पाणी आपण नेहमी आपल्या स्वयंपाकघरातील अल्युमिनिअमच्या भांड्यातून अथवा काचेच्या ग्लासातून पित असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या घरातील तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हे कायम आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अगदी पूर्वकाळापासून तांब्याच्या पाण्यातून पाणी प्यायलं जायचं. सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुतादेखील तुम्ही जर नियमित तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायलात तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याने आरोग्यासाठी जास्त फायदे होतात. जाणून घेऊया -
रोज सकाळ संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला सर्वात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमचा लठ्ठपणा कमी होतो. तांब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे तुमची चरबी बर्न होऊन तुमचा लठ्ठपणा कमी होतो. आजकाल लठ्ठपणाचा त्रास आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमुळे होतोच. पण तुम्हाला इतर काही वेगळा व्यायाम करता येत नाही. त्यामुळे असं असताना तुम्ही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं महत्त्वाचं आहे.
तुम्ही रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित हे पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधी समस्या असल्यास, त्या दूर होतात. तसंच तुमची त्वचा अधिक उजळते. अँटिऑक्सिडंट्स असल्याने त्वचेमधील टॉक्झिन्स बाहेर काढण्यास याची मदत होते. तसंच यामुळे तुमचं वय कमी दिसतं. तुमच्या शरीरातील थकवा कमी करण्यास याची मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्याने यामध्ये आढणारे कॉपर रक्ताची कमी दूर करतं. तसंच तुमच्या शरीरातील रोज कामाने आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठीदेखील याची मदत होते. आजकाल आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे सतत धावपळ होत असते. त्यामुळे नियमित सकाळी आणि संध्याकाळी अथवा जमल्यास, आजकाल तांब्याच्या बाटल्याही मिळतात त्यातून पाणी प्या.
तांबे या धातूमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व जास्त प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती भरण्यासाठी तुम्हाला याची मदत मिळते. कारण यातील तत्व जखमेतील किटाणूंना दूर ठेवण्यास मदत करतात. जखम सहसा लवकर बरी होत नाही. त्यासाठी तुम्ही क्रिमचा वापर तर करताच. पण शरीरातून जर तुम्हाला योग्य आराम मिळाला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे रोजच्या रोज तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावं.
जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
तुम्ही तांब्याच्या भांड्यात जर रात्रभर पाणी ठेवलं आणि साधारण 8-10 तासानंतर जर हे पाणी प्यायलात तर तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहातं. तसंच तुमचं हृदय निरोगी राहतं. याशिवाय तुम्ही हे पाणी नियमित प्यायल्यास, जुलाब, कावीळ आणि अतिसाराचा धोका टळतो. तसंच तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यापासूनदेखील आराम मिळतो. तसंच यामधील आढळणाऱ्या कॉपरमुळे थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहतं आणि थायरॉईडचा धोका टळतो. तसंच अॅसिडिटी आणि गॅसच्या त्रासातूनही सुटका होते. तुमची पचनक्रिया सुरळीत राहाते. तुमचं शरीर नेहमी निरोगी राहण्यासाठी तुम्ही नियमित तांब्याच्या भांड्यातूनच पाणी प्यावं.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.