल तर वातावरणाचा अचूक अंदाज घ्या. कारण आजकाल वातावरणात कधीही बदल होतात. यासाठीच असं डेस्टिनेशन निवडा जिथे वेळ आल्यास तुम्हाला इनडोअर कार्यक्रम आयोजित करता येतील. शिवाय तुमच्या प्रत्येक प्लॅनिगसोबत एखादा ब्लॅन बीदेखील तयार ठेवा. ज्यामुळे तुमची कोणत्याही क्षणी व्यवस्था होऊ शकेल. 

नातेवाईकांची सोय पाहा -

डेस्टिनेशन वेडिंगची तुम्हाला कितीही हौस असली तरी तुमच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची तिथे व्यवस्थित सोय होईल  याची वेळीच काळजी घ्या. कारण कधी कधी आजी - आजोबा असे तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक अशा ठिकाणी लग्नासाठी येऊ शकतीलच असं नाही. लग्नकार्य हा मंगल सोहळा असल्याने त्यांचे आर्शीवाद तुमच्यासाठी महत्त्वाचे  आहेत. तेव्हा सर्वाची सोय पाहून मगच डेस्टिनेशन निवडा.

अधिक वाचा - मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का

लग्नाचा सोहळा आनंदादायी होईल याची काळजी घ्या -

लग्न कार्यात अनेक मंडळी एकत्र येतात. नातेवाईक, जवळची मित्रमंडळी अशा सर्वांनाच तुमच्या आनंदात सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र एका पेक्षा जास्त माणसं जिथे एकत्र येतात तिथे मतभिन्नता होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी या सर्वांना एकत्र आणून त्यांना योग्य पद्धतीने सांभाळेल अशी एखादी व्यक्ती निवडा. ज्यामुळे ती व्यक्ती सर्वांना सांभाळेल आणि तुम्हाला अशा गोष्टींमध्ये लक्ष घालावे लागणार नाही. ज्यामुळे तुमचा लग्नसोहळा आनंदात होईल. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा - वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी