महागड्या कांद्याला करा हद्दपार, या स्वस्त-मस्त पर्यायांनी स्वादिष्ट होईल स्वयंपाक

महागड्या कांद्याला करा हद्दपार, या स्वस्त-मस्त पर्यायांनी स्वादिष्ट होईल स्वयंपाक

कांद्यानं सर्वांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय. आवक घटल्यानं देशभरात एक किलो कांद्याची किंमत 80 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता कांदा कापताना नाही तर त्याचे दर ऐकूनच डोळ्यांत पाणी येत आहे. कांद्याचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडत आहे.  पण स्वयंपाकात कांद्याचा वापर करण्याऐवजी तुम्हाला अन्य स्वस्त आणि आरोग्याला मस्त अशा भाज्याचा पर्याय सुचवला तर…चला तर जाणून घेऊया तुमच्या खिशाला परवडणारा कांद्यापेक्षाही चांगला पर्याय…

ए कांद्याला तुलाही ऑप्शन आहेत हो…

दही किंवा शेंगदाणे

भाजीचा रस्सा-मसाला (ग्रेव्ही) घट्ट स्वरूपात आणि स्वादिष्ट व्हावा यासाठी कांद्याचा वापर केला जातो. पण कांदा नसल्यास यास पर्याय म्हणून तुम्ही घट्ट दही किंवा शेंगदण्याचा कुट वापरू शकता.

काजू किंवा बदामाची पेस्ट 

कित्येक रेस्टॉरंटमध्ये भाजीच्या मसाल्यात काजूची पेस्ट किंवा पाण्यात भिजवलेल्या बदामाची पेस्टचाही वापर केला जातो. 

मैदा 

एखाद्याचा भाजीचा, आमटीचा रस्सा घट्ट करण्यासाठी मैद्याचा वापर तुम्ही करू शकता. मैदा लालसर होईपर्यंत तेलात परतावा. यानंतर त्यात टोमॅटो मिक्स करावेत.

(वाचा: हिवाळ्यात आस्वाद घ्या 'या' स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती)

काकडी/ गाजर 

कांद्यांची खुशखुशीत चव देण्यासाठी तुम्ही काकडी, गाजर किंवा हिरव्या कांद्याचा वापर करू शकता. हे पर्याय तुमच्या खिशाला परवडणारे आहेत. सँडविचमध्येही तुम्ही कांद्याऐवजी काकडी-गाजरचा जास्त वापर करू शकता.

हिरवा कांदा

हिवाळ्यात हिरवा कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. कांद्याला पर्याय म्हणून हिरवा कांद्याची चव तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्यांमधून घेऊ शकता. 

लसूण

महागडा कांदा खरेदी करून खिसा रिकामा करण्यापेक्षा लसणाचा वापर करा. साधारणतः कांद्यासोबत लसणाचा वापर होतोच, पण त्याऐवजी लसणाचा अधिक वापर करा. लसूण केवळ जेवणाची चवच वाढवणार नाही तर यापासून तुमच्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतील. 

(वाचा: जेवणानंतर लगेचच पाणी पिता का, मग तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

टोमॅटो 

कांदा सोडून तुम्ही टोमॅटो आणि योग्य मसल्याचा जेवणात वापर केला तर स्वयंपाक अधिक लज्जतदार होईल.  

भोपळा 

भोपळा पाण्यात शिजवून त्याचा भाजी-डाळींच्या मसल्यामध्ये वापर केला जाऊ शकतो.  

कांद्याची पेस्ट

एवढे पर्याय सांगूनही जर तुम्हाला कांद्याशिवाय जेवणात चव येत नसेल तर यासाठी बाजारात कांद्याच्या पेस्टचं पाकिट मिळतं. जेवणात या पेस्टचा वापर तुम्ही करू शकता. पण हा पर्याय आरोग्यासाठी योग्य नाही. 

(वाचा: बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स)

कोबी 

कांद्याला पर्याय म्हणून बऱ्याचदा कोबीचा वापर केला जातो. कांदा भजी ऐवजी तुम्ही कोबी भजी, कोशिंबिरीतही कोबीचा वापर करू शकता.

ओलं खोबरं 

वाटणासाठी कांद्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा वापर बेस्ट ठरेल. ओलं खोबरं, लसूण-आल्याची पेस्ट करून त्याचा भाजीसाठी मसाला तयारा करावा.

बटाटा

जिथे एखादी गोष्ट कमी पडते तिथे बटाटा हमखास वापरला जातो. बहुतांश जणांना बटाटा कोणत्याही स्वरुपात बटाटा खाण्यास आवडतो. कांदे पोह्यांऐवजी बटाटे पोहे तुम्ही खाऊ शकता.

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.